26 C
Mumbai
Friday, December 1, 2023
घरमुंबईबीएमसी, बेस्ट कर्मचाऱ्यांना बोनस कधी? आदित्य ठाकरेंचा महापालिका आयुक्तांना प्रश्न

बीएमसी, बेस्ट कर्मचाऱ्यांना बोनस कधी? आदित्य ठाकरेंचा महापालिका आयुक्तांना प्रश्न

दिवाळीचा (Diwali 2023) सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. दिवाळीच्या खरेदीसाठी मुंबईतील बाजारपेठा सजल्या असून मुंबईकर मुंबईतील महत्वांच्या बाजारपेठांमध्ये खरेदी करण्यासाठी गर्दी करत आहेत. दिवाळीत नोकरदारांना मिळणाऱ्या बोनसमुळे दिव्यांचा हा सण अधिक उत्साहाने साजरा केला जातो. यंदा मात्र मुंबई महापालिका (BMC) कर्मचाऱ्यासाठी आणि बेस्टच्या (BEST) कर्मचाऱ्यांसाठी यंदाची दिवाळी बोनसशिवाय जाते की काय? असा प्रश्न कर्मचाऱ्यांना पडला आहे. यावर, शिवसेना (उबाठा) गटाचे नेते आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी प्रकाश टाकला असून त्यांनी ट्विटरवरुन थेट मुंबई महापालिका आयुक्तांना प्रश्न विचारला आहे.

आदित्य ठाकरे यांनी ट्विटरवरून मुंबई महापालिका आयुक्तांना मुंबई महापालिका कर्मचारी आणि बेस्ट कर्मचारी यांच्या दिवाळी बोनसविषयी तसेच रस्ते घोटाळा प्रकरणातील कंत्राटदाराला बडतर्फ करण्याविषयी मुंबई महापालिका आयुक्त आणि प्रशासक इकबाल सिंह चहल (BMC Commissioner Iqbal Singh Chahal) यांच्याकडे विचारणा केली आहे.

आदित्य ठाकरे यांनी आपल्या अधिकृत ‘X’ अकाऊंटवरुन (पूर्वीचे ट्विटर) ट्विट करत म्हणाले, “BMC महापालिका आयुक्तांना एक महत्त्वाचा प्रश्न: अनेक दशकांनंतर पहिल्यांदाच BMC आणि BEST च्या कर्मचाऱ्यांना त्यांचा दिवाळी बोनस अद्याप मिळालेला नाही. CMO च्या माध्यमातून बीएमसी चालवणारे खोके सरकार (लोकप्रतिनिधींच्या अनुपस्थितीत) दिवाळी बोनस देणार आहे की नाही? देणार असेल, तर कधी? दिवाळी संपल्यावर??”

आदित्य ठाकरे यांनी मुंबई महापालिका आयुक्त आणि प्रशासक इकबाल सिंह चहल याना दूसरा प्रश्न विचारीत रस्ते घोटाळा प्रकरणातील कंत्राटदाराला बडतर्फ करण्याविषयी विचारणा केली आहे. आपल्या ट्विटमधून ते पुढे म्हणाले, “असो, जनतेच्या माहितीसाठी आणखी एक विषय: रस्ते घोटाळ्यातील कंत्राटदाराला बडतर्फ करण्याची फाइल अंतिम स्वाक्षरीसाठी महापालिका आयुक्तांच्या डेस्कवर पोहोचली आहे. ते त्यावर स्वाक्षरी करून त्या कंत्राटदाराचे कंत्राट रद्द करणार की खोके सरकारच्या दबावापुढे झुकून त्यांच्याबरोबरीने मुंबई लुटणार? पुढील 24 तासांत यापैकी काय होते ते पाहू…”

हे हि वाचा

‘चकली’वरून शीतल म्हात्रे-किशोरी पेडणेकरांमध्ये दिवाळीपूर्वीच टीकेची सुरसूरी

कॉंग्रेस नेते नाना पटोलेंनी अजित पवारांची काढली खरडपट्टी

भाजप लोकांची माफी मागणार का? रोहित पवार यांचा सवाल

आदित्य ठाकरे नेहमीच सोशल मिडियावर व्यक्त होत असतात. सोशल मिडियाच्या माध्यमातून सत्ताधाऱ्यांच्या भूमिकांविषयी तसेच राजकारणातील चालू घडामोडींबद्दल ते सातत्याने टीकाटिपण्णी करत असतात. राज्य सरकारबद्दल अनेक मुद्दे ते उचलून धरत असतात तसेच त्यांचा सातत्याने पाठपुरावाही घेत असतात.आता महानगर पालिका कर्मचारी आणि बेस्ट कर्मचारी यांच्या दिवाळी बोनसचा मुद्यावर त्यांनी प्रश्न विचारले आहेत. त्यामुळे, आता महापालिका आयुक्त यावर काय कार्यवाही करतात ते पहावे लागेल.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी