31 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeमुंबईशेतकऱ्यांबाबत मोदी सरकारचे धोरण फसवे आणि दुफळी निर्माण करणारे; पृथ्वीराज चव्हाण यांची...

शेतकऱ्यांबाबत मोदी सरकारचे धोरण फसवे आणि दुफळी निर्माण करणारे; पृथ्वीराज चव्हाण यांची टीका

टीम लय भारी

मुंबई : महिनाभरापासून दिल्लीत कडाक्‍याच्या थंडीत शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. अदयाप यावर तोडगा निघाला नाही. त्यातच शेतकरी दिन झाला. त्या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी ट्विट करून मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. जमीन अधिग्रहण कायदा असो, की किमान हमीभाव अथवा शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट योजना असो मोदी सरकारचे शेतकऱ्यांबाबचे धोरण नेहमीच अप्रामाणिक, फसवे आणि दुफळी निर्माण करणारे राहिले आहे, अशी टीका त्यांनी केली आहे.
देशाला अन्नधान्यांच्या बाबतीत स्वयंपूर्ण आणि अन्नसुरक्षा प्रदान करणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याचा मी ऋणी आहे. दुर्दैवाने शेतकरी दिनादिवशीच राजधानी दिल्लीच्या वेशीवर लाखो शेतकरी उघड्यावर, कडाक्‍याच्या थंडीत आंदोलन करत असल्याचे चव्हाण यांनी म्हंटल आहे.

अगदी सुरुवातीपासूनच मग ते जमीन अधिग्रहण कायदा असो किंवा किमान हमीभाव अथवा शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट योजना असो मोदी सरकारचे शेतकऱ्यांबाबतीत धोरण नेहमीच अप्रामाणिक, फसवे आणि दुफळी निर्माण करणारे राहिल्याचे चव्हाण यांनी ट्विटमध्ये नमूद केले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी