30 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
Homeमहाराष्ट्रघर खरेदी करू इच्छिणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी, मुंबईत 6000 गृहप्रकल्पांचे जंगी प्रदर्शन

घर खरेदी करू इच्छिणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी, मुंबईत 6000 गृहप्रकल्पांचे जंगी प्रदर्शन

लय भारी न्यूज नेटवर्क

मुंबई : देशात आर्थिक मंदीचे वारे घोंगावत आहे. असे असले तरी मुंबईत स्वतःचे घर असावे असे प्रत्येक मध्यमवर्गीयाचे स्वप्न असते. पण खिशाला परवडणाऱ्या घरांची माहिती मिळविण्यात बराच वेळ जातो. मात्र ‘क्रेडाई – एमसीएचआय’ या संस्थेने मुंबई व राज्यभरातील सगळ्या गृहप्रकल्पांची माहिती देणारे जंगी प्रदर्शन आयोजित केले आहे. ‘रेरा’ची मान्यता असलेले तब्बल 6000 पेक्षा जास्त गृहप्रकल्प या प्रदर्शनात असतील. एवढेच नव्हे तर, घर खरेदीसाठी अर्थपुरवठा करणाऱ्या बँकांचाही या प्रदर्शनात समावेश असेल. एकूण 100 स्टॉल्स या प्रदर्शनामध्ये उभारण्यात येणार आहेत.

मुंबईतील वांद्रे – कुर्ला संकुलात येत्या 21 ते 24 नोव्हेंबर या कालावधीत हे प्रदर्शन भरणार आहे. प्रदर्शनाचे हे 29 वे वर्ष आहे. विशेष म्हणजे, बांधकाम क्षेत्रातील आशिया खंडातील सर्वात मोठे हे प्रदर्शन आहे. बांधकाम क्षेत्रातील व्यावसायिक तसेच घर खरेदी करू इच्छिणारे सामान्य लोक यांच्यासाठी हे प्रदर्शन महत्वपूर्ण असेल. विशेषत: विविध प्रकारचे गृहप्रकल्प व अर्थपुरवठ्यांची माहिती एकाच ठिकाणी विनासायास मिळणार असल्याने खरेदीदारांना घरांच्या किंमतींमध्ये घासाघीस (बार्गेनिंग) करण्यास संधी मिळणार आहे.

घर खरेदी करू इच्छिणाऱ्या अनेकांचे स्वप्न या प्रदर्शनातून दरवर्षी साकार होत असते. यंदाही अनेकांचे हे स्वप्न साकार होईल

– नयन शाह, अध्यक्ष, क्रेडाई – एमसीएचआय

 

हे प्रदर्शन म्हणजे बांधकाम व्यावसायिकांनी मुंबई व महाराष्ट्रातील जनतेसाठी दिलेली एक चांगली संधी आहे. त्यातून सामान्य लोकांना परवडणारी व चांगल्या दर्जाची घरे खरेदी करता येतील. प्रदर्शनात नावाजलेल्या संस्था सहभागी होणार आहेत

– प्रतीक पटेल, क्रेडाई – एमसीएचआय प्रदर्शनाचे अध्यक्ष

 

सरकारचे सहकार्य आणि कर प्रणालीत केलेली कपात यांमुळे बांधकाम क्षेत्राला पुन्हा चांगले दिवस येऊ घातले आहेत. लोकांना चांगल्या दर्जाचे प्रकल्प कमी वेळेत एकाच ठिकाणी पाहता येतील

– टी. डी. जोसेफ, बिझनेस हेड, क्रेडाई – एमसीएचआय

 

प्रदर्शनात सहभागी होणाऱ्या बांधकाम कंपन्या

माय फेअर हाऊसिंग, एल एण्ड टी रियल्टी, रोमेल ग्रुप, रूस्तुमजी, कल्पतरू, अजमेरा रियल्टी, मॅरेथॉन रियल्टी, एकता वर्ल्ड, रेमंड रियल्टी, गुप्ता हाऊसिंग, गेरा, कोलते पाटील, संघवी एस 3, ब्रह्मा कॉर्प., गोयल गंगा, जे.एम. डेव्हलपर्स, मुंबई स्पेस रियल्टी, एम. जे. शाह, हब टाऊन, शिवम रियल इस्टेट, आशापुरा डेव्हलपर्स, मनिषा लाईफ स्पेसेस इत्यादी

प्रदर्शनात सहभागी होणाऱ्या वित्त संस्था

आयसीआयसीआय बँक, एक्सिस बँक, एसबीआय, युनियन बँक, कोटक महिंद्रा बँक, एलआयसी एचएफएल, टाटा कॅपिटल, आवास फायनान्स इत्यादी

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी