29.5 C
Mumbai
Saturday, May 4, 2024
Homeटॉप न्यूजआमदार जयकुमार गोरे म्हणजे अहंकार, प्रभाकर देशमुखांचे टीकास्त्र

आमदार जयकुमार गोरे म्हणजे अहंकार, प्रभाकर देशमुखांचे टीकास्त्र

टीम लय भारी

सातारा : बिजवडी विविध कार्यकारी विकास सोसायटीच्या नवनिर्वाचित संचालकांचा सत्कार समारंभ पिंपराळे-येळेवाडी येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे माण-खटाव चे नेते मा.प्रभाकर देशमुख यांच्या हस्ते आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी बोलताना त्यांनी विकास सेवा सोसायटीच्या संचालकांना कानमंत्र दिला. तसेच आमदार जयकुमार गोरेंवर जोरदार टीका केली(Prabhakar Deshmukh’s criticism on MLA Jayakumar Gore).

प्रभाकर देशमुख म्हणाले, ‘विकास सेवा सोसायटी ही ग्रामीण भागाची अर्थवाहिनी आहे. तिचा स्वार्थासाठी वापर न करता सर्वसामान्य गरिब जनतेच्या फायद्यासाठी करावा. स्वार्थासाठी वापर करणाऱ्यांना जनतेने चांगला धडा दिला आहे. या मधून त्यांनी शिकावं तुम्ही संस्था चालवायला पात्र नाही. ते लोकांशी वाईट वागले आहेत.तुम्ही चांगल वागून लोकांची कामं करा. असा सल्ला देशमुखांनी नवनिर्वाचित संचालकांना दिला. जर तुमच्या बद्दल जनतेतून चुकीच्या गोष्टी बद्दल माझ्याकडे तक्रारी आल्या तर मी जनते सोबत असेन असा इशाराही प्रभाकर देशमुखांनी दिला. बिजवडी सोसायटी बद्दल कोणी चांगलं बोलत नव्हते. ही संस्था चांगली दिसली पाहिजे यासाठी प्रयत्न करा.’

देशमुख आमदार गोरेंवर टीका करत म्हणाले की, पवार साहेबांवर टीका करण्यापूर्वी त्यांची उंची तपासावी देशाचे पंतप्रधान सुद्धा त्यांना गुरू मानतात पवारांचं बोट धरून मी राजकारणात आलो अस जाहीर पणे सांगतात. मी ही पवार साहेबांचा आदेश घेऊन राजकारणात आलोय. मी म्हणजेच सरकार या आमदार गोरेंच्या भूमिकेचा खरपूस समाचार घेतला. मागचे १५ वर्ष मी पुढचे १५ वर्ष मीच काय ताम्रपट आहे का? हे अहंकाराचे लक्षण आहे. रावणाचा सुद्धा अहंकारानेच पराभव झाला होता(Prabhakar Deshmukh took the news of MLA Gore’s role seriously).

Prabhakar Deshmukh's criticism on MLA Jayakumar Gore
प्रभाकर देशमुख म्हणाले, विकास सेवा सोसायटी ही ग्रामीण भागाची अर्थवाहिनी आहे

पवारबसाहेबांनी माढ्यातुन दोन वेळा खासदारकी भूषवली आहे. त्यावेळी त्यांनी १७५ कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून दिला त्यावेळी अगणित बंधारे आले. साखळी सिमेंट बंधारे कोणी आणले . पृथ्वीराज बाबा म्हसवडला जात असताना त्यांना दुष्काळात एक हिरवेगार गाव दिसलं ते लोधावडे होते. त्याबद्दल त्यांनी माझ्याकडून माहिती घेतली. त्यांनी विचारलं हे महाराष्ट्रभर करता येईल का?

त्यावेळी सुरुवातीला माणसह दहा तालुके घेतले. त्यावेळी आमदार ही होते पण माझ्यामुळे सगळं झालं हे काही खरं नाही खोटं बोल पण रेटून बोल लबाड बोलतंय. पवार साहेबांवर बोलायला पात्रता असावी लागते.
विकासच राजकारण करा. वैयक्तिक पातळीवर येऊ नका. मला ते लोधावड्याचा गडी बोलतात. पण मी त्यांना बोराटवाडीचा गडी बोलणार नाही. कारण गडी हा प्रामाणिक असतो. तो कष्ट करून आपलं पोट भरत असतो.
मी ३८० जणांना नोकऱ्या दिल्या. तुम्ही ५०० लोकांना द्या.

टाकेवडीच्या मेंढपाळाचा मुलगा बापू दडस सारख्या १२३ जणांना मार्गदर्शन करून सेवेत आणलं. तुम्हीही असं काही तरी करा.निदान स्पर्धा परिक्षेविषयी एखादं वाक्य तरी बोला असा टोला आमदार गोरेंना लगावला. ग्रामीण भागातील मुलं शासकीय सेवेत जावी ही माझी इच्छा आहे.

माण तालुक्यात पैशाचा वापर, गुंडगिरी करून माणचं राजकारण नासाविण्याचा काम या लोकांनी केलं. बँक निवडणूकत पैसे देऊन मते फोडण्याचे काम कोणी केलं. निर्ढावलेले लोक आहेत त्यांना त्यांची जागा दाखवा.
माण तालुक्यांची एमआयडीसी जाऊ देणार नाही. आरे पण निघाली कुठं नेणार आहे कोण? आहे इथंच , कालच अजितदादा सोबत बोलणं झालं त्यांनी सांगितले कुठं जात नाही आहे तिथंच!

हे सुद्धा वाचा

शिवजयंतीनिमित्त सादिया सय्यद छत्रपती शिवाजी महाराजांना देणार अनोखी मानवंदना

प्रभाकर देशमुख, उत्तमराव जानकरांना आमदारकी द्या; शरद पवारांना चाहत्याकडून रक्ताचे पत्र

Congress inducts leaders from other parties, but scores self-goal?

एमआयडीसी आणली कोणी तर माणचे सुपुत्र अविनाश सुभेदार यांनी आणि त्यांनाच याचं श्रेय गेलं पाहिजे असं माझं प्रामाणिक मत आहे.पंधरा वर्षात का नाही उभी राहिली एमआयडीसी असा सवाल प्रभाकर देशमुखांनी केला.
तुमचं कर्तव्य आहे ते आधी करा.जिहे काठापूरच पाणी किती दिवसांत येणार होत. जादा पाण्याचं रिझर्वेशन घेतलं आहे का तर नाही त्यासाठी भांडा. सांगलीत पाणी जातंय टेम्भूचे इकडे का येत नाही .हा तुमचा निष्क्रीय आणि नाकर्ते पणा आहे. बनगरवाडी परिसरात पाणी मिळणार नाही म्हणारे पाणी पूजनाला सर्वात प्रथम हजर या ३२ गावांना पाणी मिळालं पाहिजे यासाठी आम्ही प्रयत्न करू. उरमोडीचे पाणी आले तेव्हा पवारसाहेब खासदार होते.

विकासाचं राजकारण करायचं आहे. यशवंतराव चव्हाण साहेबानी ,तात्यांनी विकासाचं राजकारण केलं तेच आपल्याला करायचं आहे. एम. के. भोसले म्हणाले, आमची एक सीट गेली. माझा पुतण्या विरोधी पार्टी मधून उभा होता.परंतु राजकारणात प्रामाणिक काम करत राहणे गरजेचे आहे.नाती-गोती लग्न समारंभात जपा.राजकारणात नाती गोती बाजूला ठेवा.
साहेबांनी आपल्या मातीशी नाळ जोडली आहे. साहेब हे विरोधकासह सर्वाना मदत करणारे नेतृत्व आहे. साहेबांनी अनेक लोकांना वैद्यकीय मोफत मदत केली. परंतु त्यातीलच काहींनी विधानसभेला विरोधात काम केलं.
साखळी सिमेंट बंधाऱ्याचा उगम लोधावडे गावात झाला. नंतर त्यांचे पृथ्वी सिमेंट बंधारे झाले.

संजय भोसले म्हणाले,सोसायटीच्या निवडणुकीत तगडे नेतृत्व उभे होते.पण जनतेने पैशाच्या राजकारणाला मूठमाती दिली. या भागाचा पाणी प्रश्न प्रलंबित आहे.कोणीही द्या पण पाणी द्या. साहेबांचं पाण्याच्या बाबतीत चांगलं नाव आहे जलयुक्त शिवारला निधी देण्याचं काम साहेबांनी केलं पण आमदार म्हणत आहेत मीच दिला.

या सत्कार कार्यक्रम प्रसंगी दहिवडीचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष सागर पोळ,उपनगराध्यक्ष राजेंद्र साळुंखे,माजी पंचायत समितीचे सभापती तानाजी कट्टे, काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष एम.के.भोसले, शिवसेना जिल्हा उपप्रमुख संजय भोसले,राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष बाळासाहेब सावंत, मनोज पोळ यांच्या प्रमुख उपस्थिती बिजवडी सोसायटीच्या नवनिर्वाचित संचालकांचा सत्कार पार पडला.

कार्यक्रमास खरेदी विक्री चेअरमन बाबुराव काटकर, मार्केट कमिटी संचालक योगेश भोसले,रंगाशेठ भोसले, विकास निंबाळकर, आनंदराव विरकर,जयप्रकाश कट्टे, विक्रम शिंगाडे, शिवाजीराव महानवर, दहिवडीचे नगरसेवक विशाल पोळ, महेंद्र जाधव, विष्णुपंत अवघडे उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय बरकडे यांनी केले.

एम.के भोसले यांनी सोसायटी मार्फत शेतकऱ्यांसाठी खते व बी- बियाणे दुकान सुरू करण्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला हाच धागा पकडून प्रभाकर देशमुखांनी दुकान सुरू करण्यासाठी लागेल ती मदत करण्याचा शब्द दिला.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी