30 C
Mumbai
Wednesday, April 17, 2024
Homeमहाराष्ट्रकेजरीवालांच्या अटकेनंतर शरद पवारांचे मोठं वक्तव्य...

केजरीवालांच्या अटकेनंतर शरद पवारांचे मोठं वक्तव्य…

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal Arrested) यांना काल 21 मार्च रोजी अटक करण्यात आली. कथित मद्य घोटाळ्याप्रकरणी केजरीवालांवर अटकेची कारवाई करण्यात आलीय. केजरीवालांच्या अटकेनंतर विरोधी पक्षांमधील अनेक नेत्यांनी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे सर्वेसर्वा शरद पवार(sharad pawar ) यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

शरद पवार यांनी ट्विटरवर ट्विट करत तसेच पत्रकार परिषद घेत केजरीवाल यांच्यावरील कारवाईविरोधात संताप व्यक्त केला आहे.

काय म्हणाले शरद पवार?

भाजप सत्तेसाठी किती खाली झुकणार हे या अटकेवरून दिसून येत आहे. अरविंद केजरीवाल यांच्यावरील या असंवैधानिक कारवाईविरोधात ‘इंडिया आघाडी’ एकजुटीने उभी आहे. सार्वत्रिक निवडणुका तोंडावर आल्या असताना विरोधकांना लक्ष्य करण्यासाठी केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर केला जात आहे, याचा तीव्र निषेध असल्याचेही पवार यांनी यावेळी म्हटले.

रात्री उशीरा अटक

दिल्ली उच्च न्यायालयाने अटकेपासून संरक्षण देण्यास नकार देताच ईडीचे पथक केजरीवाल यांच्या निवासस्थानी पोहोचले. केजरीवाल यांचा सुमारे दोन तास जाबजबाब नोंदविल्यानंतर त्यांना अटक करुन ईडीच्या मुख्यालयात नेण्यात आले.

केजरीवाल यांनी बीआरएसच्या नेत्या के. कविता, माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्यासह मद्य धोरण घोटाळ्याचे कारस्थान रचल्याचा ईडीचा आरोप आहे. केजरीवाल यांची अटक रद्द करण्यासाठी त्यांच्या विधी सल्लागारांनी रात्री उशिरा सर्वोच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रार कार्यालयात अर्ज दाखल केला.

केजरीवाल यांच्या निवासस्थानी ईडीचे अधिकारी पोहोचताच दिल्ली पोलीस आणि जलद कृती दलाच्या जवानांसह कडेकोट सुरक्षा बंदोबस्त करण्यात आला. तसेच ईडी कार्यालय परिसरात दिल्ली पोलिसांनी जमावबंदीचे आदेश लागू केले. मात्र, ईडीच्या कारवाईचा निषेध करण्यासाठी केजरीवाल यांचे समर्थक मोठ्या संख्येने या परिसरात पोहोचले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी