30 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
Homeराजकीयविदर्भात राष्ट्रवादी पाडणार काँग्रेसला खिंडार; मोठ्या नेत्याच्या पक्षप्रवेशाची जोरदार चर्चा

विदर्भात राष्ट्रवादी पाडणार काँग्रेसला खिंडार; मोठ्या नेत्याच्या पक्षप्रवेशाची जोरदार चर्चा

महाराष्ट्र काँग्रेसमधील धुसपुस थांबण्याचे नाव घेत नसतानाच आता काँग्रेसमधील नेते उघडउघड एकमेकांवर आरोप करत आहेत. विदर्भातील काँग्रेसचे नेते आशिष देशमुख यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर त्यानंतर थेट राहुल गांधी यांच्यावर देखील टीका केली. आशिष देशमुख आणि नाना पटोले यांच्यात सध्या विस्तव जात नसल्याचे चित्र आहे. त्यातच आशिष देशमुख आता राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि सत्यजीत तांबे यांच्यातील वाद पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीवेळी समोर आला होता. निवडणूक झाल्यानंतर सत्यजीत तांबे यांनी पत्रकार पऱिषद घेत नाना पटोले यांच्यावर आरोपाच्या फैरी झाडल्या. त्यातच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि सत्यजीत तांबे यांचे मामा बाळासाहेब थोरात आणि नाना पटोले यांच्यातील मतभेद समोर आले. त्यांनतर हे नाराजीनाट्य दिल्लीपर्यंत पोहचले. दिल्लीतून हा वाद सोडविण्याचा प्रयत्न झाला. मात्र नाना पटोले यांच्यावर नाराज असलेले आशिष देशमुख हे मात्र आक्रमकपणे पटोलेंविरोधात बोलत असतात. नाना पटोलेंच्या नेतृत्त्वाबाबत त्यांनी उघडपणे तक्रारी केल्या आहेत. मात्र काल त्यांनी राहुल गांधी यांच्यावर देखील टीका केली. त्यानंतर पक्षातील काही नेत्यांनी आशिष देशमुख यांच्यावर टीका केली.

हे सुद्धा वाचा 
रोशनी शिंदे मारहाणप्रकरण दिल्ली दरबारात; ठाकरे गटाच्या प्रियांका चतुर्वेदी, शिंदे गटाच्या भावना गवळी यांनी घेतली अमित शहांची भेट

फडतूस फडणवीस !

आता चोरांवरही मोक्का कायदयानुसार होणार कारवाई  

दरम्यान आशिष देशमुख हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संपर्कात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली असून ते लवकरच राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार असल्याचे देखील बोलले जात आहे. देशमुख नागपुरमधील हिंगणा मतदारसंघात राष्ट्रवादीचा मेळावा घेणार असून या मेळाव्यात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, अजित पवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरु आहे. काही दिवसांपुर्वी त्यांनी शरद पवार आणि अजित पवार यांची भेट घेतली होती. त्यामुळे काँग्रेसचा विदर्भातील मोठा नेता राष्ट्रवादीच्या गळाला लागणार का याबाबबद लोकांमध्ये कुतुहल निर्मान झाले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी