राजकीय

केजरीवाल यांच्या अटकेनंतर पत्नी सुनीता यांचे ‘ते’ ट्विट चर्चेत, म्हणाल्या….

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal ) यांना 22 मार्च रोजी अटक करण्यात आली. कथित मद्य घोटाळ्याप्रकरणी केजरीवालांवर अटकेची कारवाई करण्यात आलीय. त्यांच्या अटकेनंतर विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड उठवली आहे. अशातच आता केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता (Sunita Kejriwal ) फ्रंटफूटवर आल्या आहेत. त्यांनी ट्विट करत मोदींवर टीका केली आहे. (Sunita Kejriwal tweet after Cm Arvind Kejiwal Was Arrested)

ईडीच्या अटकेत असलेल्या केजरीवाल यांना शुक्रवारी राऊस अव्हेन्यू कोर्टाने 6 दिवसांची अर्थात 28 मार्चपर्यंत ईडी कोठडी ठोठावली आहे. केजरीवाल यांनी बीआरएसच्या नेत्या के. कविता, माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्यासह मद्य धोरण घोटाळ्याचे कारस्थान रचल्याचा ईडीचा आरोप आहे.

केजरीवाल जेलमधूनच सरकार चालवणार? कायदा काय सांगतो?

दरम्यान, केजरीवाल यांची पत्नी सुनीता आज पत्रकार परिषद घेणार आहेत. त्यापूर्वी त्यांनी केलेलं ट्विट चर्चेत आलं आहे. ‘ ‘तुम्ही तीन वेळा निवडून दिलेल्या मुख्यमंत्र्यांना मोदीजींनी सत्तेच्या अहंकारातून अटक करायला लावली. ते सर्वांना नष्ट करण्याचा प्रयत्न करीत आहेत. हा दिल्लीतील जनतेचा विश्वासघात आहे. तुमचे मुख्यमंत्री नेहमीच तुमच्या पाठीशी उभे राहिले आहेत. आत असो वा बाहेर, त्यांचे जीवन देशासाठी समर्पित आहे. जनता जनार्दनला सगळं काही माहीत आहे.’ अशा आशयाचं ट्विट सुनिता यांनी केलं आहे.

केजरीवाल हे जेलमधूनच सरकार चालवतील असे अनेत मंत्री आणि नेत्यांचं म्हणणं आहे. केजरीवाल हे 28 मार्चपर्यंत ईडीच्या कोठडीत राहणार असून त्यांची चौकशी करण्यात येईल. याप्रकरणाची पुढील सुनावणी 28 मार्च रोजी दुपारी होणार आहे.

केजरीवालांच्या अटकेनंतर शरद पवारांचे मोठं वक्तव्य…

दिल्ली उच्च न्यायालयाने अटकेपासून संरक्षण देण्यास नकार देताच ईडीचे पथक केजरीवाल यांच्या निवासस्थानी पोहोचले. केजरीवाल यांचा सुमारे दोन तास जाबजबाब नोंदविल्यानंतर त्यांना अटक करुन ईडीच्या मुख्यालयात नेण्यात आले.

कोण आहेत सुनीता केजरीवाल?

सुनीता केजरीवाल या राजकारणात सक्रिय नसल्या तर अरविंद केजरीवाल यांच्यासोबत अनेकदा दिसल्या आहेत. १९९५ रोजी दोघांनी सात फेरे घेतले.

माझे जीवन…, अटकेनंतर अरविंद केजरीवाल काय म्हणाले?

सुनिता केजरीवाल या १९९३ बॅचच्या IRS महसूल अधिकारी होत्या. 2016 मध्ये व्हीआरएस घेतली. सुनिता यांनी जवळपास 22 वर्ष आयकर विभागात कार्य केलं आहे. व्हीआरएस घेण्यापूर्वी सुनिता यांना दिल्लीतील आयककर अपीलीय अधिकरण मध्ये आयकर आयुक्त म्हणून नियुक्त करण्यात आले होते.

धनश्री ओतारी

Recent Posts

30 मेपर्यंत खड्डे दुरुस्ती न झाल्यास महापालिका नेमकी कोणावर कारवाई करणार?

महाराष्ट्र नॅचरल गॅस कंपनीकडून (MNGL) घरोघरी स्वयंपाकाचा गॅस पुरवण्याच्या प्रकल्पासाठी पाइपलाइन टाकण्यासाठी रस्ते खोदले जात…

11 seconds ago

दीड लाखांची लाच घेताना पुरातत्व विभागाचे राज्याचे संचालक तेजस गर्गे, आरती आळे जाळ्यात

राज्य पुरातत्व आणि संग्रहालय संचालनालयाचे संचालक (State Director of Archaeology) संशयित डॉ. तेजस मदन गर्गे…

16 mins ago

100 कोटींच्या TDR घोटाळा अहवालात दडलय काय? 2 वर्षे उलटूनही गुप्तता कायम

महापालिका हद्दीतील व देवळाली शिवारातील टीडीआर (TDR) घोटाळ्याचा तपास केल्यानंतर महापालिकेने त्याचा गोपनीय अहवाल दोन…

45 mins ago

उबाठा गटाच्या विलिनीकरणाबाबत मनीषा कायंदे म्हणाल्या, शरद पवारांच्या विधानानंतर…

वैचारिकदृष्ट्या आम्ही गांधी, नेहरु यांच्या विचाराचे आहोत. काँग्रेस आणि आमच्यात फरक नाही. यामुळे अनेक प्रादेशिक…

1 hour ago

‘काँग्रेस कसाबची बाजू घेतेय, हा शहिदांचा अपमान’, PM मोदींचा हल्लाबोल

काँग्रेसवाले मिळून दहशतवादी कसाबची बाजू घेतायत. काँग्रेसच्या काळात विदेश राज्यमंत्री राहिले आणि कुटुंबातील जवळच्यानेही कसाबला…

13 hours ago

शांतिगिरी महाराज यांना माघारीसाठी दोन वेळा संपर्क : मुख्यमंत्री शिंदे

राजकीय अधिष्ठानापेक्षा धार्मिक अधिष्ठान नेहमी मोठे असते . त्यामुळे मी स्वतः महंत शांतिगिरी महाराज (Shantigiri…

13 hours ago