राजकीय

Rohit Pawar : रोहित पवारांकडून भाजप नेत्यांना बारामतीचं आवतणं…

भाजपच्या नेत्यांनी आता बारामतीवर ‘लक्ष्य’ केंद्रीत केले आहे. लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे, तसेच त्यानंतर विधानसभा निवडणुकीत अजित पवार या दोन्ही भावंडांना चितपट करण्यासाठी भाजपचे नेते आसुसलेले आहेत. सुप्रिया सुळे व अजित पवार यांना अडचणीत आणले की, शरद पवार कुटुंबाचे राजकारणच धोक्यात येईल. निवडणूक काळात पवार कुटुंबाला बारामतीत मग्न केले की, अख्खा महाराष्ट्र भाजपला पादाक्रांत करता येईल, असा भाजपच्या नेत्यांचा होरा आहे. परंतु डगमगतील तर पवार कुटुंब कसले. ‘कुणीही यावे आणि बारामतीत प्रयोग करून जावे. आम्हाला काही फरक पडत नाही’ अशा कणखर मानसिकतेत पवार कुटुंबिय आहेत.

आमदार रोहित पवार यांनी केलेल्या एका वक्तव्यातूनच पवार कुटुंबांची ही मानसिकता समोर आली आहे. पवार यांनी भाजपच्या नेत्यांना बारामतीत येण्याचे खुले आवतणं दिले आहे. भाजपच्या नेत्यांनी बारामतीत आलंच पाहीजे. येथे झालेला विकास त्यांनी पाहावा, आणि त्यावरून विकासाचे राजकारण करावे असे आव्हानवजा आवतणं त्यांनी दिले आहे.

भाजपला मुंबई ठाकरेमुक्त करायची आहे, तर बारामती पवारमुक्त करायची आहे. त्यासाठी भाजपच्या नेत्यांनी लक्ष केंद्रीत केले आहे. पण ते सोपे नाही. लोकांची विचारसरणी भाजपला नीट माहीत नाही, याकडेही रोहित पवार यांनी लक्ष वेधले आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

हे सुद्धा वाचा…

Maharashtra Politics : ‘बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळेच भाजप वाचला’

Ratnagiri News : माजी पंचायत समिती सभापती बेपत्ता झाल्याने एकच खळबळ

Ganpati Visarjan 2022 – ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’

चंद्रशेखर बावनकुळे नव्यानेच प्रदेशाध्यक्ष झाले आहेत. त्यामुळे त्यांच्या बातम्या येत आहेत. नव्याने पदावर आलेल्या व्यक्तीच्या अशा बातम्या येत असतात. नव्या पदाधिकाऱ्याला काहीतरी करून दाखवायची इच्छा असते. त्यामुळे चंद्रशेखर बावनकुळे काहीतरी करून दाखविण्यासाठी धडपडत असतील तर त्यात वावगे काही नाही, असे रोहित पवार यांनी म्हटले आहे.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण या लवकरच बारामती दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर चंद्रशेखर बावनकुळे बारामतीमध्ये ठाण मांडून बसले आहेत. स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते यांना प्रोत्साहित करीत आहेत. पवार कुटुंबियांच्या राजकारणातील कच्चे दुवे शोधत आहेत. या कच्च्या दुव्यांवर भविष्यात कसे काम करता येईल, यासाठी प्रयत्न करीत आहेत.

बारामती लोकसभा मतदारसंघात भाजप – एकनाथ शिंदे गटातील हर्षवर्धन पाटील, राहूल कूल, विजय शिवतारे इत्यादी मातब्बर नेते आहेत. अशा नेत्यांवर भाजपची भिस्त आहे. या शिवाय आणखी नेत्यांना जवळ करायचे, आणि त्यांना बळकटी देवून पवार कुटुंबाला अडचणीत आणायचे यासाठी प्रयत्न चालविले आहेत. परंतु पवार कुटुंबियांची मतदारसंघावर असलेली पकड लक्षात घेता भाजपच्या उमेदवाराचे डिपॉझिट सुद्धा वाचविणे कठीण जाईल असे बोलले जात आहे.

तुषार खरात

Recent Posts

सर्व्हिस रिव्हॉल्वरचा गैर वापर करणारा पोलीस नाईक बडतर्फ !

साप्ताहिक सुट्टीच्या दिवशी सर्व्हिस रिव्हॉल्वर  पोलीस ठाण्यात जमा न करता घरी घेऊन जाणाऱ्या पोलीस नाईक…

59 mins ago

नाशिक कलावंतानी साकारला शास्त्रीय नृत्यांचा सुंदर अविष्कार; तीनजागतिक विश्व विक्रमांची नोंद

तीनजागतिक विश्व विक्रमांची  नोंद- १३तासाहुन अधिक काळ सादरीकरण,आर्ट असोसिएटसचा पुढाकार नाशिक कुठल्याही एका शास्त्रीय नृत्यापुरते…

1 hour ago

उद्धव ठाकरेंना झटका! एम के मढवी यांना अटक

उद्धव ठाकरे यांना मोठा झटका बसला आहे. उद्धव ठाकरे  गटाचे पदाधिकारी एम. के. मढवी  (M…

2 hours ago

शरद पवार गटाला धक्का! स्टार प्रचारक अनिल देशमुखांवर गुन्हा

देशात सध्या लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत आहे. लोकसभा निवडणुकीचे दोन टप्पे पार पडले आहे. तर…

3 hours ago

‘मी कोणाच्या बापाला घाबरत नाही,’ छगन भुजबळ मनोज जरांगेच्या टीकेवर भुजबळ संतापले

ओबीसींचा लढा उभारताना घाबरलो नाही, आता कशाला घाबरायचं. माझ्यावर अनेक वेळा हल्ले झाले. किती शिव्या,…

4 hours ago

लोकांमध्ये आर्थिक साक्षरता निर्माण करणे ही काळाची गरज; आयसीएआय नाशिक शाखा

अनेकदा सामान्य माणूस कर नियोजन, करभरणा, कर बचत, लेखापरीक्षण, बदलते कायदे यांच्यापासून लांब राहणे पसंत…

4 hours ago