31 C
Mumbai
Friday, May 17, 2024
HomeराजकीयAtul Bhatkhalkar : आमदार अतुल भातखळकरांचा शिवसेनेवर हल्ला

Atul Bhatkhalkar : आमदार अतुल भातखळकरांचा शिवसेनेवर हल्ला

टिम लय भारी

मुंबई : भाजपचे आमदार अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी शिवसेनेवर निशाला साधला आहे. कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या परिसरातील १८ गावे वगळण्याच्या राज्य सरकारच्या दोन्ही अधिसूचना मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी बेकायदा ठरवल्या. न्यायालयाच्या या निर्णयाने ती १८ गावे आता महापालिका क्षेत्रातच राहतील हे स्पष्ट झाले आहे.

भातखळकर यांनी आपल्या ट्विटरवर ट्विट करत म्हणाले, “शिवसेनेला मोठा धक्का; ‘ती’ १८ गावं पालिकेतच. कल्याण-डोंबिवली महापालिकेतून १८ गावे वगळण्याच्या संदर्भात राज्य सरकारने काढलेल्या दोन्ही अधिसूचना मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी बेकायदा ठरवून रद्दबातल केल्या..थपडेवर थप्पड…थपडेवर थप्पड…”, असे म्हणत त्यांनी शिवसेनेला डिवचलं आहे.

काय म्हणाले न्यायालय?

राज्य सरकारने गावे वगळण्याचा निर्णय घेताना पालिकेच्या महासभेचा अभिप्राय मागवणे गरजेचे असताना, सरकारने आयुक्तांचा अभिप्राय मागवला. तसेच आयुक्तांचा अभिप्राय हा पालिकेचा अभिप्राय असल्याचे सांगत कायदेशीर प्रक्रियेला बगल दिली. त्यामुळे सरकारचा हा निर्णय बेकायदेशीर असल्याचा निर्णय न्यायमूर्ती दिपाशंकर दत्ता आणि न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठाने दिला.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी