30 C
Mumbai
Saturday, May 11, 2024
Homeटॉप न्यूजलाजीरवाणे : ‘नरेंद्र मोदींचे कौतुक करणारे बॅनर लावा’; केंद्र सरकारचे विद्यापीठ, महाविद्यालयांना...

लाजीरवाणे : ‘नरेंद्र मोदींचे कौतुक करणारे बॅनर लावा’; केंद्र सरकारचे विद्यापीठ, महाविद्यालयांना आदेश

टीम लय भारी

मुंबई : मेणबत्त्या पेटवा, थाळ्या वाजवा असल्या थिल्लर प्रकारांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यथेच्छ उत्तेजन देत असतात. याच साखळीतील आणखी एक कीव आणणारा नवा प्रकार मोदी सरकारने केला आहे ( Narendra Modi government issued order to Universities and IITs ).

‘विद्यापीठ अनुदान आयोगा’च्या ( UGC ) माध्यमातून मोदी सरकारने हा प्रकार केला आहे. UGC ने देशभरातील सगळी विद्यापीठे व IIT सारख्या उच्च शैक्षणिक संस्थांना एक परिपत्रक पाठविले आहे ( Narendra Modi government sent letter through UGC).

narendra-modi-government-issued-order-to-universities
नरेंद मोदी यांची छबी झळकविण्यााचा थिल्लर प्रकार युजीसीने केला आहे

‘कोरोना’ लसीकरण 18 वर्षावरील सर्वांना मोफत देण्याचा निर्णय केंद्राने घेतला आहे. ‘या निर्णयाबद्दल नरेंद्र मोदी यांचे कौतुक करणारे बॅनर्स लावा’ असा आदेश युजीसीने ईमेलद्वारे पाठवला आहे ( UGC said, universities and IITs should put banners of Narndra Modi ).

हे सुद्धा वाचा

टाळ्या- थाळ्या वाजवून अन् दिवे लावल्यामुळे देशाचा आत्मविश्वास वाढला- नरेंद्र मोदी

JanataCurfew : नरेंद्र मोदींच्या आवाहनाचा उलटाच परिणाम, टाळ्या – थाळ्या वाजविण्यासाठी लोकांनी केली गर्दी

राहुल गांधींचा म्युकरमायकोसिसवरून पंतप्रधान मोदींना खोचक टोला

EXCLUSIVE: UGC Asks Universities, IITs & Colleges to Put Up Banners Thanking PM on Day1 of 18 Above Vaccination

बॅनर्सचे फोटो विद्यापीठे व शिक्षण संस्थांनी त्यांच्या सोशल मीडियामध्येही प्रकाशित करावेत, असेही फर्मान या ईमेलद्वारे सोडण्यात आले आहे ( Narendra Modi’s banner should publish on social media as well ). The dialogue या संकेतस्थळाने ही बातमी प्रसिद्ध केली आहे.

‘पंतप्रधानांचे आभार मानणारा बॅनर कसा असावा’ याचा नमुनाही युजीसीने ईमेलसोबत पाठवून दिला आहे ( UGC send sample banner for Narendra Modi ). ‘ऑल इंडिया सर्व्हे ऑफ हायर एज्युकेशन’मार्फत हा ई-मेल पाठविण्यात आला असून संपर्कासाठी यूजीसीच्या अधिकाऱ्याचे नाव नमूद केले आहे.

narendra-modi-government-issued-order-to-universities
नरेंद्र मोदींची टीमकी वाजविणारा हिंदीबरोबर इंग्रजीतीलही बॅनर विद्यापीठांमध्ये लटकविण्याचा आदेश यूजीसीने दिला आहे

सोमवारी विद्यापीठ व उच्च शिक्षण संस्थांनी हे बॅनर लावायचे होते. बॅनर लावले असल्याबाबतचे फोटो युजीसीकडे पाठवून देण्याबाबतचाही दुसरा आदेश बजावण्यात आला होता.

यूजीसीने विद्यापीठ व उच्च शिक्षण संस्थांना रविवार हा ईमेल पाठवला होता. सोमवारी कार्यालयात आल्यानंतर आम्ही हा ईमेल पाहिला. ईमेल पाहिल्यानंतर लगेचच बॅनर्सच्या प्रिंट कुठून काढणार, त्याबाबतचा अनुपालन अहवाल युजीसीला लगेच कसा पाठवणार, असा प्रश्न आमच्यासमोर निर्माण झाल्याचे आयआयटीमधील सूत्रांनी सांगितले.

‘कोरोना’च्या आपत्तीमुळे विद्यापीठे व उच्च शिक्षण संस्था सध्या बंद आहेत. परीक्षा सुद्धा ऑनलाईन पद्धतीने घेतल्या जात आहेत. बॅनर्सच्या प्रिंट्स काढणारी दुकानेही बंद आहेत. अशा परिस्थितीत युजीसीच्या आदेशाची अंमलबजावणी कशी करणार असा सवालही या सूत्रांनी व्यक्त केला.

वास्तविक, ‘कोरोना’ आपत्तीवर नियंत्रण ठेवण्यात मोदी सरकार सपशेल नापास झाले आहे ( Narendra Modi government failed in Corona Pandemic ). त्यामुळे देशभरात मोदी सरकारविरोधात संतापाची भावना आहे.

‘लसीकरणा’साठी केंद्र सरकारने शुल्क आकारणी केल्यामुळे सर्वोच्च न्यायालयानेही थप्पड लगावली आहे. न्यायालयाने तंबी दिल्यामुळेच मोदी सरकारने मोफत लसीकरणाचा निर्णय जाहीर केला आहे. पण या निर्णयाचे श्रेय लाटण्यासाठी मोदी सरकारने बॅनरबाजीच्या थिल्लर सुचना केल्या आहेत ( Narendra Modi taking to credit of free vaccination ).

विद्यापीठे व आयआयटीसारख्या उच्च शिक्षण संस्था विद्वानांना घडविण्याचे काम करीत असतात. संशोधनासारखे कार्य या संस्थांमध्ये चालत असते. त्याच्याशी निगडीत सल्लामसलत केंद्राने या संस्थांसोबत करायला हवी. असे असताना भलतेच आदेश देवून मोदी सरकारने बौद्धीक दिवाळखोरीचे दर्शन घडविल्याची भावना या सूत्रांनी व्यक्त केली आहे.

आमचा ‘यू ट्यूब चॅनेल’ही सबस्क्राईब करा

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी