34 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeराजकीयएनडीएच्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी पवार, पटेल शरद पवारांचे मन वळवत होते

एनडीएच्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी पवार, पटेल शरद पवारांचे मन वळवत होते

अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल यांनी सोमवारी आणि मंगळवारी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर राज्याच्या राजकारणाला वेगळी कलाटणी मिळेल, असे वाटत असताना राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) दिल्लीतील बैठकीला उपस्थित रहावे असे भाजपाचे प्रयत्न होते. शरद पवार यांना एनडीच्या बैठकीचं अनौपचारिक आमंत्रण होतं. याच आमंत्रणाच्या पार्श्वभूमीवर अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल शरद पवारांचं मन वळवण्यासाठी त्यांना भेटले होते अशी माहिती आता समोर येत आहे. शरद पवार यांनी या भेटीबाबत कोणतीही प्रतिकिया दिलेली नाही, त्यामुळे या भेटीचे गूढ वाढले आहे.

राज्यातील राजकारणामध्ये मागील काही आठवड्यांपासून सुरु असलेल्या नाट्यमय घडामोडींच्या माध्यमातून विरोधकांची आघाडी मोडण्याचा भारतीय जनता पार्टीचा विचार सुरु होता अशी माहिती समोर आली आहे. विरोधी पक्षांची मोट बांधण्यासाठी पुढाकार घेणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीच राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या दिल्लीतील बैठकीला उपस्थित रहावे असे भाजपाचे प्रयत्न होते. शरद पवार यांना एनडीच्या बैठकीचं अनौपचारिक आमंत्रण होतं. याच आमंत्रणाच्या पार्श्वभूमीवर अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल शरद पवारांचं मन वळवण्यासाठी त्यांना भेटले होते अशी माहिती मिळत आहे.

हे सुद्धा वाचा:

सलग दुसऱ्या दिवशीही मध्य रेल्वे सेवा विस्कळीत; हार्बर रेल्वेलाही फटका

बोगस खते व बियाणे विकणार्‍यांवर नियंत्रणासाठी सरकार कायदा आणणार- अजित पवार

बोगस बियाणेप्रकरणी हप्तेखोरांच्या टोळ्या फिरत आहे; कॉँग्रेसच्या बाळासाहेब थोरातांचा सरकारवर आरोप

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये या महिन्याच्या सुरुवातीला बंडखोरी झाली. अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीच्या 9 आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. बंडखोर आमदारांमध्ये शरद पवारांचे अनेक विश्वासू सहकाऱ्यांचा समावेश आहे. यात प्रामुख्याने छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील, प्रफुल्ल पटेल यांचाही समावेश आहे. या नाट्यमय घडामोडींनंतर शरद पवारांनी संघर्षाचा इशारा देत आपण या भूमिकेचं समर्थन करणार नाही असं स्पष्ट केलं होतं. त्यानंतर 16 जुलै रोजी दुपारी अचानक अजित पवार, प्रफुल्ल पटेल आणि शपथ घेतलेले 9 मंत्री शरद पवार यांची भेट घेण्यासाठी मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये पोहोचले होते. या भेटीनंतर प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवारांचे आशिर्वाद घेण्यासाठी आम्ही आल्याचं सांगितलं. त्यानंतर दुसऱ्या दिवशी राष्ट्रवादीच्या अजित पवार गटातील सर्व आमदारांनी याच ठिकाणी शरद पवारांची भेट घेतली. ही भेटही आशिर्वाद घेण्यासाठी होती असं सांगण्यात आलं. मात्र आता या भेटींमागील खरं कारण समोर आलं आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी