33 C
Mumbai
Friday, April 26, 2024
HomeराजकीयSanjay Raut Bail : आता मी पुन्हा लढेन, कामाला सुरुवात करेन; संजय...

Sanjay Raut Bail : आता मी पुन्हा लढेन, कामाला सुरुवात करेन; संजय राऊतांची जामीन मिळाल्यानंतर पहिली प्रतिक्रिया!

गेले शंभर दिवस संजय राऊत ऑर्थर रोड तुरूंगात होते आज त्यांच्या जामीनावर विशेष पीएमएलए न्यायालयात सुनावणी झाली, यावेळी न्यायालयांने त्यांना जामीन मंजूर केल्यानंतर त्यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. संजय राऊत म्हणाले की, माझा न्याय देवतेवर पूर्ण विश्वास होता. आता मी पुन्हा लढेन, कामाला सुरूवात करेन असे ते म्हणाले.

पत्राचाळ घोटाळा प्रकरणात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) चे खासदार संजय राऊत यांना आज विशेष पीएमएलए न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतर शिवसेनेत जल्लोषाचे वातावरण आहे. गेले शंभर दिवस संजय राऊत ऑर्थर रोड तुरूंगात होते आज त्यांच्या जामीनावर विशेष पीएमएलए न्यायालयात सुनावणी झाली, यावेळी न्यायालयांने त्यांना जामीन मंजूर केल्यानंतर त्यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. संजय राऊत म्हणाले की, माझा न्याय देवतेवर पूर्ण विश्वास होता. आता मी पुन्हा लढेन, कामाला सुरूवात करेन असे ते म्हणाले.

न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतर संजय राऊत यांना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना पदाधिकाऱ्याच्या फोनवर फोन करुन संजय राऊत यांना शुभेच्छा दिल्या. तसेच लवकरच संजयला भेटेन असा निरेप देखील त्यांनी दिला. उद्धव ठाकरे यांचा फोन आल्याचा निरोप मिळाल्यानंतर संजय राऊत यांनीही उद्धव ठाकरे यांना धन्यवाद दिले आहेत.
संजय राऊत यांना जामीन मिळाल्यानंतर अनेक राजकीय नेत्यांनी संजय राऊत यांना शुभेच्छा दिल्या आहेत. सुनील राऊत यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले की, संजय राऊत यांच्या पाठिशी असलेल्या आशिर्वादाने न्यायालयाने योग्य निकाल देत जामीन मंजूर आहे. संजय राऊत यांना कोर्टाने जामीन मंजूर केल्यानंतर कोर्टात उपस्थित असलेल्या अनेकांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले असल्याचे सुनील राऊत यांनी सांगितले.
हे सुद्धा वाचा :
Bharat Jodo Yatra in Maharashtra : शरद पवार भारत जोडो यात्रेला राहणार गैरहजर

Shetkari Samvad Yatra : शहाजी बापूंच्या मतदार संघात आदित्य ठाकरेंना तुफान प्रतिसाद

Sanjay Raut : 101 दिवसांचा वनवास संपला! संजय राऊतांना जामीन मंजूर

शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी ट्विटर वर टायगर इज बॅक अशी प्रतिक्रिया दिली आहे. तर राष्ट्रवादीचे आमदार रोहीत पवार यांनी पिंजऱ्यातून वाघ बाहेर पडल्याचा व्हिडीओ शेअर केला आहे. तर राष्ट्रवादीचे आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी संजय राऊत यांचा हातात हात घेऊन उंचावलेला फोटो पोस्ट करत ‘दोस्ती का दम दिखा देंगे हम.. वेलकम बॅक संजय राऊत, असे ट्विट केले आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी ट्विट करत म्हटले आहे की, माननीय न्यायालयाने खासदार संजय राऊत यांनी जामीन मंजूर केला आहे. न्यायालयाचे मन:पूर्वक आभार. विरोधकांनी आता आपल्या सतरंज्या सांभाळाव्या आणि हो कोंबड्यांनी आपली पिले घेऊन आता खुराड्यात जाण्याची वेळ आली आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी