34 C
Mumbai
Tuesday, May 21, 2024
Homeराजकीयरोहित पवारांच्या प्रचारासाठी देखणा 'विजयरथ' 

रोहित पवारांच्या प्रचारासाठी देखणा ‘विजयरथ’ 

लय भारी न्यूज नेटवर्क

अहमदनगर : कर्जत – जामखेड मतदारसंघाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. महाआघाडीचे उमेदवार रोहित पवार यांच्या प्रचारासाठी तालुक्यातील बेनवडी येथील शिवाजी गदादे व पुणे नगरसेविका प्रिया गदादे यांनी राष्ट्रवादी पक्षावर आणि पवार घराण्याच्या प्रेमाखातर आगळा वेगळा ‘विजयरथ’ दिला आहे. या रथाची वैशिष्ट्ये म्हणजे या रथावर चहू बाजूनी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. रथाच्या समोरील छतावर घड्याळ टांगले आहे. तर दर्शनीय बाजूस राष्ट्रवादीसह इतर मित्रपक्षांचे झेंडे लावण्यात आले आहेत. या रथामध्ये विठ्ठलाचे रूप धारण केलेला युवक उभा आहे. पवार यांच्या विजयात या विजयरथाचाही वाटा असेल असा विश्वास यावेळी शिवाजी गदादे यांनी बोलताना व्यक्त केला.

रोहित पवारांच्या प्रचारासाठी देखणा 'विजयरथ' 

कर्जत – जामखेडच नव्हे तर राज्यभरातून राष्ट्रवादी पक्षावर अतोनात प्रेम असलेले असंख्य कार्यकर्ते आहेत. कर्जत जामखेडचा विचार केला तर अनेकांनी रोहित पवार यांच्या विजयासाठी वेगवेगळे पण केले आहेत. रोहित पवार आमदार झाल्यानंतरच अंगात शर्ट चढवेल, पायात चप्पल घालेन, दाढी करेल, काहींनी तर रोहित पवार आमदार होत नाहीत तोपर्यंत विवाह करणार नसलेले कार्यकर्ते या मतदारसंघात पाहायला मिळत आहेत. रोहित हे खुद्द शरद पवारांचे वारसदार म्हणुन येथील जनतेने त्यांना स्वीकारले आहे. त्यामुळे लोकांचे प्रेम  पाहून ही निवडणूक जनतेनेच हातात घेतली असल्याचे मत रोहित पवार यांनी व्यक्त केले.

हिटलरशाहीचा नाश व्हावा म्हणून रथात विठ्ठल उभा ! 

गेली तीस वर्षे वारकरी सेवा प्रतिष्ठाणच्या माध्यमातून आम्ही काम करत आहोत. राज्यातील जनता हिटलरशाहीपासून वाचावी, आश्वासने व दिशाभूल करून जनतेची फसवणुक होत आहे. विकासाबाबत हे काहीच बोलत नाहीत. त्यामुळे कर्जत-जामखेडच्या जनतेला प्रेरणा मिळावी म्हणून हा विठ्ठल कमरेवर हात ठेवुन रथात उभा असल्याची भावना राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे.

रोहित पवारांच्या प्रचारासाठी देखणा 'विजयरथ' 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी