31 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
Homeराजकीयपश्चिम बंगालमधील हिंसेवरून राऊतांनी भाजपला फटकारले

पश्चिम बंगालमधील हिंसेवरून राऊतांनी भाजपला फटकारले

टीम लय भारी

मुंबई :- पश्चिम बंगालमधील (West Bengal) निवडणूक निकाला झाल्यानंतर पश्चिम बंगालमध्ये (West Bengal) हिंसा उसळली आहे. ही अत्यंत दुर्देवी आणि चिंताजनक बाब आहे, असे सांगतानाच हिंसा घडवणारे बंगालचे आहेत की, बंगाल बाहेरचे हे पाहावे लागेल. टाळी एका हाताने वाजत नाही. हिंसेला कोण चिथावणी देतंय त्याचा शोध घ्या, अशा शब्दांत शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपला फटकारले (Find out who is inciting violence, Shiv Sena leader Sanjay Raut slammed BJP).

संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी हे विधान केले. पश्चिम बंगालचा (West Bengal) निर्णय ऐतिहासिक आणि क्रांतीकारक आहे. देशातील मनाची भावना या निकालात प्रतिबिंबीत झाली आहे. परंतु, या निकालानंतर पश्चिम बंगालमध्ये उसळलेली हिंसा चिंताजनक आहे (The escalating violence in West Bengal is worrisome). दोन्ही बाजूने शांतता राखली पाहिजे.

धमकी कोणी दिली याचा खुलासा अदर पुनावाला यांनी करावा ! नाना पटोले

जखमी वाघिणीने देशाच्या राजकारणाला एक नवी दिशा आणि वेगळेच वळण दिले

Coronavirus: Serum Institute to invest 240 million pounds in UK, says Boris Johnson’s office

केंद्राने आणि बंगालच्या सरकराने संयमाने राहावे लागेल. पश्चिम बंगालचा ((West Bengal)  इतिहास रक्तरंजित आहे. हे खरे आहे. पण सर्वांनी देशाची परिस्थिती पाहावी. कोरोनाची परिस्थिती ओळखून काम करावे. एकमेकांना धमक्या देणे थांबवावे, असे सांगतानाच हिंसा घडवणारे बंगालचे की, बाहेरचे हे पाहावे लागेल. टाळी एका हाताने वाजत नाही. हिंसेला कोण चिथावणी देतोय याचा शोध घ्या, या हिंसेचा तपास झालाच पाहिजे, असा टोला संजय राऊत यांनी लगावला (Tola was scored by Sanjay Raut).

लोकसभा एकत्र लढवू

2024ची निवडणूक आम्ही एकत्र मिळवून लढवू. राहिला नेतृत्वाचा प्रश्न तर दिल्लीत बसून कोण नेतृत्व करेल हे पाहावे लागेल, असे संजय राऊत (Sanjay Raut) यांनी स्पष्ट केले.

पूनावालांना कोणी धमकी देणार नाही

पूनावालांना महाराष्ट्रातून कोणी धमकी देणार नाही. ही महाराष्ट्राची परंपरा नाही. उलट महाराष्ट्रात व्हॅक्सिन तयार होत आहे. संपूर्ण देशासाठी व्हॅक्सिन तयार होत आहे. याचा आम्हाला अभिमानच आहे, असे सांगतानाच पूनावाला यांचे वक्तव्य गंभीर आहे. त्यांना कुणी धमकी दिली असेल तर त्याची चौकशी होईलच, असे ही त्यांनी सांगितले.

अग्रलेखातून टोलेबाजी

दैनिक सामनाच्या अग्रलेखातूनही भाजपवर टीका करण्यात आली आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी एकहाती एका पायावर लढल्या. त्यांचे अभिनंदन करणाऱ्या भुजबळ यांना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी धमकीवजा इशारा दिला. अशा पद्धतीने धमक्या देऊन भाजप आपली उरलीसुरली पत का घालवीत आहे?

विजयाबद्दल अभिनंदन करणाऱ्यांना धमकावणे, तुरुंगात टाकणे या असहिष्णुतेस महाराष्ट्र धर्मात तरी स्थान नाही. भाजप महाराष्ट्रातून सत्तेबाहेर जाण्यास त्यांची ही असहिष्णुताच जबाबदार आहे! भाजप नेत्यांचा ‘अॅरोगन्स’ म्हणजे मस्तवाल भाषा हे त्यांच्या पश्चिम बंगालमधील (West Bengal) दारुण पराभवाचे एक कारण आहे. महाराष्ट्रातील सदैव गुरगुरणाऱ्या लोकांनी याचे भान ठेवले तर बरे होईल, असा टोलाही शिवसेनेने लगावला आहे.

विश्र्वसार्ह बातम्यांसाठी ‘लय भारी’ चॅनेला सबस्क्राईब करा.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी