राजकीय

Gajanan Kale on Uddhav Thackeray : मनसेच्या गजानन काळेंना उद्धव ठाकरेंची पाठ सोडवेना

महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या दोन्ही राजकीय पक्षामधील शीतयुद्ध ही सर्वश्रुत आहे. या दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते हे कायमच सोशल मीडियाच्या माध्यमातून एकमेकांवर शाब्दिक वार करत असतात. हे शाब्दिक वार इतके टोकाचे असतात की यामध्ये काही कार्यकर्ते तर ठाकरे घराण्यातील सर्वच व्यक्तींचा उद्धार करतात. महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचे नवी मुंबईचे शहराध्यक्ष गजानन काळे हे तर कायमच उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि त्यांच्या नेत्यांवर तोफ डागत असतात. गजानन काळे हे त्यांच्या ट्विटरवरून उद्धव ठाकरे यांच्यावर नेहमीच टीका करत असतात. आता पुन्हा एकदा गजानन काळे यांनी उद्धव ठाकरे यांच्या संभाजीनगरच्या दौऱ्यावरून त्यांच्यावर टीका केली आहे. ट्विटरवरून एक वाक्य पोस्ट करत गजानन काळे यांनी उद्धव ठाकरे यांना डिवचले आहे.

Lay Bhari Diwali Magzine : ‘लय भारी’चा दिवाळी अंक राजकारण्यांसाठी ‘अभ्यास पुस्तक’, मुख्यमंत्र्यांनी दिवाळी अंकाचे केले प्रकाशन

Uddhav Thackeray : संभाजीनगरमधील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची उद्धव ठाकरेंनी घेतली भेट

Anandacha Shidha : दिवाळीतील आनंदाचा शिधा आता ऑफलाईन मिळणार

उद्धव ठाकरे हे आज (ता. 23 ऑक्टोबर) संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यात असलेल्या दहेगाव शिवार आणि पेंढापूर या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी करण्यासाठी दाखल झालेले आहेत. याबाबतच एक परिपत्रक जाहीर करण्यात आले होते. हे परिपत्रक ट्विटरवर शेअर करत गजानन काळे यांनी उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यावर खोचक टीका केली आहे.

उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याबाबत जरी केलेल्या परिपत्रकात ते किती वेळासाठी नुकसानग्रस्त भागाची पाहणी करणार आहेत याबाबत लिहिण्यात आले होते. यामध्ये उद्धव ठाकरे हे साधारण 15 मिनिटे नुकसानग्रस्त भागाची पाहणी करतील, अशी वेळ नमूद करण्यात आली होती. त्याचमुळे गजानन काळे यांनी ’30 मिनिटांचा पिक नुकसान पाहणी दौरा.. आता मात्र सगळे चिडीचूप …’ असे ट्विट करत इतक्या कमी वेळेच्या पाहणी दौऱ्यावर अप्रत्यक्षपणे प्रश्न उपस्थित केला आहे.

दरम्यान, गजानन काळे यांच्या या ट्विटवर उद्धव ठाकरे समर्थकांनी काळे यांची चांगलीच कान उघडणी केलेली देखील पाहायला मिळत आहे. तर मनसे समर्थक देखील उद्धव ठाकरे यांच्या समर्थकांना उत्तर देत आहेत. गजानन काळे हे नेहमीच त्यांच्या ट्विटरच्या माध्यमातून चर्चेत असतात. गजानन काळे हे गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्र्र नवनिर्माण सेना पक्षात सक्रिय आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून ते कायमच आपल्या पक्षाची भूमिका मांडताना दिसून येतात. गजाजन काळे यांनी दिवाळीच्या मुद्द्यावरून उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील अंबादास दानवे यांच्यावर सुद्धा ट्विटरच्या माध्यमातून टीका केली होती. या ट्विटमध्ये तर त्यांनी अंबादास दानवे यांना चांगलेच सुनावले आहे.

तुषार खरात

Recent Posts

अरविंद केजरीवाल तुरूंगातून बाहेर येतील, नरेंद्र मोदींचा कार्यक्रम करतील

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना कथित मद्य घोटाळा प्रकरणात अटक केली आहे. (Arvind Kejriwal has…

39 mins ago

नाशिक शहरात ऐन उन्हाळ्यात महामार्ग बस स्टॅन्डचे बांधकाम

फेब्रुवारी महिन्यात राज्यातील पहिल्या वातानुकूलित मेळा बस स्टॅन्डचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत लोकार्पण झाले.…

45 mins ago

पाकिस्तानची भाषा बोलणाऱ्या वडेट्टीवार यांच्याशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का ?; देवेंद्र फडणवीस

हेमंत करकरे यांची हत्या अजमल कसाब ने केली नाही असे म्हणणारे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार…

1 hour ago

‘मदत फाऊंडेशन’चा कौतुकास्पद उपक्रम, पक्ष्यांकरिता शेकडो पाणवठ्यांची व्यवस्था

'मदत फाऊंडेशन’ (Help Foundation) च्यावतीने अभिनव उपक्रम राबविण्यात आला आहे. पाण्याअभावी पक्ष्यांचा मृत्यू होऊ नये,…

1 hour ago

आदित्य ठाकरेंचे काम,श्रेय लाटताहेत राहुल शेवाळे !

लोकसभा निवडणुकीचे तीन टप्पे पार पडले. चौथ्या आणि पाचव्या टप्प्याच्या निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली…

1 hour ago

नरेंद्र मोदी देशभर ४०० पारच्या घोषणा देत फिरत होते, पण २०० पार होणे सुद्धा त्यांना जड जाणार आहे: रमेश चेन्निथला

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) भाजपचे प्रचारक बनून ४०० पारच्या घोषणा ('400 par' slogans) देत…

2 hours ago