26 C
Mumbai
Thursday, September 14, 2023
घरमुंबईसलग दुसऱ्या दिवशीही मध्य रेल्वे सेवा विस्कळीत; हार्बर रेल्वेलाही फटका

सलग दुसऱ्या दिवशीही मध्य रेल्वे सेवा विस्कळीत; हार्बर रेल्वेलाही फटका

मंगळवार रात्रीपासून पावसाने उसंत न घेतल्याने बुधवारी दुसऱ्या दिवशीही मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली. शिवाय पावसाचा हार्बर रेल्वेलाही फटका बसला आहे. पनवेल ते बेलापूर आणि अंबरनाथ ते बदलापूर रेल्वे वाहतूक ठप्प झाल्याचे चित्र सकाळी पहायला मिळाले. आता रेल्वे वाहतूक सुरळीत झाली असली तरी गाड्या उशिराने धावत असल्याने प्रवाशांचे चांगलेच वांडे झाले आहे.

मध्य रेल्वेची वाहतूक सकाळी दहापासून विस्कळीत झाली होती. मागील वाहतूक ठप्प झाल्याने कामाला निघालेला कर्मचारी वर्ग अडकला होता. सकाळची वेळ असल्यामुळे कार्यालयात जाण्यासाठी निघालेल्या प्रवाशांचे हाल होत असून पनवेल स्थानकात देखील गर्दी पाहायला मिळत होती. रेल्वे वाहतूक विस्कळीत झाल्यानंतरही अर्धा तास मध्य रेल्वेचा जनसंपर्क विभाग मात्र अनभिज्ञ होता. अखेर अर्ध्या तासानंतर रेल्वेने लोकलची सेवा विस्कळीत झाल्याचे जाहीर केले. काही ठिकाणी लोकल प्रचंड उशिराने धावत होत्या.मात्र काही ठिकाणी बंद पडलेल्या होत्या. मुंबईच्या तिन्ही रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. ट्रेन आता उशिरानं धावत आहेत. लोकलचं वेळापत्रक विस्कळीत झाल्यानं चाकरमान्यांना कामावर जाताना समस्यांचा सामना करावा लागत होता. काही स्थानकात रेल्वे मार्गावरील ट्रेन सध्या सुरू आहेत मात्र अत्यंत धीम्या गतीनं वाहतूक सुरू आहे.

हे सुद्धा वाचा:

बोगस खते व बियाणे विकणार्‍यांवर नियंत्रणासाठी सरकार कायदा आणणार- अजित पवार

बोगस बियाणेप्रकरणी हप्तेखोरांच्या टोळ्या फिरत आहे; कॉँग्रेसच्या बाळासाहेब थोरातांचा सरकारवर आरोप

किरीट सोमय्या व्हायरल व्हिडिओ प्रकरण चिघळलं, जितेंद्र आव्हाडांच्या मुलीचं ट्विट चर्चेत

कल्याण, डोंबिवली परिसरात मागील तीन तासात धुवाधार पाऊस झाला आहे. विठ्ठलवाडी परिसरात मागील तीन तासात 57 मिमी पाऊस तर कल्याण शहरात 35 मिमी पावसाची नोंद झाली आहे. तिकडे, डोंबिवली परिसरात देखील मागील तीन तासात 49 मिमी पावसाची नोंद झाली आहे. आज दिवसभर पावसाचा जोर कायम राहणार आहे. ठाणे जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी