29 C
Mumbai
Thursday, April 25, 2024
Homeराजकीयमाझे जीवन..., अटकेनंतर अरविंद केजरीवाल काय म्हणाले?

माझे जीवन…, अटकेनंतर अरविंद केजरीवाल काय म्हणाले?

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल(Arvind Kejriwal ) यांना काल 21 मार्च रोजी अटक करण्यात आली. कथित मद्य घोटाळ्याप्रकरणी केजरीवालांवर अटकेची कारवाई करण्यात आलीय. त्यानंतर त्यांना आज ​राऊज एव्हेन्यू न्यायालयात हजर करण्यात आलं. यावेळी त्यांनी त्यांची पहिली प्रतिक्रिया दिली. (Arvind Kejriwal FIRST Reaction After Arrest Says My Life Dedicated To Nation)

केजरीवाल यांना अटक केल्यानंतर, आम आदमी पार्टीसह विरोधी पक्षांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. तर स्वतः माध्यमांशी संवाद साधत केजरीवाल यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. “मी आत असो वा बाहेर, माझे जीवन देशासाठी समर्पित आहे,” असं वक्तव्य अटकेनंतर केजरीवाल यांनी केलं आहे.

रात्री उशीरा अटक

दिल्ली उच्च न्यायालयाने अटकेपासून संरक्षण देण्यास नकार देताच ईडीचे पथक केजरीवाल यांच्या निवासस्थानी पोहोचले. केजरीवाल यांचा सुमारे दोन तास जाबजबाब नोंदविल्यानंतर त्यांना अटक करुन ईडीच्या मुख्यालयात नेण्यात आले.

केजरीवाल जेलमधूनच सरकार चालवणार? कायदा काय सांगतो?

केजरीवाल यांनी बीआरएसच्या नेत्या के. कविता, माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्यासह मद्य धोरण घोटाळ्याचे कारस्थान रचल्याचा ईडीचा आरोप आहे. केजरीवाल यांची अटक रद्द करण्यासाठी त्यांच्या विधी सल्लागारांनी रात्री उशिरा सर्वोच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रार कार्यालयात अर्ज दाखल केला.

केजरीवालांच्या अटकेनंतर शरद पवारांचे मोठं वक्तव्य…

केजरीवाल यांच्या निवासस्थानी ईडीचे अधिकारी पोहोचताच दिल्ली पोलीस आणि जलद कृती दलाच्या जवानांसह कडेकोट सुरक्षा बंदोबस्त करण्यात आला. तसेच ईडी कार्यालय परिसरात दिल्ली पोलिसांनी जमावबंदीचे आदेश लागू केले. मात्र, ईडीच्या कारवाईचा निषेध करण्यासाठी केजरीवाल यांचे समर्थक मोठ्या संख्येने या परिसरात पोहोचले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी