31 C
Mumbai
Monday, May 20, 2024
Homeराजकीयमराठी माणसांनो, चालते व्हा; मुंबई गुजरात्यांसाठी खाली करा

मराठी माणसांनो, चालते व्हा; मुंबई गुजरात्यांसाठी खाली करा

   मुंबई आता मराठी माणसांची राहिलेली नाही. म्हणून मराठी माणसांनो तुम्ही मुंबईतील तुमची घरं विका. नोकऱ्या सोडा. सगळं बिऱ्हाड पाठीवर घेवून लवकर चालते व्हा. कारण इथल्या गुजराती(Gujarat) व परप्रांतियांची तीच इच्छा आहे. इथल्या गुजरात्यांना डोक्यावर घेणं, आणि मराठी लोकांना लाथाडणं हे भारतीय जनता पक्षाचं आद्य कर्त्यव आहे(Kicking Marathi people is the primary duty of Bharatiya Janata Party).
तुम्ही सगळ्यांनी रेणूका शहाणे यांचं ट्विट पाहिलंच असेल. अत्यंत पोटतिडकीनं त्यांनी ही ट्विट केलंय. गिरगावमधील एका कंपनीत नोकरीसाठीची जाहिरात निघते. एचआर असलेली संबंधित महिला त्या जाहिरातीत मराठी उमेदवारांनी या नोकरीसाठी अर्ज करू नयेत अशा आशयाची सूचना लिहिते. बघा, परप्रांतियांची अरेरावी किती वाढलीय.
हा संतापजनक प्रकार सुरू असतानाच घाटकोपरमधील(Ghatkopar) गुजरात्यांच्या पोटातून मराठीद्वेष बाहेर पडला. ईशान्य मुंबई मतदारसंघातून मिहीर कोटेचा हा गुजराती धनिक निवडणूक लढवित आहे. त्यांच्या विरोधात शिवसेनेचे(Shivsena) संजय दिना पाटील समोर आहेत. संजय दिना पाटील यांचे कार्यकर्ते घाटकोपरमध्ये प्रचारपत्रकं वाटत होते. त्यावेळी ते एका सोसायटीमध्ये गेले. त्यावेळी तेथील बदमाश गुजरात्यांनी संजय दीना पाटील(Sanjay Dina Patil) यांची प्रचारपत्रके वाटण्यास मज्जाव केला.
     या हरामखोर गुजरात्यांना एका भूमिपूत्र उमेदवाराची प्रचारपत्रकं वाटताना अडविण्याची हिंमत होतेच कशी ? प्रेक्षकहो, मी तुम्हांस एक मोठा मुद्दा लक्षात आणून देतो. संजय दिना पाटील हे मराठी आहेतच. पण ही मुंबई अक्षरशः संजय पाटील यांच्या बापाची, म्हणजेच दिना बामा पाटील यांची आहे. त्यांच्या पूर्वजांची आहे. त्यांच्या नातलगांची आहे. या मुंबईतील जवळपास सगळेच तुम्ही आम्ही मराठी लोकं महाराष्ट्रभरातून इथं आलोय. परराज्याचील उपरे सुद्धा बाहेरचेच. पण संजय दिना पाटील इथलेच आहेत. ते आगरी समाजाचे आहेत. ही मुंबई आगरी आणि कोळ्यांची आहे. आगरी आणि कोळी समाज मुंबईतील सात बेटांवर राहायचा. पोर्तूगिजांनी ही मुंबई ब्रिटनच्या राजपुत्राला लग्नात हुंडा म्हणून दिली होती. त्यानंतर ब्रिटीशांनी व्यापारी हेतूने मुंबईचा विस्तार केला. पोटं भरण्यासाठी या मुंबईत इराणी, गुजराती असे व्यापारी लोकं आली.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी