30 C
Mumbai
Friday, May 17, 2024
HomeराजकीयPM Modi : दसऱ्याच्या दिवशी मोदींच्या हस्ते एम्सचे उद्घाटन; शुभमुहूर्तावर अनेक प्रकल्पांची...

PM Modi : दसऱ्याच्या दिवशी मोदींच्या हस्ते एम्सचे उद्घाटन; शुभमुहूर्तावर अनेक प्रकल्पांची करणार पायाभरणी

पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी (5 ऑक्टोबर) हिमाचल प्रदेशच्या दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान मोदींनी हिमाचल प्रदेशातील बिलासपूर येथे नव्याने बांधलेल्या एम्सचे म्हणजेच ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सचे उद्घाटन केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज म्हणजेच बुधवारी (5 ऑक्टोबर) हिमाचल प्रदेशच्या दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान मोदींनी हिमाचल प्रदेशातील बिलासपूर येथे नव्याने बांधलेल्या एम्सचे म्हणजेच ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सचे उद्घाटन केले. या एम्सची पायाभरणी पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते 2017 मध्ये करण्यात आली होती. या एम्सच्या उभारणीसाठी 1470 कोटी रुपयांहून अधिक खर्च झाल्याचे सांगण्यात येत आहे. यावेळी मुख्यमंत्री जयराम ठाकूर, केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर आणि भाजप अध्यक्ष जेपी नड्डा उपस्थित होते. ही इन्सिट्यूट हिमाचल प्रदेशच्या विकासात भर घालेल अशी आशा यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली.

पीएमओ म्हणजेच पंतप्रधान कार्यालयाने जारी केलेल्या निवेदनानुसार, हिमाचल दौऱ्यादरम्यान, पंतप्रधान मोदी 3,650 कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करतील. एम्सचे उद्घाटन केल्यानंतर पंतप्रधान मोदींनी रुग्णालयाची पाहणी केली. यानंतर ते स्थानिक लुहणू मैदानावर अनेक योजनांचे उद्घाटन आणि पायाभरणी केल्यानंतर जाहीर सभेला संबोधित करतील. कुल्लू दसरा सोहळ्यालाही पंतप्रधान मोदी उपस्थित राहणार आहेत.

हे सुद्धा वाचा

World Teachers Day : दोन-दोन शिक्षक दिन कशासाठी? जाणून घ्या सविस्तर माहिती

Navaratri Special : दूर्गापूजा निमित्त बंगाली अभिनेत्रीचा मनमोहक डान्स पाहिलात का?

Corona Update : अजूनही कोरोनाचे संकट टळलेले नाहीच; एकाच दिवसांत 2500 नवे रुग्ण

बिलासपूर एम्सची ठळक वैशिष्ट्ये
सरकारच्या म्हणण्यानुसार, बिलासपूर एम्स 1470 कोटी रुपये खर्चून बांधण्यात आले आहे. यात 18 विशेष आणि 17 सुपर स्पेशालिटी विभाग असतील. तसेच 18 अत्याधुनिक शस्त्रक्रिया कक्ष, 750 खाटा, 64 आयसीयू बेडसह. हे रुग्णालय 247 एकरात पसरलेले असून येथे चोवीस तास उपचारांची सुविधा असेल.

पंतप्रधान मोदी कोणत्या प्रकल्पाची पायाभरणी करणार?
पंतप्रधान मोदी ज्या प्रकल्पांची पायाभरणी करतील, त्यापैकी पिंजोर आणि नालागढ दरम्यानचा 31 किमी लांबीचा राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरण करण्यात येणार आहे. पंतप्रधान नालागडमध्ये मेडिकल पार्कची पायाभरणीही करतील. 350 कोटी रुपये खर्चून ते बांधण्यात येणार आहे. या योजनांमुळे परिसरात मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी निर्माण होतील, असे पीएमओने म्हटले आहे. आंतरराष्ट्रीय कुल्लू दसरा सोहळ्यातही पंतप्रधान सहभागी होणार आहेत. 5 ते 11 ऑक्टोबर दरम्यान आयोजित करण्यात येणार आहे.

दरम्यान, विजयादशमी अर्थात दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेक विकास कामांची पायाभरणी आणि लोकार्पण करत असल्याने हिमाचल प्रदेशांतील नागरिकांमध्ये समाधानाचे वाकतावरण दिसून येत आहे. विशेष म्हणजे अनेक जनतेच्या उपयोगाचे प्रकल्प लवकराच लवकर पूर्ण करण्याचे आदेशही पंतप्रधानांनी दिले असल्याची माहिती मिळत आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी