35 C
Mumbai
Friday, May 17, 2024
Homeराजकीयमोठी बातमी : शरद पवार यांचा राजीनामा फेटाळला; निवड समितीचा निर्णय

मोठी बातमी : शरद पवार यांचा राजीनामा फेटाळला; निवड समितीचा निर्णय

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा शरद पवार यांचा राजीनामा फेटाळला गेला आहे. हा निवड समितीचा निर्णय आहे. समितीतील सर्वच्या सर्व 17 सदस्यांनी एकमताने हा राजीनामा फेटाळला आहे. त्यामुळे शरद पवार हेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून कायम राहणार आहेत. समितीचा निर्णय आपल्याला मान्य राहील, असे पवारांनी यापूर्वीच जाहीर केले आहे. 

महाराष्ट्राच्या राजकारणातील याक्षणीची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा शरद पवार यांचा राजीनामा फेटाळला गेला आहे. हा निवड समितीचा निर्णय आहे. समितीतील सर्वच्या सर्व 17 सदस्यांनी एकमताने हा राजीनामा फेटाळला आहे. त्यामुळे शरद पवार हेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून कायम राहणार आहेत. समितीचा निर्णय आपल्याला मान्य राहील, असे पवारांनी यापूर्वीच जाहीर केले आहे.

दोन दिवसांपूर्वीच “लोक माझे सांगाती” या आत्मचरित्राच्या सुधारित आवृत्तीच्या प्रकाशन प्रसंगी पवारांनी राजीनाम्याचा निर्णय जाहीर केला होता. त्यानंतर फक्त राष्ट्रवादीचं नव्हे तर महाविकास आघाडी आणि राज्यासह देशभरात राजकीय भूकंप झाला होता. पवारांनी राजीनाम्याचा निर्णय मागे घ्यावा म्हणून राज्यभरातील राष्ट्रवादीचे नेते आणि कार्यकर्त्यांनी त्यांची मनधरणी सुरू केली होती. महाविकास आघाडीतील नेत्यांनीही पवारांनी राजीनामा मागे घ्यावा, अशी विनंती केली होती.

राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष निवड समितीची बैठक आज सकाळी राष्ट्रवादी प्रदेश कार्यालयात झाली. यात दुसऱ्या कोणत्याही नावावर चर्चा झाली नाही. समितीसमोर दोन पर्याय ठेवले गेले. पहिला प्रस्ताव शरद पवार यांचा राजीनामा मागे घेण्याचा आणि दुसरा प्रस्ताव शरद पवार हेच राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी कायम राहतील, हा होता. समितीने एकमताने दोन्ही निर्णय स्वीकारले. हे निर्णय समिती पवारांना कळविले जाणार आहेत. स्वतः शरद पवार यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये येणार आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल आणि अजित पवार हे थोड्याच वेळात समितीच्या निर्णयाची माहिती माध्यमांना देणार आहेत. दरम्यान, राज्यभरातील अनेक राष्ट्रवादी कार्यकर्ते पवारांनी निर्णय मागे घ्यावा म्हणून मुंबईत आंदोलन करत आहेत. कार्यकर्त्यांनी उपोषण, अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. राष्ट्रवादी प्रदेश कार्यालय, पवारांच्या निवासस्थानाबाहेर कालपासून आंदोलन सुरू आहेत. आम्ही साहेबांशिवाय जगूच शकत नाही, अशी कार्यकर्त्यांची भावना आहे. पवार साहेब नाही, तर आम्ही नाही, अशी कार्यकर्त्यांची भूमिका आहे.

काल काही कार्यक्रात्यांनी पवारांना रक्ताने चिठ्ठ्या लिहिल्या होत्या. आता राष्ट्रवादी प्रदेश कार्यालयाबाहेर एका कार्यकर्त्याने आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. त्याला वेळीच रोखण्यात आल्याने अनर्थ टळला. यानंतर पोलिसांनी कार्यकर्त्यांना कार्यालयाबाहेरून दूर सारण्यास सुरुवात केली आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी