PM मोदींच्या ‘त्या’ विधानावर पवारांची गुगली; माझं बोट धरून राजकारणात…

लोकसभा निवडणूकीच्या (Lok sabha election) पार्श्वभूमिवर सत्ताधाऱ्यांसह विरोधक जुन्या आठवणींना उजाळा देत एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडत आहेत. याच प्रत्यय शरद पवार (Sharad Pawar) यांनी घेतलेल्या सभेत आला. काल बारामती येथे शेतकरी-कामगार मेळाव्यात शरद पवार बोलत होते. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर (PM Narendra Modi) तोफ डागली. सात वर्षांपूर्वी मोदींनी केलेल्या विधानाची आठवण करुन देत पवारांनी कोपरखळी मारली.

सात वर्षापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी पुण्यात घेतलेल्या एका सभेत ‘शरद पवारांचे बोट धरून मी राजकारण शिकलो’, असं विधान केलं होतं. हेच विधान पकडत पवरांनी (Sharad Pawar) मोदींनी हल्लाबोल केला.

काय म्हणाले पवार?

पंतप्रधान मोदी साहेब बोलतात खूप. एकदा तर त्यांनी सांगितलं की, शरद पवारांचे बोट धरून मी राजकारणात आलो. पण आज त्यांचे जे काही राजकारण सुरू आहे. ते माझ्या विचारांनी नाही. माझं बोट धरल्यावर मी असलं काम करू देणार नाही. मोदी सरकारने आखलेली धोरणे हीताची नाहीत.

धुळे : माजी आमदार अनिल गोटे यांची अजित पवार गटावर टोलेबाजी

व्यापाऱ्यांची मी नियोजित केलेली बैठक याआधी महाराष्ट्रात कधीही रद्द झाली नव्हती. मात्र यावेळी ती रद्द झाली, कारण एकप्रकारचा दबाव टाकला जात आहे. दबावानं समाजकारण, राजकारण करता येत नाही.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कर लावून जनतेकडून १०० रुपये वसूल करतात आणि मग त्यातलेच सहा रुपये आपल्या खिशात टाकून म्हणतात मी तुम्हाला पैसे दिले. ही आहे मोदी गॅरंटी म्हणत, पवारांनी मोदींनी टोमणा हाणला.

लोकसभा आचारसंहितेचे उल्लंघन होतेय ? मग, सीव्हिजिल ॲपवर तक्रार करा….

सामान्य लोकांचे हित नाही, तिथे बदल पाहिजे. बदल पाहिजे असेल तर लोकसभेची निवडणूक महत्त्वाची आहे. म्हणून निवडणूकीत बटण दाबलं पाहिजे. आता यावेळेची खूण ही वेगळी आहे. घड्याळ्याची खूण ही तुम्हाला पाठ होती. आमचा पक्ष, घड्याळ, झेंडा सगळ्याचीच चोरी झाली. बाकी किरकोळ काही नाही, होलसेल चोरी झाली. सगळेच्या सगळे सोडून गेले. आता आम्ही नवा पक्ष, नवी खूण, नवा झेंडा, पण तोच जुना कार्यक्रम घेऊन पुढे आलेलो आहोत. असं शरद पवारांनी यावेळी संबोधित केले.

माढ्याच्या जागेसाठी शरद पवारांच्या मनातील उमेदवार कोण?

ज्यावेळेला शिवछत्रपती परत येतात त्यावेळेला दाराशी याच तुतारीने त्यांचं स्वागत होतं. आज महाराष्ट्रात झालेल्या बदलातून महाराष्ट्राच्या सामान्य माणसाच्या जीवनाच्या परिवर्तनाची तुतारी वाजवायची आहे. त्यासाठी ही खूण लक्षात ठेवली पाहिजे. आणि हे काम तुम्ही लोकांनी करावं. असं आव्हानही यावेळी पवारांनी मतदारांना केलं.

धनश्री ओतारी

Recent Posts

अदानी-अंबानीने काँग्रेसला पैसे दिल्याचे मोदींचे विधान बेजबाबदारपणाचे; अदानी अंबानीची चौकशी करा सत्य बाहेर येईल: डॉ. भालचंद्र मुणगेकर

अदानी-अंबानी कडून काँग्रेस पक्षाला टेम्पो भरून पैसे मिळाल्यानेच राहुल गांधी आता त्यांना शिव्या देत नाहीत…

18 mins ago

बडगुजर यांच्यावरील कारवाईविरोधात महाविकास आघाडीचे नेते आक्रमक

लोकसभा निवडणुकीच्या प्रचार सुरू असताना शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर (Badgujar )यांना बजाविण्यात आलेली…

27 mins ago

श्रीरामाचं मदीर, ३७० हे ठीक, पण शेतकरी मातीत जातोय त्याचं काय ?

लोकसभा निवडणुकीचा तिसरा टप्पा लवकरच होवू घातला ( Elections 2024:In Ahmednagar, Farmers Unhappy With BJP…

2 hours ago

अक्षय तृतीयेनिमित्त बाजारात होणार कोट्यवधीची उलाढाल

साडेतीन मुहूर्तपैकी एक असणाऱ्या अक्षयतृतीयेनिमित्त (Akshaya Tritiya) नाशिक शहर आणि जिल्हयात कोट्यवधींची आर्थिक उलाढाल (Crores…

4 hours ago

सीताफळ खा स्वस्थ रहा! सीताफळ खाण्याचे फायदे

अँटी-ऑक्सिडेंट गुणधर्मांनी समृद्ध असणाऱ्या सीताफळाची (custard apple) चव फार कमी लोकांना आवडते, पण या फळात…

4 hours ago

सेवा निवृत्त पोलिस अधिकाऱ्याला सुने कडुन दहा कोटी रुपयांची खंडणी मागणी

नातू सम्राटला भेटायचे असेल किंवा सम्राटला ताब्यात ठेवायचे असेल तर नवी मुंबई मध्ये जॅग्वार गाडी,…

5 hours ago