28.5 C
Mumbai
Saturday, May 4, 2024
Homeमहाराष्ट्रBJP appoints new state In charge : भाजपमधील चार मराठी नेत्यांचे प्रमोशन!

BJP appoints new state In charge : भाजपमधील चार मराठी नेत्यांचे प्रमोशन!

राज्याचे माजी मंत्री विनोद तावडे यांना बिहारचे प्रभारी बनवण्यात आले आहे. तर प्रकाश जावडेकर यांना केरळचे प्रभारी बनवण्यात आले आहे. ओम माथूर यांची छत्तीसगडमध्ये नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचबरोबर पश्चिम बंगालची जबाबदारी मंगल पांडे यांच्याकडे देण्यात आली आहे. मंगल पांडे बिहारमध्ये आरोग्य मंत्री आहेत.

भारतीय जनता पक्षाने (Bhartiya Janta Party) आगामी लोकसभा निवडणूक डोळयासमोर ठेवत राष्ट्रीय पातळीवर पक्षात मोठे फेरबदल केले आहेत. आजच भाजप पक्षाने या संदर्भात अधिकृतरित्या राज्यांच्या नवीन प्रभारींची घोषणा केली आहे. यामध्ये चार मराठी नेत्यांचे प्रमोशन झाले आहे. यामध्ये विनोद तावडे (Vinod Tawde), पंकजा मुंडे (Pankaja Munde), प्रकाश जावडेकर (Prakash Jawdekar) आण‍ि विजया रहाटकर (Vijaya Rahatkar) यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, गणेशोत्सवादरम्यान मुंबईच्या दौऱ्यावर केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे वरिष्ठ नेते अमित शाह असताना त्यांच्या सोबत भाजपचे सरचिटणीस विनोद तावडे दिसले होते. याचवेळी तावडे यांची जवळीक अमित शाह यांच्याशी दिसून आली होती आणि आता थेट राज्यांच्या नवीन प्रभारींच्या घोषणेत तावडे यांचे नाव पाहायला मिळत आहे.

काही दिवसांपूर्वी भाजपला बिहारमध्ये मोठा धक्का बसला आहे. भाजपची साथ सोडून आरजेडीसोबत नितीश कुमार यांनी सत्ता स्थापन केली आहे. आता बिहारमध्ये पक्ष आणखी बळकट करण्याची जबाबदारी ही तेथील स्थानिक नेत्यांसोबतच विनोद तावडे यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.

राज्याचे माजी मंत्री विनोद तावडे यांना बिहारचे प्रभारी बनवण्यात आले आहे. तर प्रकाश जावडेकर यांना केरळचे प्रभारी बनवण्यात आले आहे. ओम माथूर यांची छत्तीसगडमध्ये नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचबरोबर पश्चिम बंगालची जबाबदारी मंगल पांडे यांच्याकडे देण्यात आली आहे. मंगल पांडे बिहारमध्ये आरोग्य मंत्री आहेत.

हे सुद्धा वाचा –

Ganpati Visarjan 2022 – ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’

Congress President Election: राहुल गांधी – पक्षाच्या अध्यक्षपदाच्या निवडणूकी बद्दल कोणताही गोंधळ नाही

BMC : बीएमसीच्या परीक्षा घोटाळया विरोधात कामगार संघटना आक्रमक, परीक्षाच रद्द करण्याची केली मागणी

आमदार विजय रुपानी यांना पंजाबचे प्रभारी तर डॉ.नरेंद्र सिंह रैना यांना सहप्रभारी बनवण्यात आले आहे. दादरा आणि नगर हवेली आणि दमण आणि दीवचे प्रभारी खासदार विनाडे सोनकर यांना नियुक्त करण्यात आले आहे. खासदार राधामोहन अग्रवाल यांची लक्षद्वीपचे प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

खासदार प्रकाश जावडेकर यांना केरळचे प्रभारी, तर राधामोहन अग्रवाल यांना सहप्रभारी बनवण्यात आले आहे. मुरलीधर राव यांना मध्य प्रदेशचे प्रभारी बनवण्यात आले आहे. मध्य प्रदेशात पंकजा मुंडे आणि डॉ.रमाशंकर कथेरिया यांना सहप्रभारी बनवण्यात आले आहे.

लक्ष्मीकांत वाजपेयी यांना झारखंडची जबाबदारी देण्यात आली आहे. तर बिप्लब कुमार देब यांना हरियाणाचे प्रभारी बनवण्यात आले आहे. तरूण चुघ यांना तेलंगणाचे प्रभारी बनवण्यात आले आहे. त्याचबरोबर अरविंद मेनन यांची तेलंगणचे सहप्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपने अरुण सिंह यांना राजस्थानचे प्रभारी खासदार केले आहे. राजस्थानमध्ये विजया रहाटकर सहप्रभारी असतील. खासदार महेश शर्मा यांना त्रिपुराचे प्रभारी बनवण्यात आले आहे.

अश्विन शेश्वरे
अश्विन शेश्वरेhttp://laybhari.in
He writes about National and Maharashtra Politics, Education, Health, Civic, Legal, Crime and Sports beat for LayBhari News.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी