मंत्रालय

Azadi Ka Amrit Mahotsav : ‘हर घर तिरंगा’ मुंबईत राबणार, 25 लाख ध्वजांचे होणार वितरण

मोदी सरकारकडून संपुर्ण देशभरात ‘आजादी का अमृत महोत्सव’ साजरा करण्यात येत आहे. त्यानिमित्त वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यासाठी भाजप पुढे सरसावली असून देशभरातून नागरिकांचा सुद्धा याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. याच महोत्सवाचा भाग म्हणून ‘हर घर तिरंगा’ हे अभियान राबवण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत मुंबईत 25 लाख तिरंगा ध्वजाचे वितरण करण्यात येणार आहे. याबाबतची माहिती मुंबई भाजपा अध्यक्ष व आमदार ॲड. मंगलप्रभात लोढा यांनी दिली आहे. जिपीओ ऑफीस येथे लोढा यांनी माध्यमांशी संवाद साधत ही मोहिम यशस्वी करणार असल्याचे सुद्धा त्यांनी यावेळी सांगितले आहे.

मुंबईत सुद्धा ‘हर घर तिरंगा’ ही अभियान राबवण्यात येणार असून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली याचे नियोजन करण्यात आले आहे.यावेळी बोलताना ॲड. मंगलप्रभात लोढा म्हणाले, ‘आजादी का अमृत महोत्सव’ साजरा करणे हा आपल्या सर्वांसाठी अभिमानाचा आणि गौरवाचा क्षण आहे. देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलेल्या प्रत्येकाची आठवण ठेवणे हे आपल्या प्रत्येकाचे कर्तव्य असून आजच्या पिढीला त्यांचे महात्म्य, कार्य आणि विचार समजणे गरजेचे आहे. नागरिकांमध्ये असलेले राष्ट्रप्रेम जागृत करण्याचे काम या अभियानाअंतर्गत होणार आहे, असे लोढा यांनी सांगितले.

हे सुद्धा वाचा

VIDEO : शिवसेनेच्या फुटीला नारायण राणे जबाबदार?

Cabinet Expansion : ‘मंत्रीमंडळ विस्ताराला यश मिळण्यासाठी कामाख्या देवीला 40 रेड्यांचा बळी द्या’

Wild vegetables : श्रावण महिन्यातील औषधी रानभाज्या चाखायलाच हव्या

मंगलप्रभात लोढा पुढे म्हणाले, मुंबई भारतीय जनता पार्टीच्या वतीने ‘हर घर तिरंगा’ हा उपक्रम जनमानसात पोहोचविण्याकरिता अत्यंत सूक्ष्म नियोजन केले असून उपक्रमाचा प्रचार, प्रसार तसेच झेंड्याची उपलब्धता अशा दुहेरी आघाड्यांवर काम सुरू आहे.प्रभातफेरी, पथनाट्ये, पोवाडे अश्या पारंपरिक पद्धतीबरोबरच समाज माध्यमांचा प्रभावी वापर करून अभियानाचा प्रचार, प्रसार करणार असल्याची माहिती आमदार लोढा यांनी यावेळी दिली.

याप्रसंगी मुंबई भाजपा उपाध्यक्ष आचार्य पवन त्रिपाठी, भाजपा मुंबई सचिव व राष्ट्रीय ओबीसी मोर्चा सदस्य प्रतिक कर्पे, दिनेश जगताप, भारतीय डाक विभागाचे अधिकारी अमिताभ सिंग, डॉ. सुधीर जाखेरे आदी उपस्थित होते.

सुचित्रा पेडणेकर

Recent Posts

‘मदत फाऊंडेशन’चा कौतुकास्पद उपक्रम, पक्ष्यांकरिता शेकडो पाणवठ्यांची व्यवस्था

'मदत फाऊंडेशन’ (Help Foundation) च्यावतीने अभिनव उपक्रम राबविण्यात आला आहे. पाण्याअभावी पक्ष्यांचा मृत्यू होऊ नये,…

6 mins ago

आदित्य ठाकरेंचे काम,श्रेय लाटताहेत राहुल शेवाळे !

लोकसभा निवडणुकीचे तीन टप्पे पार पडले. चौथ्या आणि पाचव्या टप्प्याच्या निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली…

11 mins ago

नरेंद्र मोदी देशभर ४०० पारच्या घोषणा देत फिरत होते, पण २०० पार होणे सुद्धा त्यांना जड जाणार आहे: रमेश चेन्निथला

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) भाजपचे प्रचारक बनून ४०० पारच्या घोषणा ('400 par' slogans) देत…

29 mins ago

लोकसभा निवडणूक : उमेदवारांना चिन्हांचे वाटप

जिल्ह्यातील लोकसभेच्या (Loksabha) दोन्ही जागांसाठी सोमवारी (दि. ६) माघारीची प्रक्रिया पार पडली. माघारीनंतर लगेचच उमेदवारांना…

47 mins ago

अजित पवार चंबळच्या खोऱ्यातून आलेत, बारामतीचा करणार बिहार !

अजित दादा, काय करून ठेवलंय तुम्ही हे. अहो, बारामतीचा अख्ख्या देशात नावलौकीक होता. विकास म्हणजे…

3 hours ago

नारळपाणी पिण्याचे फायदे

नारळपाणी म्हणजे उन्हाळ्यातील एक प्रकारचं अमृतचं पण नारळपाणी आपण फक्त उन्हळ्यातच नाहीतर बाकीच्या ऋतूंमध्ये देखील…

5 hours ago