राजकीय

Maharashtra Politics : ‘बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळेच भाजप वाचला’

कोणाला काही कळायच्या आत बंडखोरीमुळे शिवसेनेत दोन गट पडले. इतक्या वर्षांच्या निष्ठेला वेगळीच दिशा देत शिवसेनेतील मोठ्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंकडे पाठ फिरवत एकनाथ शिंदे यांच्या गटात जाण्यात धन्यता मानली, याचे पडसाद वेगवेगळ्या पद्धतीने संपुर्ण राज्यभर पडले परंतु सत्तालालसेच्या राजकीय वलयात मश्गूल असणाऱ्या नेतेमंडळींचा एक वेगळाच चेहरा या निमित्ताने जनतेला पाहायला मिळाला. राज्यात सत्तासंघर्षामुळे नवे सरकार स्थापन झाले असले तरीही सत्ताधारी बाकावर बसलेले नेतेमंडळी विरोधकांना वेगवेगळ्या मुद्यांवरून अडचणीत आणत यच्छेद तोंडसुख घेत आहेत. शिंदे गटातील नेते गुलाबराव पाटील यांनी सुद्धा नुकतीच आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली त्यावर चंद्रकांत खैरे यांनी पाटलांचा चांगलाच समाचार घेतला आहे.

एकही संधी न सोडता शाब्दिक वार करीत एकमेकांच्या अंगावर धावून जाणारे शिवसेना, शिंदेसेनेतील नेते दरवेळी त्यांनी केलेल्या वेगळ्या वक्तव्यावरून चर्चेत येत असतात. यावेळी शिंदे गटातील नेते गुलाबराव पाटील यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली आहे. यावेळी पाटील म्हणाले, आम्ही शिवसेनेत होतो तेव्हा ‘आदित्य ठाकरे गोधडीतही नव्हते’ असा म्हणून त्यांनी टोला लागावला आहे. या वक्तव्याचा समाचार घेत शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी गुलाबराव पाटील यांच्यावर टीका करत ‘पानटपरीवाल्याला गोधडी दाखवतो’ असे म्हटले आहे.

हे सुद्धा वाचा…

Ratnagiri News : माजी पंचायत समिती सभापती बेपत्ता झाल्याने एकच खळबळ

BJP appoints new state In charge : भाजपमधील चार मराठी नेत्यांचे प्रमोशन!

Ganpati Visarjan 2022 – ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’

चंद्रकांत खैरे यांनी माध्यमांशी नुकताच संवाद साधला त्यावेळी गुलाबराव पाटील यांच्या वक्तव्यावर त्यांनी प्रत्युत्तर दिले. यावेळी चंद्रकांत खैरे म्हणाले, तो फालतू पानटपरीवाला भाषणात मी बाळासांहेबांमुळे मोठा झालो म्हणायचा. आता उद्धव ठाकरेंच्या मुलाला तुम्ही असं बोलता. गुलाबराव पाटलांना गोधडी दाखवून देतो. संभाजीनगरमध्ये ये तुझी हिम्मत दाखवतो. भ्रष्टाचार किती केला हे माहित आहे, आम्ही सोडणार नाही असे म्हणून चंद्रकांच खैरे यांनी गुलाबराव पाटील यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

चंद्रकांत खैरे पुढे म्हणाले, ठाकरेंच्या बाबतीत कोणी बोलत असेल तर, तर सहन करणार नाही. बाळासाहेबांमुळेच मोदी वाचले असे म्हणत खैरे यांनी भाजपला या निमित्ताने आठवण करून देत टीका केली आहे. दरम्यान, ते 32 वर्षाचं पोरगं आदित्य ठाकरे आमच्यावर टीका करतं, तू गोधडीत पण नव्हता. तेव्हापासून आम्ही शिवसेनेत आहोत असे म्हणत आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली होती.

सुचित्रा पेडणेकर

Recent Posts

संजय राऊत यांच्या बेजबाबदार वादग्रस्त वक्तव्या विरोधात तक्रार

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी अहमदनगर येथील जाहीर सभेत…

19 mins ago

उमेश कामत आणि प्रिया बापटसोबत ‘जर तरची गोष्ट’ रंगणार

सुपरस्टार उमेश कामत आणि प्रिया बापट (Umesh Kamat and Priya Bapat) यांची प्रमुख भूमिका असलेले…

39 mins ago

नाशिक मधील निओमेट्रोचा प्रकल्प पूर्ण होण्याची मुदत संपली

वेगाने वाढणाऱ्या नाशिक शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकट करण्याच्या उद्देशाने तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी…

55 mins ago

महाविकास आघाडीतर्फे पुढील आठवड्यात उद्धव ठाकरे,नाना पटोले यांच्या प्रचार सभा

नाशिक लोकसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे (Maha Vikas Aghadi) उमेदवार राजाभाऊ वाजे यांना सर्व थरातून…

2 hours ago

पुरातत्व खात्याचा संचालक तेजस गर्गे फरार, पोलीस पथके रवाना

अडीच लाख दरमहा पगार घेणारे आणि नाशिकमधील प्रख्यात शिल्पकार मदन गर्गे यांचे सुपुत्र राज्य पुरातत्त्व…

3 hours ago

मुंबई शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीला शिक्षक गैरहजर….. ???

दि. ८ मे रोजी भारत निर्वाचन आयोगाने प्रेस नोट जारी करत मुंबई शिक्षक मतदार संघ…

3 hours ago