33 C
Mumbai
Monday, May 20, 2024
Homeराजकीयराहुल गांधी 11 वर्षांनतर मुंबईत; थोड्याच वेळात माध्यमांशी संवाद साधणार

राहुल गांधी 11 वर्षांनतर मुंबईत; थोड्याच वेळात माध्यमांशी संवाद साधणार

इंडिया आघाडीची बैठक आज (दि.31) आणि उद्या मुंबईत पार पडत आहे. या बैठकीला 28 पक्षांचे नेते उपस्थित राहत आहेत. काँग्रेसचे खासदार राहुल गांधी देखील बैठकीसाठी आज मुंबईत येत आहेत. राहुल गांधी यांचा तब्बल 11 वर्षानंतरचा हा मुंबई दौरा होत आहे. आज 4 वाजता ते माध्यमांशी संवाद देखील साधणार आहेत. गेल्या काही वर्षांपासून राहुल गांधी नरेंद्र मोदी आणि सत्ताधाऱ्यांवर निशाना साधत असून आजच्या बैठकीत ते काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

भारत जोडो यात्रेनंतर राहुल गांधी यांचा जनाधार झपाट्याने वाढत आहे. काँग्रेसमध्ये मोठा उत्साह संचारला असून विरोधी पक्षाकडून देखील राहुल गांधी राजकारणातील एक आश्वासक चेहरा म्हणून समोर आल्याचे दिसत आहे. राहुल गांधी यांची मुंबईत सभा घेण्यासाठी महाराष्ट्र काँग्रेसचे नेते गेले काही महिने प्रयत्न करत आहेत. मुंबई महापालिका निवडणुक प्रचारासाठी देखील राहूल गांधी यांनी सभा घ्यावी असे महाराष्ट्र काँग्रेसच्या नेत्यांना वाटत आहे.

इंडिया आघाडीच्या बैठकीत आगामी लोकसभा निवडणुकीची रणनिती ठरत आहे. त्यानिमित्ताने वेगवेगळ्या राज्यांमध्ये बैठकांचे सत्र सुरु आहे. पहिली बैठक बिहारमधील पाटण्यात नितीश कुमार आणि लालू प्रसाद यादव यांच्या पुढाकाराने पार पडली. त्यानंतर दुसरी बैठक कर्नाटकाती बंगळूरुमध्ये काँग्रेसच्या पुढाकारात पार पडली. आता मुंबईतील बैठकीसाठी शिवसेनेने ठाकरे गट) पुढाकार घेतला असून मोदी सरकार नेस्तनाबूत करण्यासाठी आखणी करण्यात येत आहे. त्याच प्रमाणे विरोधी पक्षांची एकजूट टिकून राहणे, जागा वाटप, मोदींच्या विरोधातील चेहरा, देशातील विविध समस्या, प्रश्न या वर देखील चर्चा होऊ शकते. या बैठकीत राहुल गांधी माध्यमांशी काय संवाद साधणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. इंडिया आघाडीच्या बैठकीत विरोधी पक्षातील 28 नेत्यांची उपस्थिती असणार आहे. महाराष्ट्रातून शरद पवार आणि उद्धव ठाकरे या मोठ्या नेत्यांची देखील प्रमुख् उपस्थिती असणार आहे.

हे सुद्धा वाचा 
शाहरुखच्या ‘जवान’चा ट्रेलरला अवघ्या काही मिनिटांत लाखो व्ह्यूज
इंडियाच्या बैठकीत वडापाव, झुणकाभाकर, पुरणपोळी, श्रीखंड पुरी, भरलेल्या वांग्याची मेजवानी
आशिया कप २०२३: दुबळ्या नेपाळला बाबर आझमने झोडले !  

दरम्यान राहुल गांधी इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर मुंबईत रॅली काढणार आहेत. मुंबईतील दादर ते प्रभावदेवी येथील काँग्रेस मुख्यालयापर्यंत ही रॅली असणार आहे. त्याची जय्यत तयारी मुंबई कॉँग्रेसकडून केली जात आहे. यापूर्वी सन 2010 साली राहुल गांधींनी मुंबईतील काँग्रेस मुख्यालयाला भेट दिली होती. त्यानंतर 2012 साली ते मुंबईत आले होते. त्यानंतर राहुल गांधी मुंबईत आले मात्र त्यांनी काँग्रेस मुख्यालयाला भेट दिली नव्हती. काँग्रेसने मुख्यालयात IT सेल वॉर रुम बनविली आहे, त्याचे उद्घाटन देखील राहुल गांधी यांच्या हस्ते होणार आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी