36 C
Mumbai
Tuesday, May 14, 2024
Homeक्राईमवेशव्यावसायातून दोन परदेशी महिलांची सुटका

वेशव्यावसायातून दोन परदेशी महिलांची सुटका

मुंबई क्राइम ब्रांचच्या अधिकाऱ्यांनी कारवाई करून दोन परदेशी महिलांची वेश्या व्यवसायातून सुटका केली आहे.या महिला उझबेकिस्तान देशाच्या नागरिक आहेत.मेडिकल व्हिसा वर त्या भारतात आल्या होत्या.या प्रकरणात पाच व्यक्तींना अटक करण्यात आली आहे.

मुंबई क्राइम ब्रांचच्या अधिकाऱ्यांना काही व्यक्ती बेकायदेशीर पणे वेश्या व्यवसाय करत असून यासाठी परदेशी महिलांचा वापर करत असल्याची माहिती मिळाली होती.युनिट 8 चे पोलीस निरीक्षक अनिता कदम आणि सुधीर जाधव यांना ही माहिती मिळाली होती.त्या आधारावर त्यांनी कारवाईच काम करायला सुरुवात केली होती.पोलिसांनी डमी ग्राहक बनवून पाठवला. डमी ग्राहकाने संबंधित दलाल यांना संपर्क साधून व्यवहार ठरवला आणि परदेशी महिलांना 5 स्टार हॉटेल मध्ये पाठवण्यास सांगितलं.ठरल्या नुसार दलालांनी दोन परदेशी महिलांना पाठवलं.यावेळी आधीच दबा धरून बसलेल्या पोलिसांनी कारवाई केली.प्रथम दोन परदेशी महिलांची सुटका केली त्यानंतर महिलांना सोडायला आलेली व्यक्तींना ताब्यात घेतलं.

पोलिसानी पाच जणांना अटक केली आहे.रहीम काळसेकर , गणेश घुगे ,रहीमतुला शाह , युनूस शेख आणि सुफियांन शेख NDPSयांना अटक केली आहे.यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे 16 ग्राम एम डी हे ड्रग्स सापडलं.त्याची किंमत तीन लाख 40 हजार रुपये आहे.यांचे दोन साथीदार फरार आहेत.संतोष उर्फ गोपाळ आणि सबिना शेख हे फरार आहेत.हे सर्व जण वेश्या व्यवसाय चालवत होते.प्रादेशिक महिलांना बोलवायचं आणि त्यांचा वापर वेश्या व्यवसायासाठी करायचा अशी त्यांची कार्य पद्धती होती.

अटक करण्यात आलेल्या आरोपी परदेशी महिलांचा बोगस आधारकार्ड ही बनवलं होत.त्याचा वापर महत्वाच्या ठिकाणी प्रवेश मिळवण्यासाठी आणि आपली ओळख दाखवण्यासाठी केला जात होता.अटक करण्यात आलेल्या आरोपी वर आय पी सी , एन डी पी एस ऍक्ट,पिटा ऍक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांच्यावर कारवाई सुरू आहे.

हे सुद्धा वाचा

मोठी बातमी : शरद पवार यांचा राजीनामा फेटाळला; निवड समितीचा निर्णय

नव्या शैक्षणिक वर्षापासून ‘राज्यात एकच गणवेश’!

बुद्ध पौर्णिमा: आज चुकूनही करू नका ‘ही’ कामं !

परदेशी महिला यांची सुटका करण्यात आल्यावर त्यांची रवानगी सरकारच्या देवनार येथील नवजीवन वसतिगृहात करण्यात आली आहे.

Rescue of two foreign women from prostitution

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी