34 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeराजकीयमुख्यमंत्र्यांना फडणविसांचे पत्र, पूरग्रस्तांच्या मदतीसाठी केल्या 26 तातडीच्या आणि दीर्घकालीन मागण्या

मुख्यमंत्र्यांना फडणविसांचे पत्र, पूरग्रस्तांच्या मदतीसाठी केल्या 26 तातडीच्या आणि दीर्घकालीन मागण्या

टीम लय भारी
मुंबई: विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राच्या आपत्तीग्रस्त भागाचा दौरा केला.या दौऱ्यात परिस्थितीचा आढावा घेऊन, त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहले आहे. मुख्यमंत्र्यांकडून आपत्तीग्रस्त भागातील लोकांसाठी 26 मागण्या करणारे पत्र लिहिले आहे. (Letter to uddhav thackeray by devendra fadanvis about demands for maharashtra people)

25 जुलै रोजी कोकण तर, 28 ते 30 जुलै या कालावधीत पश्चिम महाराष्ट्रातील परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यासह 26 ठिकाणी प्रत्यक्ष भेटी देऊन पूरग्रस्तांशी चर्चा केली.

अवैध्य दगड खाणीवर छापा, दोन मशीन जप्त

भाजप नेते बाबूल सुप्रीयो यांचा राजकारणाला रामराम

“कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांचा माझे सहकारी प्रवीण दरेकर यांच्यासमवेत दौरा करून पूरग्रस्तांच्या व्यथा आणि गरजा समजून घेतल्यानंतर, तातडीने करावयाच्या आणि दीर्घकालीन उपायोजना यांबाबत मा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेजी यांना पत्र लिहीत आहे.” असे देवेंद्र फडणवीसजी म्हणाले.

देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या मागण्या पुढीप्रमाणे:

तातडीने करावयाच्या बाबीयांमध्ये, दुकानांमधून, घरांमधून गाळ काढण्यासाठी रोख किंवा बँक खात्यात भरपाई, मृतांच्या कुटुंबियांना तातडीने मदत, परिसर स्वच्छतेची कामे, अन्न, वस्त्र, औषधी, तात्पुरता निवाऱ्याची सोय, पिकांच्या नुकसानीचे पैसे , जनावरांच्या मृत्यूची पशुधन भरपाई तातडीने बँक खात्यात जमा करावे. मासेमारांना मदत, मूर्तिकार, कुंभारयांना मदतीची योजना, शेतकऱ्यांची वीजबिले माफ, वाहून गेलेली कागदपत्र पुनः तयार करून देणे इत्यादी सारख्या काही महत्वाच्या गोष्टींचा यात समावेश आहे.

 तातडीने करावयाच्या मागण्याचे फोटो

Letter
तातडीने करावयाच्या मागण्याचे फोटो

मुख्यमंत्र्यांना फडणविसांचे पत्र, पूरग्रस्तांच्या मदतीसाठी केल्या 26 तातडीच्या आणि दीर्घकालीन मागण्या

दीर्घकालीन करावयाच्या बाबींमध्ये, पुढील प्रमाणे काही गोष्टी आहेत त्यामध्ये, कोकणात स्वतंत्र आपत्ती प्रबंध यंत्रणा उभारणे, दराडग्रस्त भागातील लोकांचे पुनर्वसन, कोयनानगर येथील लोकांचे कायमस्वरूपी पुनर्वसन, कोल्हापूरच्या बास्केट ब्रीज बाबत तातडीने कारवाई, चिखली, आंबेगाव येथील रखडलेले पुनर्वसन सुरू करुन, कागदपत्र तयार करावे, त्याचबरोबर राज्याच्या दीर्घकालीन उपाययोजनांवर एक सर्वपक्षीय बैठक तातडीने घ्यावी.

दीर्घकालीन करावयाच्या मागण्यांचे फोटो

मुख्यमंत्र्यांना फडणविसांचे पत्र, पूरग्रस्तांच्या मदतीसाठी केल्या 26 तातडीच्या आणि दीर्घकालीन मागण्या
दीर्घकालीन करावयाच्या मागण्यांचे फोटो

मुख्यमंत्र्यांना फडणविसांचे पत्र, पूरग्रस्तांच्या मदतीसाठी केल्या 26 तातडीच्या आणि दीर्घकालीन मागण्या

सरकारने मदतीचे आदेश तात्काळ काढावे, आणि झालेले नुकसान जमेल तेवढे भरून काढावे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी