32 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
Homeराजकीयनिवडणूक कशी जिंकायची?; जयंत पाटलांनी दिला कानमंत्र!

निवडणूक कशी जिंकायची?; जयंत पाटलांनी दिला कानमंत्र!

टीम लय भारी

वसई: राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची वसई येथून राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रा सुरू झाली आहे. या यात्रेच्या निमित्ताने वसईत आलेल्या जयंत पाटलांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. प्रत्येक वॉर्डात, प्रत्येक मतदारसंघात पक्ष वाढवा. बाहेर शत्रू मोठा आहे. त्यामुळे गाफिल राहू नका. एक एक माणूस जोडा. प्रत्येक घटकापर्यंत पोहोचा, राष्ट्रवादीचा विचार त्यांच्यापर्यंत न्या. तरच आपण निवडणुका सक्षमपणे जिंकू शकू, असा कानमंत्रच जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांना दिला आहे (Jayant Patil gave advice, How to win an election ?).

‘राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेच्या चौथ्या पर्वाची सुरूवात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज कोकण विभागातील वसई येथून केली. यावेळी त्यांनी वसई-विरार कार्यकारिणीची आढावा बैठक घेतली. यावेळी त्यांनी हा कानमंत्र दिला. आपला पक्ष प्रत्येक वॉर्डात… प्रत्येक मतदारसंघात वाढला पाहिजे. येणाऱ्या पिढीला आपण आपल्या पंखाखाली घ्यायला हवे. त्यांच्या विचारांशी समन्वय साधायला हवा. ही नवी पिढीच इथे बदल घडवेल, असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला.

जयंत पाटलांनी छगन भुजबळांवर उधळली स्तुतीसुमने

जयंत पाटील यांनी किरीट सोमय्या यांचा घेतला समाचार

तुमची रणनीती तयार करा

आपला पक्ष म्हणजे शरद पवारसाहेबांचा एक विचार आहे. हा विचार भक्कम व्हायला हवा. यासाठी मी आणि माझे सहकारी संपूर्ण महाराष्ट्रात फिरत आहोत. मतांची बेरीज वाढवण्यासाठी तुम्ही तुमची रणनीती तयार करा, तुम्हाला पूर्ण स्वतंत्र आहे, मला तुमच्याकडून चांगला निकाल पाहिजे. बाहेर शत्रू मोठा आहे, त्यामुळे त्याला पराभूत करण्यासाठी आपल्याला ताकद उभारावी लागेल ही खूणगाठ मनाशी बांधा, असे मार्गदर्शनही त्यांनी केले.

भाजपच्या विचारांना जनतेने नाकारले : जयंत पाटील

Court Grants NCP Leader Eknath Khadse 1-Week Interim Protection From Arrest

किल्ला लढवणे सोपे नाही

वसई-विरार, नालासोपारा हा भाग एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला होता. स्वातंत्र्य चळवळीसाठी इथल्या लोकांनी मोठे योगदान दिलेय. या भागात सर्व समाजाचे, सर्व भाषिक लोक राहतात, त्यामुळे इथे सर्वांना सोबत घेऊन राजकारण करावं लागेल, असे स्पष्ट मत गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मांडले. इथे किल्ला लढवणे सोपे नाही, मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते ठामपणे उभे आहेत हे कौतुकास्पद आहे. हळूहळू का होईना इथे पक्ष वाढेल, असा विश्वासही आव्हाड यांनी व्यक्त केला.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी