33 C
Mumbai
Monday, May 20, 2024
Homeराजकीयजयंत पाटलांनी मोटार सायकलवरून केला प्रवास, चिखलातूनही गेले चालत

जयंत पाटलांनी मोटार सायकलवरून केला प्रवास, चिखलातूनही गेले चालत

टीम लय भारी

जळगाव : राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी मराठवाड्यात अतिवृष्टीने झालेल्या नुकसानग्रस्त गावांची पाहणी केली. यावेळी त्यांनी चक्क कार्यकर्त्याच्या मोटरसायकलवरून तीन मीटरचा प्रवास चिखल तुडवत पार केला आहे (Jayant Patil inspected the villages affected by heavy rains in Marathwada.).

काही दिवसांपूर्वी अचानक झालेल्या अतिवृष्टीमुळे बिलदरी येथील पाझर तलाव ओव्हर फ्लो होऊन फुटले होते. यामुळे इथे पूराची स्थिती निर्माण झाली होती.

जयंत पाटील मराठवाड्यातील पुरग्रस्तांच्या मदतीला धावले

दिलीप वळसे पाटील यांनी जयंत पाटील यांचे मानले आभार

जयंत पाटील यांनी येथील परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच पाझर तलावाच्या दुरुस्तीचे आदेश दिले व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई महाविकास आघाडी सरकार देईल असे आश्वासन पाटील यांनी दिले.

मंत्री जयंत पाटील यांनी दुचाकी , ट्रॅक्टरमधून केला प्रवास , पुरग्रस्तांचे गाऱ्हाणे घेतले ऐकून

Many ready to return to NCP, says Jayant Patil

चाळीसगाव येथील आजूबाजूचा परिसर हा पाझर तलावातील पाण्यावर अवलंबून आहे. येथील शेती आणि घरगुती वापरासाठी या तलावातील पाण्याचा उपयोग केला जातो. परंतु तलाव फुटल्यामुळे येथील स्थानिकांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घेतली जाईल असे आश्वासन जयंत पाटील यांनी येथील नागरिकांना दिला.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी