राजकीय

देशात सरकार कुणाचे? मोदींचे की अदानीचे? बिर्ला-इंदिरा गांधी यांच्या किश्श्याची चर्चा!

हिंडनबर्ग रिसर्च रिपोर्टनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आवडते उद्योगपती गौतम अदानी यांचा बाजार उठू लागलाय. दुसरीकडे, सर्वसामान्य जनतेचे एलआयसी आणि स्टेट बँकेतील पैसे अदानीसाठी वळते करण्यावरून देशात सरकार कुणाचे? मोदींचे की अदानीचे?? हा सवाल उपस्थित होऊ लागला आहे. (Whose Government In The Country Modi or Adani) त्यानिमित्ताने उद्योगपती बिर्ला-इंदिरा गांधी यांच्या किश्श्याची चर्चा नव्याने सुरू झाली आहे.

ब्लिट्झ हे एकेकाळी गाजलेले इंग्रजी साप्ताहिक टॅब्लॉइड वृत्तपत्र होते. विशेषत: आफ्टरनूनसारखीच शोध पत्रकारितेसाठी ब्लिट्झची ख्याती होती. 2 सप्टेंबर 1967 रोजी ब्लिट्झने सवाल उपस्थित केला होता, की देशात सरकार कुणाचे आहे? बिर्ला की इंदिराजी?? तेव्हा संसद इंदिरा गांधींच्या नेतृत्वात होती. ब्लिट्झच्या सवालावर काँग्रेसचे संसदीय सचिव चंद्रशेखर म्हणाले होते – बिर्लांचे!

व्यंगचित्र क्रेडिट : ट्विटर

आज 56 वर्षांनंतर 56 इंचांच्या सरकारला कोणीतरी हाच प्रश्न विचारण्याची आहे, की देशात सरकार कुणाचे? मोदींचे की अदानीचे? तसे शेअर्सधारक अजूनही संभ्रमात आहेत. तरीही या प्रश्नाचे उत्तर आजच्या घडीला एकच असेल – सरकार अदानी-अंबानींचे. देशात 56 वर्षांपासून अनेक सरकारे आली-गेली; पण कालानुरूप चित्र काही बदलले नाही. देश आजही 56 वर्षांपूर्वीच्याच स्थितीत दिसतोय. एकूणच असे दिसते, की भारतीय जनतेला प्रगती नव्हे तर गुलामगिरीच आवडते. काँग्रेसनेही वेगळे काय केलेय? त्यांनीही आपल्या चुकांवर पडदाच टाकला आहे.

देशात सरकार कुणाचे? मोदींचे की अदानीचे? यासंदर्भात सोशल मीडियात अनेक मीम्स व्हायरल होत आहेत. (फोटो कार्टून कंटेंट क्रेडिट : सौमित्र रॉय, भडास, सोशल मीडिया)

हे सुद्धा वाचा : 

पंतप्रधानांचे लाडके उद्योगपती अदानीशेठचा बाजार उठतोय!

Rahul Gandhi : उद्योगपतींना कर्जमाफी ? मोदी सरकारने उद्योगपतींचे 2378760000000 रुपयांचे कर्ज माफ केले’ : राहुल गांधी

पळपुटया बागेश्वरच्या डोक्यावर परिणाम; जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची निंदा नालस्ती

मीडिया तरी कुठे बदलला? कारण माध्यमांचे मालक, संपादक संगळ्यांनीच गुलामगिरी स्वीकारली होती अन आजही तीच स्थिती आहे. परिणामत: आज देश उद्ध्वस्त होत आहे. प्रत्येकाच्याच पापांची यादी मोठी आहे. किंमत चुकवावी लागतेय ती देशातील जनतेला, 56 वर्षांपूर्वीही आणि आजही ..!

उद्योगपती बिर्ला मोठे की देशाची संसद? ब्लिट्झ या इंग्रजी साप्ताहिकाने 1967 मध्ये उपस्थित केलेला प्रश्न. आज अदानी कांडाच्या निमित्ताने पुन्हा तोच प्रश्न उभा राहिलाय – देशात सरकार कुणाचे? मोदींचे की अदानीचे ??
(फोटो कंटेंट क्रेडिट : सौमित्र रॉय, भडास, सोशल मीडिया)
Whose Government In The Country, Modi or Adani, देशात सरकार कुणाचे ? मोदींचे की अदानीचे ?, बिर्ला-इंदिरा गांधी यांच्या किश्श्याची चर्चा!, Discussion of Birla Indira Gandhi Story
विक्रांत पाटील

Recent Posts

सर्व्हिस रिव्हॉल्वरचा गैर वापर करणारा पोलीस नाईक बडतर्फ !

साप्ताहिक सुट्टीच्या दिवशी सर्व्हिस रिव्हॉल्वर  पोलीस ठाण्यात जमा न करता घरी घेऊन जाणाऱ्या पोलीस नाईक…

2 hours ago

नाशिक कलावंतानी साकारला शास्त्रीय नृत्यांचा सुंदर अविष्कार; तीनजागतिक विश्व विक्रमांची नोंद

तीनजागतिक विश्व विक्रमांची  नोंद- १३तासाहुन अधिक काळ सादरीकरण,आर्ट असोसिएटसचा पुढाकार नाशिक कुठल्याही एका शास्त्रीय नृत्यापुरते…

2 hours ago

उद्धव ठाकरेंना झटका! एम के मढवी यांना अटक

उद्धव ठाकरे यांना मोठा झटका बसला आहे. उद्धव ठाकरे  गटाचे पदाधिकारी एम. के. मढवी  (M…

2 hours ago

शरद पवार गटाला धक्का! स्टार प्रचारक अनिल देशमुखांवर गुन्हा

देशात सध्या लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत आहे. लोकसभा निवडणुकीचे दोन टप्पे पार पडले आहे. तर…

3 hours ago

‘मी कोणाच्या बापाला घाबरत नाही,’ छगन भुजबळ मनोज जरांगेच्या टीकेवर भुजबळ संतापले

ओबीसींचा लढा उभारताना घाबरलो नाही, आता कशाला घाबरायचं. माझ्यावर अनेक वेळा हल्ले झाले. किती शिव्या,…

4 hours ago

लोकांमध्ये आर्थिक साक्षरता निर्माण करणे ही काळाची गरज; आयसीएआय नाशिक शाखा

अनेकदा सामान्य माणूस कर नियोजन, करभरणा, कर बचत, लेखापरीक्षण, बदलते कायदे यांच्यापासून लांब राहणे पसंत…

4 hours ago