29 C
Mumbai
Thursday, May 9, 2024
Homeराजकीयशरद पवारांनी सांगून देखील अजित पवारांनी ऐकले नाही

शरद पवारांनी सांगून देखील अजित पवारांनी ऐकले नाही

अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सत्ताधाऱ्यांसोबत सामील होत रविवारी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली, त्यांच्यासोबत राष्ट्रवादीच्या आठ आमदारांनी देखील शपथ घेतली. त्यानंतर राष्ट्रवादीतील दुफळी जगजाहीर झाली असून अजित पवार यांनी पक्षावर आपला दावा सांगितला आहे. अजित पवार यांनी पक्षाच्या नव्या कार्यालयाचे उद्घाटन देखील आज केले. यावेळी त्यांच्या कार्यालयात शरद पवार यांचा फोटो देखील अजित पवार यांनी लावला आहे. मात्र शरद पवारांनी जयंत पाटलांच्या नेतृत्त्वातील पक्षच आमचा पक्ष असल्याचे सांगत इतरांनी माझा फोटो वापरू नये असे सांगितले असून देखील अजित पवारांनी कार्यालयात शरद पवार यांचा फोटो लावला आहे.

अजित पवार सत्तेत सामील झाल्यानंतर पक्षातील दुफळीचे चित्र स्पष्ट झाले आहे. अजित पवार आणि राष्ट्रवादीच्या आठ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी त्यांना अपात्र करण्याच्या दृष्टीने पाऊल उचलले आहे. तर दुसरीकडे अजित पवार यांच्या नेतृत्वातील गटाने जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड यांना हटवत असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे पक्ष आता कुणाचा ही दिर्घकाळाची लढाई सुरु झाली आहे. दरम्यान उद्या दोन्ही गटांनी पक्षाची बैठक बोलावली असून आमदार, खासदार, पदाधिकाऱ्यांना तसे आदेश दिले आहेत.


अजित पवार यांनी मुंबईत पक्षाचे नवे कार्यालय उघडले असून आज त्याचे उदघाटन देखील केले. या कार्यालयात अजित पवार यांनी राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचा फोटो देखील लावला असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. शरद पवार यांनी माझ्या परवानगीनेच माझा फोटो वापरावा. जिवंतपणी माझा फोटो कुणी वापरावा याचा अधिकार माझा आहे. मी ज्या पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष आहे त्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आहेत. त्यामुळे इतरांनी माझा फोटो वापरू नये असे पवारांनी म्हटले होते. मात्र अजित पवार यांच्या कार्यालयात शरद पवारांचा फोटो दिसून आला. काल अजित पवार यांच्या पत्रकार परिषदेत शरद पवार हे पक्षाचे अध्यक्ष असल्याचे पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना म्हटले होते. आज अजित पवार यांच्या कार्यालयात शरद पवारांचा फोटो देखील लावल्याचे दिसून आले.

हे सुद्धा वाचा

‘या’ कारणामुळे झाला समृद्धी महामार्गावर ‘त्या’ बसचा अपघात; फॉरेन्सिक अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना सादर

अंबानी कटुंबावर ‘ईडी’ची वक्रदृष्टी; काल अनिल अंबानी तर आज टीना अंबानींची चौकशी

अजित पवारांच्या आमदारांची संख्या अजून कळेना

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी