33 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeराजकीयगोपीचंद पडळकरांची भूमिका ‘मोडेन पण वाकणार नाही’

गोपीचंद पडळकरांची भूमिका ‘मोडेन पण वाकणार नाही’

टीम लय भारी

सांगली : शरद पवार यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी माफी मागणार नाही, अशी भूमिका आमदार गोपीचंद पडळकर यांनी घेतली आहे. या विधानाबद्दल पडळकर यांना कोणताही पश्चाताप झालेला नाही, उलट आपल्या विधानावर ते ठाम असल्याचे सूत्रांनी ‘लय भारी’शी बोलताना सांगितले ( Gopichand Padalkar firm on his statement ).

पडळकर यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी राज्यभर निषेध आंदोलने केली आहेत. ‘पडळकर यांनी घराबाहेर पडून दाखवावे. त्यांना फिरू देणार नाही’ असे आव्हान राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी दिले होते. त्यावर पडळकर यांनी आज खुलेआम आटपाडीमधील विविध गावांचे दौरे केले ( Gopichand Padalkar visits to villages ).

पडळकर सकाळी घराबाहेर पडले तेव्हा त्यांच्यासोबत साधारण १५ गाड्यांचा ताफा होता. पण त्यानंतर वाहनांची संख्या वाढली. जवळपास ७० वाहनांचा ताफा त्यांच्या सोबत होता. जत, कुंभारी, कोमाठी, कोळा या गावांना त्यांनी भेटी दिल्या. कार्यकर्ते व सामान्य जनतेच्या घरोघरी जाऊन त्यांनी भेटी घेतल्या.

ठिकठिकाणी त्यांचे स्वागत करण्यात येत होते. या संबंध दौऱ्यादरम्यान राष्ट्रवादीच्या एकाही कार्यकर्त्याने त्यांना आव्हान देण्याचा प्रयत्न केला नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Mahavikas Aghadi

गोपीचंद पडळकर यांच्या समर्थनार्थ कार्यकर्ते रस्त्यावर

गोपीचंद पडळकर यांची धनगर व बहुजन समाजात मोठी लोकप्रियता असल्याचा प्रत्यय आला आहे. कारण गोपीचंद पडळकर यांच्यावर सर्व स्तरांतून टीका होत आहे, तरीही पडळकरांना पाठींबा देण्यासाठी राज्यात अनेक ठिकाणी त्यांचे कार्यकर्ते आड रस्त्यावर आले ( Activists agitated for Gopichand Padalkar’s support ).

गोपीचंद पडळकरांची भूमिका ‘मोडेन पण वाकणार नाही’

म्हसवड, नाशिक, इस्लामपूर, उस्मानाबाद, पंढरपूर, आटपाडी, जत, सांगली इत्यादी ठिकाणी कार्यकर्त्यांनी पडळकरांना पाठिंबा दर्शविणारे मोर्चे काढले. पंढरपूर, नाशिक व उस्मानाबाद येथील कार्यकर्त्यांनी पडळकर यांच्या प्रतिमेला दुधाचा अभिषेक केला.

Moneyspring

इस्लामपूर, आटपाडी या ठिकाणी पडळकरांना समर्थन देणारे बॅनर्स झळकविण्यात आले. ‘गोपीचंद पडळकर तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है’ अशी घोषणाबाजी करण्यात आली.

गोपीचंद पडळकर यांनी केलेले वक्तव्य तसे किरकोळ आहे. पण स्वतः शरद पवार, अजित पवार, जितेंद्र आव्हाड, कै. आर. आर. पाटील यांनी यापेक्षाही जास्त वादग्रस्त वक्तव्ये केली आहेत. त्यावेळी मात्र राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी का निषेधाची आंदोलने केली नाहीत असा सवाल पडळकर समर्थकांनी केला आहे.

LayBhri.in News portal

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी