30 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
Homeराजकीयपंतप्रधान मोदींच्या बैठकीवर ममता बॅनर्जी संतापल्या

पंतप्रधान मोदींच्या बैठकीवर ममता बॅनर्जी संतापल्या

टीम लय भारी

मुंबई :-  कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशातील विविध जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद दूरदृश्यप्रणालीद्वारे थेट संवाद साधला. यामध्ये महाराष्ट्रातील 17 जिल्हाधिकाऱ्यांचा समावेश होता. याशिवाय यावेळी विविध राज्यांचाही समावेश होता. परंतु पश्चिम बंगालच्या एकाही जिल्हाधिकाऱ्यांनी हजेरी लावली नाही. स्वत: पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जीच हजर होत्या. यावेळी ममता बॅनर्जींनी पंतप्रधान मोदींवर संताप व्यत्त्क केला आहे (Mamata Banerjee has vented her anger on Prime Minister Modi).

पंतप्रधान मोंदींनी (Prime Minister Modi) आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे महाराष्ट्र, छत्तीसगड, हरियाणा, केरळ, ओदिशा, पुद्दुच्चेरी, राजस्थान, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल आणि आंध्रप्रदेश या राज्यांमधील जिल्हाधिकाऱ्यांशी आणि काही अधिकाऱ्यांशी संवाद साधला. या दरम्यान या राज्यांचे मुख्यमंत्री देखील या ऑनलाईन चर्चेत सहभागी झाले होते.

केंद्र सरकारच्या लस उत्पादन निर्णयांबाबत नितीन गडकरी अलिप्त

मोदी फक्त गुजरातचे पंतप्रधान आहेत का? त्यांचा इतर राज्यांशी संबंध नाही का? : पृथ्वीराज चव्हाण

Experts raise concerns on long Covid symptoms appearing after six months to a year from infection

केंद्राकडे ना कोणतं धोरण, ना कोणती उपाययोजना, असे असूनही बिगर भाजपशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना बोलूच दिले नाही, असा आरोप ममता बॅनर्जींनी (Mamata Banerjee) केला. मोदींसोबतच्या व्हिडीओ कॉन्फरन्सिंगनंतर ममता बॅनर्जींनी (Mamata Banerjee) पत्रकार परिषद घेऊन संताप व्यत्त्क केला आहे.

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) म्हणाल्या की, “जर राज्यांना बोलण्याची परवानगी नव्हती तर त्यांना का बोलावण्यात आले? बोलण्यास परवानगी न देण्यात आल्याबद्दल सर्व मुख्यमंत्र्यांनी निषेध नोंदवायला हवा.”

आम्हाला बोलूच दिले नाही

ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) म्हणाल्या, “या बैठकीला दहा राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित होते. मुख्यमंत्री म्हणून मी उपस्थित होते, त्यामुळे मी जिल्हाधिकाऱ्यांना या बैठकीला उपस्थित राहू दिले नाही. परंतु भाजपचे मुख्यमंत्री सोडता इतर मुख्यमंत्र्यांना बोलूच दिले नाही.”

भाजपचे काही मुख्यमंत्री आणि पंतप्रधान मोदी यांनी आपआपले मुद्दे मांडले. परंतु आम्हाला बोलण्याची संधी मिळाली नाही. सर्व मुख्यमंत्री केवळ चूपचाप बसून होते. कोणीही काहीही बोलले नाही. आम्हाला व्हॅक्सीन अर्थात लसीची मागणी करायची होती, पण बोलूच दिले नाही, असा आरोप ममता बॅनर्जींनी (Mamata Banerjee) केला.

कोरोना कमी होत असल्याचे मोदी म्हणाले. परंतु आधीही असेच झाले होते. आम्ही तीन कोटी लसीची मागणी करणार होतो. मात्र काहीच बोलू दिले नाही. या महिन्यात 24 लाख लसी मिळणार होत्या, पण केवळ 13 लाख लसी मिळाल्या, असे ममता बॅनर्जी (Mamata Banerjee)  यांनी सांगितले

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी