30 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
Homeराजकीयआरक्षणाच्या नावाखाली दोन्ही समाजात फडणवीस फूट पाडत आहे, नवाब मलिकांचा घणाघात

आरक्षणाच्या नावाखाली दोन्ही समाजात फडणवीस फूट पाडत आहे, नवाब मलिकांचा घणाघात

टीम लय भारी

मुंबई :-  सुप्रीम कोर्टाने मराठा समजाचे आरक्षण रद्द केले आहे. परंतु मराठा समाजाला सुप्रीम कोर्टाचा हा निर्णय मान्य नाही. मराठा समाज आक्रमक झाल आहे. ओबीसी समाजाचे आरक्षण अबाधित ठेवून जे मराठा आरक्षण (Maratha reservation) आहे ते अतिरिक्त आरक्षण दिले पाहिजे ही पहिल्यापासून राज्य सरकारची भूमिका आहे. परंतु देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि भाजप दोन्ही बाजुने खेळ खेळत आहे. आरक्षणाच्या नावाखाली दोन्ही समाजात फडणवीस फूट पाडत आहे, नवाब मलिक यांनी टिका केली (In the name of reservation, Fadnavis is dividing both the societies, criticized Nawab Malik).  

नवाब मलिक (Nawab Malik) म्हणाले, “देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मराठा समाजाचे 16 टक्के आरक्षण योग्यच आहे तशी भूमिका केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टात मांडावी अशी विनंती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना करावी. सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षणावर (Maratha reservation) राज्य सरकारला अधिकारच नाही असा निकाल दिला आहे. संसदेत केंद्राने राज्याचा अधिकार अबाधित राहिल असे स्पष्ट केले होते. परंतु सुप्रीम कोर्टाने निकाल दिल्यावर केंद्राने फेरविचार याचिका दाखल केली आहे. परंतु ती महाराष्ट्रासाठी नसून इतर सर्व राज्ये तुटून पडणार असल्याने दाखल केली.”

पंतप्रधान मोदींच्या बैठकीवर ममता बॅनर्जी संतापल्या

मोदी फक्त गुजरातचे पंतप्रधान आहेत का? त्यांचा इतर राज्यांशी संबंध नाही का? : पृथ्वीराज चव्हाण

Full text: ‘India needs action now,’ say 116 former bureaucrats in letter to Modi

वकीलांना ‘चीत भी मेरी और पट भी मेरी’ या पध्दतीने बोलता येते”

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे वकील आहेत. त्यामुळे वकीलांना ‘चीत भी मेरी और पट भी मेरी’ या पध्दतीने बोलता येते असा टोलाही नवाब मलिक (Nawab Malik) यांनी लगावला आहे. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) कायद्याच्या चौकटीत राहून केले असल्याचे सांगत आहेत, तर सुप्रीम कोर्टाने राज्याला अधिकारच नाही सांगितले आहे. राज्याचे अधिकार अबाधित ठेवण्यासाठीच केंद्राने फेरविचार याचिका दाखल केली आहे असे नवाब मलिक (Nawab Malik) म्हणाले.

आधीपासून ओबीसींचा कोटा अबाधित ठेवून मराठा समाजाला अतिरिक्त आरक्षण देण्याचा निर्णय”

“सुरुवातीपासूनच म्हणजे आरक्षण देण्यात आले तेव्हापासून ओबीसींचा कोटा अबाधित ठेवून अतिरिक्त आरक्षण देण्याचा पहिल्यांदा सुध्दा निर्णय झाला होता. आता आमच्या आघाडी सरकारमध्ये जो कायदा मंजूर करण्यात आला त्यामध्येही एकमताने प्रस्ताव आहे. अजून यापुढे ही राज्य सरकारची भूमिका तीच राहणार आहे,” असे ही नवाब मलिक (Nawab Malik) यांनी स्पष्ट केले.

आमची भूमिका आहे तीच भाजपची भूमिका, मग राजकारण का?”

आता आमची भूमिका आहे तीच भाजपची भूमिका आहे. याच्यावर एकमत असताना त्याच्यावर भाष्य करण्याची गरज नाही. यावर भाष्य करुन ते काय संदेश देऊ इच्छित आहेत. समाजासमाजात भेद निर्माण करण्यासाठी बोलत आहे का? असा प्रश्न निर्माण होत असल्याचे ही नवाब मलिक (Nawab Malik) यांनी सांगितले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी