32 C
Mumbai
Monday, May 20, 2024
Homeराजकीयमहादेव जानकरांच्या गावात प्रभाकर देशमुख, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसोबत साधला संवाद

महादेव जानकरांच्या गावात प्रभाकर देशमुख, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसोबत साधला संवाद

लय भारी न्यूज नेटवर्क

सातारा : माण तालुक्यातील पळसावडे हे मावळते पशु संवर्धन व दुग्ध विकास मंत्री महादेव जानकर यांचे गाव. मंत्रीपदाची जबाबदारी, राजकीय सत्तासंघर्ष आणि सामाजिक चळवळ यांमुळे जानकर यांना आपल्या गावात फार लक्ष देता येत नाही. पण जानकर यांच्या या गावात राजकारणात नव्याने आलेले निवृत्त आयएएस अधिकारी प्रभाकर देशमुख यांनी नुकताच फेरफटका मारला. अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकांची पाहणी करण्याच्या उद्देशाने देशमुख यांनी पळसावडे गावात भेट दिल्याचे सूत्रांनी सांगितले.

लय भारी बातम्या वॉट्स अपवर मिळविण्यासाठी या ठिकाणी टिचकी मारा

विशेष म्हणजे, राज्यभरातील प्रमुख राजकीय नेते, आमदार राज्यातील सत्तासंघर्षात गुंतले आहेत. मंत्रीपदाची स्वप्ने पडलेल्या अनेक आमदारांना शेतकऱ्यांच्या समस्यांकडे लक्ष द्यायला वेळ सुद्धा नाही. फुटीच्या भितीने शिवसेना व काँग्रेसच्या आमदारांना तर दोन्ही पक्षांनी लपवून ठेवले आहे. अशा स्थितीत माण – खटावमधील शेतकऱ्यांच्या मदतीला प्रभाकर देशमुख धावून आले आहेत.

माण – खटाव मतदारसंघातील विविध गावांमध्ये जावून ते पिकांच्या नुकसानीची पाहणी करीत आहेत. नुकतेच ते पळसावडे, देवापूर व काळचौंडी येथे जावून आले. तेथील द्राक्षांच्या बागांना त्यांनी भेटी दिल्या.

महादेव जानकरांच्या गावात प्रभाकर देशमुख, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसोबत साधला संवाद

देशमुख हे कृषी पदवीधर आहेत. राज्याचे कृषी आयुक्त म्हणून सुद्धा त्यांनी बराच काळ काम केले होते. निवृत्तीनंतरही त्यांनी गट शेती, सेंद्रीय शेतीची चळवळ उभी केली आहे. शेती विषयाचे त्यांना सखोल ज्ञान आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या नुकसानीचे ते शास्त्रशुद्धपणे पाहणी करीत आहेत. नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना कशी मदत मिळवून देता येईल, याचे मार्गदर्शन सुद्धा ते तालुक्यातील अधिकाऱ्यांना करीत आहेत. त्यांच्या ज्ञानाचा शेतकऱ्यांना फायदा होत आहेच, पण अधिकाऱ्यांना सुद्धा फायदा होत असल्याचे सूत्रांनी सांगितले.

लय भारी बातम्या वॉट्स अपवर मिळविण्यासाठी या ठिकाणी टिचकी मारा

हे सुद्धा वाचा

सरकारच्या जुनाट निकषांमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई मिळेना : डॉ. प्रमोद गावडे

राज ठाकरे यांचे भाकित खरे ठरतेय…

सोशल मीडियात भाजप, शिवसेनेला टपल्या; तर शरद पवारांचे कौतुक

दरम्यान, देशमुख यांनी जानकर यांच्या गावात भेट दिल्याने चर्चेचा विषय ठरला आहे. देशमुख व जानकर यांच्यात अत्यंत सलोख्याचे संबंध आहेत. जानकर यांचा रासप भाजपसोबतच्या महायुतीचा घटक पक्ष आहे. त्यांच्याच सरकारमध्ये ते मंत्री होते. परंतु नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी माण मतदारसंघात भाजपच्या उमेदवाराला पाठिंबा दिला नव्हता. त्यांच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी देशमुख यांचे काम केले होते. देशमुख यांनी अनपेक्षितपणे निवडणुकीत जोरदार मुसंडी मारली होती. प्रस्थापित असलेल्या जयकुमार गोरे यांचा पराभव होतोय की काय अशी स्थिती निर्माण झाली होती. पण अवघ्या 2800 मतांनी गोरे यांचा निसटता विजय झाला. देशमुख यांना अनेक नेत्यांनी राजकीय मदत केली होती. त्यात जानकरांचाही समावेश आहे.

गोरे यांच्या तुलनेत प्रभाकर देशमुख हे फारच उजवे आहेत. प्रशासकीय ज्ञान, विविध क्षेत्रातील दांडगा अनुभव, सौजन्यशील व्यक्तीमत्व असे त्यांच्याकडे गुण आहेत. गोरे यांच्या विरोधात देशमुख यांनी माण तालुक्यात आपली राजकीय कारकिर्द सुरू केली आहे. दीर्घ काळामध्ये ते कितपत यशस्वी होतील याबद्दल माण – खटावमधील जनतेमध्ये कुतूहल आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी