राजकीय

फडणवीसांच्या ‘त्या’ वक्तव्यानंतर २४ तासांत पत्रकार वारिशे यांची हत्या, हा योगायोग समजावा का?

रत्नागिरी जिल्हयातील विनाशकारी रिफायनरी प्रकल्पाविरोधात आपल्या लेखणीच्या माध्यमातून जनजागृती करणारे राजापूर येथील तरुण पत्रकार शशिकांत वारिशे यांची दिवसाढवळ्या हत्या करण्यात आली. जमिनीचा दलाल पंढरीनाथ आंबेरकर याने त्याच्या ‘एसयूव्ही’ गाडीखाली चिरडून या जिगरबाज पत्रकाराची निर्घृणपणे हत्या केली. मात्र, हा अपघात असल्याचे सुरुवातीला भासविण्यात आले होते. या हत्या प्रकरणात संशयाची सुई सत्ताधाऱ्यांकडे जात असल्याचे शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी सूचित केले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाणार येथे रिफायनरी होणारच. कोण अडवतेय ते पाहू? असा धमकीवजा इशारा दिला होता. त्यानंतर २४ तासांतच शशिकांत वारिशे यांची हत्या करण्यात आली. आंगणेवाडी येथील भारतीय जनता पक्षाच्या जाहीर सभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे वक्तव्य केले होते. हा योगायोग समजावा का? असा सवाल खासदार संजय राऊत यांनी केला असून या प्रकरणाची समांतर न्यायालयीन चौकशी व्हावी, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच केली आहे. त्यामुळे या हत्येला आता राजकीय रंग चढला आहे. (Should we consider the killing of journalist Warishe a coincidence? Sanjay Raut raised a Question)

रत्नागिरी जिल्हयातील राजापूर येथील तरुण पत्रकार शशिकांत वारिशे यांच्या हत्येचा खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून निषेध केला आहे. आपल्यासारख्या प्रशासनाचा मोठा अनुभव असलेल्या नेत्याकडे गृह विभागाचे नेतृत्व असताना राज्यात दिवसाढवळ्या खून पडावेत व संबंधित गुन्हेगारांना राजाश्रय मिळावा, हे चिंताजनक आहे, असे राऊत यांनी म्हंटले आहे. “महाराष्ट्रात घटनाबाह्य सत्तांतर झाल्यानंतर, रत्नागिरीचे राजकीय पालकमंत्री व त्यांच्या समर्थकांनी ‘रिफायनरी’ विरोधकांना सरळ धमक्या देण्यास सुरुवात केली. त्यासाठी जिल्ह्यातील पोलीस यंत्रणा, जिल्हाधिकारी यांना वापरण्यात आले.

पत्राद्वारे सरकारच्या दडपशाहीचा निषेध…

 

“शशिकांत वारिशे यांच्यावर देखील पोलीस व इतर सरकारी यंत्रणांचा दबाव होता व रिफायनरीविरुद्ध भूमिका घेतली तर परिणाम भोगावे लागतील, असा सावधानतेचा इशारा देण्यात आला. आपल्या आंगणेवाडीतील भाषणाने रिफायनरी समर्थकांतील गुंड प्रवृत्तींना हिरवा झेंडाच मिळाला व वारिशे यांची हत्या झाली, असे आपणास वाटत नाही काय?” असा गंभीर सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.

या प्रकरणाची चौकशी आता विशेष चौकशी पथकामार्फत करण्यात येणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी सायंकाळी जाहीर केले.

हे सुद्धा वाचा

Sanjay Raut : शिवाजी महाराजांच्या अपमानानंतर राज्यात असंतोष; संजय राऊतांनी दिला ‘महाराष्ट्र बंद’ आंदोलनाचा इशारा

Sanjay Raut Bail : आता मी पुन्हा लढेन, कामाला सुरुवात करेन; संजय राऊतांची जामीन मिळाल्यानंतर पहिली प्रतिक्रिया!

ये एकदा गायीसमोर, बघ तुझा हग डे कसा होतो ते..! अजित पवारांची केंद्र सरकारवर टीका

टीम लय भारी

Recent Posts

‘काँग्रेस कसाबची बाजू घेतेय, हा शहिदांचा अपमान’, PM मोदींचा हल्लाबोल

काँग्रेसवाले मिळून दहशतवादी कसाबची बाजू घेतायत. काँग्रेसच्या काळात विदेश राज्यमंत्री राहिले आणि कुटुंबातील जवळच्यानेही कसाबला…

5 hours ago

शांतिगिरी महाराज यांना माघारीसाठी दोन वेळा संपर्क : मुख्यमंत्री शिंदे

राजकीय अधिष्ठानापेक्षा धार्मिक अधिष्ठान नेहमी मोठे असते . त्यामुळे मी स्वतः महंत शांतिगिरी महाराज (Shantigiri…

5 hours ago

तुम्ही तर महागद्दार निघाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ; ठाकरेंवर हल्लाबोल

विजय करंजकर यांच्या भावना योग्य आहे. लोकसभेच्या उमेदवारीसाठी आदल्या दिवासापर्यंत त्यांच नाव चर्चेत होत. तसंच…

5 hours ago

अमेरिकेत ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’चे शंभर शोज ‘हाऊसफुल्ल’

'गीतरामायणा'ला स्वरसाज देणारे संगीतकार, गायक सुधीर फडके म्हणजेच आपल्या सर्वांचे लाडके बाबूजी यांची जीवनगाथा सांगणारा…

6 hours ago

राजाभाऊ वाजेंच्या प्रचारासाठी डी.जी.सूर्यवंशी समन्वयक

नाशिक लोकसभा मतदार संघातील उमेदवार राजाभाऊ वाजे (Rajabhau Waze) यांच्या प्रचाराची धुरा सांभाळण्यासाठी महाविकास आघाडीचे…

6 hours ago

नरेंद्र मोदी फेकाडे, इंदिरा गांधी कर्तृत्ववान

लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. देशभरातील वातावरण ढवळून निघाले आहे. या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ पत्रकार ज्ञानेश…

9 hours ago