35 C
Mumbai
Friday, May 17, 2024
Homeमहाराष्ट्रउदयनराजे,गादीचे वारस आणि रक्ताचे नाते हे वेगळे असते; मलिकांचा टोला

उदयनराजे,गादीचे वारस आणि रक्ताचे नाते हे वेगळे असते; मलिकांचा टोला

लयभारी न्यूजनेटवर्क

औरंगाबाद : शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी छत्रपतींच्या वंशजाबाबत केलेल्या वक्तव्यानंतर वाद निर्माण सुरु आहे. या वादात राष्ट्रवादीचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनीही उडी घेतली आहे. गादीचे वारस आणि रक्ताचे नाते हे वेगळे असते. देशातील संस्थांनामध्ये दत्तकपुत्रही राजे झाले आहे. आता त्यात कोण दत्तकपुत्र राजे झालेत हे माहिती नाही असा टोला उदयनराजे यांना लगावला आहे.

देशातील बऱ्याच संस्थानिक घराण्यांनी दत्तक विधानानुसार गादीवर राजपुत्र विराजमान केले आहेत. त्या घराण्यांबाबतही संजय राऊत यांनी प्रश्न उपस्थित केले असतील. मात्र, तुम्हाला गादीचा वारस आहे की तुमचे आणि घराण्याचे नातं हे रक्ताचे नाते आहे, असा प्रश्न राऊत यांनी विचारला आहे. त्यामुळे ज्यांना हा प्रश्न विचारला त्यांनीच उत्तर दिले पाहिजे असे मलिक यांनी सांगितले. यावेळी त्यांनी मारहाणीच्या भाषेचा समाचार घेतला. तंगडी कोणीही कुणाचीही तोडू शकत नाही. धमकी देऊनही प्रश्न सुटत नसतात. त्यामुळे मूळ प्रश्नाला उत्तर देणे अपेक्षित असल्याचे मलिक यांनी सांगितले.

छत्रपती शिवाजी महाराजांशी पंतप्रधान नरेंद्र मोदींची तुलना खपवून घेणार नाही...

‘जाणता राजा’ म्हणजे म्हणजे सर्व विषयाची जाण असणारा नेता म्हणजे ‘जाणता राजा’ शिवाजी महाराज असा त्याचा अर्थ होत नाही. शरद पवार यांनी स्वत:ला ‘जाणता राजा’ असे कधीही म्हटले नसल्याचे त्यांनी सांगितले. छत्रपती शिवाजी महाराज आणि पंतप्रधान मोदी यांची तुलना कधीही सहन होऊ शकणार नसल्याचे ही त्यांनी ठणकावले. योगी सांगतात की मोदी आधुनिक शिवाजी महाराज आहेत. लेखक गोयल यांच्या पुस्तकाचे प्रकाशन होते आणि ते सांगतात की मी माफी मागितली नाही. त्यामुळे वाद संपवण्यासाठी जावडेकर यांनी पुस्तक प्रकाशन झालेल्या ठिकाणी जाऊन पुस्तक मागे घेत असल्याचे जाहीर करावे असे आवाहनही मलिक यांनी केले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी