33 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
Homeराजकीयखासदार सुप्रिया सुळे, मंत्री दत्तात्रय भरणेंनी धनगर समाजाच्या आंदोलकांशी साधला संवाद

खासदार सुप्रिया सुळे, मंत्री दत्तात्रय भरणेंनी धनगर समाजाच्या आंदोलकांशी साधला संवाद

टीम लय भारी

मुंबई : धनगर आरक्षण आणि इतर मागण्यांसाठी आझाद मैदानावर बसलेल्या धनगर समाजातील आंदोलकांसोबत राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे व सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी भेट घेतली. यावेळी सुळे व भरणे यांनी आंदोलकांशी संवाद साधला. एवढेच नव्हे तर, बहुजन विकास खात्याचे मंत्री विजय वडेट्टीवार यांच्याशी बैठकही घडवून घाणली.

खासदार सुप्रिया सुळे, मंत्री दत्तात्रय भरणेंनी धनगर समाजाच्या आंदोलकांशी साधला संवाद

यशवंत सेनेचे संस्थापक अध्यक्ष भारत सोन्नर यांच्या नेतृत्वाखाली धनगर समाजाच्या वतीने आज आंदोलन करण्यात आले. धनगर आरक्षणाची अंमलबजावणी करावी, आदिवासींच्या धर्तीवर धनगर समाजालाही सगळ्या योजना लागू करून त्यासाठी भरीव तरतूद करावी, धनगर समाजातील आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यात यावेत इत्यादी मागण्यांसाठी यशवंत सेनेच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले होते.

खासदार सुप्रिया सुळे, मंत्री दत्तात्रय भरणेंनी धनगर समाजाच्या आंदोलकांशी साधला संवाद

धनगर समाजाच्या या मागणीची दखल घेत मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सुप्रियाताई सुळेंना आंदोलकांची भेट घेण्याची विनंती केली. त्यानुसार सुप्रियाताईंनी आंदोलकांची भेट घेतली. आंदोलकांच्या मागणीची सरकार दरबारी दखल घेण्याच्या अनुषंगाने त्यांनी मंत्री विजय वडेट्टीवार यांच्यासोबत बैठक सुद्धा घडवून आणली.

हे सुद्धा वाचा

भाजपने धनगरांच्या देवस्थानांचीही केली फसवणूक, आता राष्ट्रवादीचे दत्ता भरणे पाळणार शब्द

धनगर समाजासाठी अजितदादांकडे १ हजार कोटींची मागणी; धनगर शिष्टमंडळाचा आग्रह, आरक्षणाबाबतही दिले आश्वासन

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी