31 C
Mumbai
Monday, May 20, 2024
Homeराजकीयगद्दारी करणाऱ्यांना फोटो वापरण्याचा अधिकार नाही, शरद पवारांचे अजित पवारांना खडेबोल

गद्दारी करणाऱ्यांना फोटो वापरण्याचा अधिकार नाही, शरद पवारांचे अजित पवारांना खडेबोल

शरद पवार यांचे फोटो पोस्टरवर लावा असे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना देऊन आपण काकांचा आदरच करत सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न चालवला आहे, त्याला शरद पवार यांनी अखेर विरोध केला आहे. माझ्या विचारांशी गद्दारी करणाऱ्यांनी माझे फोटो लावू नयेत, असे खडेबोल शरद पवारांनी अजित पवार यांना सुनावले आहे. तसेच अजित पवार यांच्यासोबत गेलेल्या कोणतेही नेत्याचा फोटो फ्लेक्सवर वापरायचा नाही, असे आदेश शरद पवारांनी कार्यकर्त्यांना दिल्याचे समजते आहे.

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केल्यावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो स्टेज वर लावून आम्ही दोन्ही कॉँग्रेसपासून शिवसेना वाचवली असे सांगायला वर्षभरात सुरुवात केली. त्याला उद्धव ठाकरे यांनी, ‘तुमचा बाप आहे, त्यांचे फोटो लावा, दुसऱ्याचा बाप का चोरता’, अशा कडक शब्दात उत्तर दिले होते. आता तोच कित्ता अजित पवार हे काकांचा अर्थात शरद पवार यांचा फोटो पोस्टरवर लावा असे आदेश देऊन गिरवत आहेत, त्याला शरद पवार यांचा आक्षेप आहे. म्हणूनच की काय, माझ्या विचारधारेशी गद्दारी करणाऱ्यांना माझे छायाचित्र वापरण्याचा अधिकार नाही, अशा कठोर शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अजित पवार यांची खरडपट्टी केली.  त्यामुळे जनतेची विशेषतः, पक्षाच्या कार्यकर्त्यांची सहानभूती मिळवण्याचा अजित पवार यांचा हाही मनसुबा पवार यांच्या आदेशाने उद्ध्वस्त होणार आहे.

रविवारी अजित पवार यांनी काही आमदारांना हाताशी घेत सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला. अजित पवार आणि आठ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. शपथविधी झाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या कार्यकर्त्यांना शुभेच्छांच्या होर्डिंगवर शरद पवार यांचे फोटो लावण्याचे आदेश दिले होते. शरद पवार यांनी आपल्या शैलीत अजित पवारांना खडसावले आहे. माझ्या विचारांशी गद्दारी करणाऱ्यांना फोटो वापरण्याचा अधिकार नाही, असे शरद पवार म्हणाले आहेत.

हे सुद्धा वाचा 

शरद पवारांनी सांगून देखील अजित पवारांनी ऐकले नाही

सई मांजरेकरचा डिस्को डान्सा… फोटो पाहून चाहते घायाळ

‘या’ कारणामुळे झाला समृद्धी महामार्गावर ‘त्या’ बसचा अपघात; फॉरेन्सिक अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना सादर

अजित पवार यांच्यासोबत गेलेल्या नेत्यांचे फोटो प्लेक्सवर लावू नका, असा आदेश शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना दिले आहेत. पक्षातून निघून गेलेल्या नेत्यांविरोधात मैदानात उतरून रस्त्यावरची
जोरदार लढाईची तयारी शरद पवार यांच्याकडून सुरु आहे. आता कोणतेही परिस्थितीमध्ये माघार न घेता आगामी निवडणुकांना अजित पवार गटाविरोधात सामोरे जायचं, असा निर्णय पवारांनी घेतल्याचे सुत्रांनी सांगितले. आठ तारखेला नाशिकपासून सुरु होणाऱ्या दौऱ्यात मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आदेशही कार्यकर्त्यांना पवारांनी दिलेत.

कोल्हापुरात कार्यकर्त्यांचा विरोध –

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या कार्यकर्त्यांना होर्डिंगवर शरद पवार यांचे फोटो लावण्याचे आदेश दिले.. मात्र कोल्हापुरातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी याला विरोध केला आहे. शरद पवार यांना त्रास देणाऱ्या अजित पवार यांनी शरद पवारांचा फोटो पोस्टरवर लावू नये, त्यांना नैतिक अधिकार नाही, अशा पद्धतीची भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी घेतली आहे. दरम्यान, अजित पवार यांनी आज नव्या पक्ष कार्यालयाचे उद्घाटन केले. या कार्यालयात शरद पवार यांचा फोटो लावण्यात आला आहे.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी