28.5 C
Mumbai
Saturday, May 4, 2024
Homeमहाराष्ट्रअवैध दगड खाणीवर छापा, दोन मशीन जप्त

अवैध दगड खाणीवर छापा, दोन मशीन जप्त

टीम लय भारी
जामखेड : तालुक्यात अवैध दगड खाणी व खडी क्रेशर केंद्रांचा मोठा सुळसुळाट झाला आहे. खाण माफियांविरोधात कारवाई व्हावी अशी मागणी सातत्याने होत आहे. मात्र याकडे सोईस्कर दुर्लक्ष ठरलेले आहे. ( Mining is illegal in jamkhed, government should take action against them)

मात्र अचानक महसुल विभागाने खाण माफियांविरोधात कारवाईचा दंडुका उगारला आहे.

भाजप नेते बाबूल सुप्रीयो यांचा राजकारणाला रामराम

Mining
अवैध्य दगड खाणीवर छापा, दोन मशीन जप्त

प्रसाद लाड यांच्या वक्तव्यावर सदा सरवणकर यांचं प्रतिउत्तर

जामखेड तालुक्यातील गोयकरवाडी हद्दीमध्ये सुरू असलेल्या अवैध खाणींवर प्रांताधिकारी अर्चना नष्टे यांच्या पथकाने छापेमारी केली या कारवाईत महसुल विभागाने एक ब्रेकर मशीन व पोकलेन मशीन जप्त केले आहे. ही कारवाई करण्यात आली आहे.

गोयकरवाडी परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून अवैध दगड खाणी सुरू आहेत. मात्र प्रत्येक वेळी जुजबी कारवाई होते. येथील अवैध खाणींचा मुद्दा विधानपरिषदेतही गाजला आहे परंतु या खाणी सुरूच आहेत. या खाणी बंद व्हाव्यात यासाठी  पुढच्या महिन्यात एक उपोषण होणार होते. त्याआधीच महसुल विभागाने गोयकरवाडी परिसरात छापेमारी केली.

टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय महिला हॉकी संघाने रचला इतिहास

Maharashtra’s First Ever Zika Virus Case Reported In Pune District

या छापेमारीत दोन मशीन जप्त करण्यात आल्या. जप्त केलेल्या मशीन तहसिल कार्यालयात घेऊन जाण्यासाठी महसुल विभागाचा दोन ट्रेलर भाड्याने करावे लागले होते.  संबंधितांविरुद्ध २० लाखांची दंडात्मक कारवाई केली जाणार आहे असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

या कारवाईच्या पथकात तहसिलदार विशाल नाईकवाडे, पोलिस निरीक्षक संभाजीराव गायकवाड,  मंडलाधिकारी बाळासाहेब लटके, तलाठी प्रफुल्ल साळवे, पोलिस नाईक अविनाश ढेरे सह आदी सहभागी झाले होते. येथील खडी क्रेशर सील करण्यात आले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी