31 C
Mumbai
Friday, May 17, 2024
Homeटॉप न्यूजठाण्यात बर्ड फ्लूचा धोखा, 300 कोंबड्यांचा मृत्यू! जिल्हाधिकाऱ्यांनी दिली माहिती

ठाण्यात बर्ड फ्लूचा धोखा, 300 कोंबड्यांचा मृत्यू! जिल्हाधिकाऱ्यांनी दिली माहिती

टीम लय भारी

ठाणे : ठाणे जिल्ह्यातील शहापूरमध्ये बर्ड फ्लूने हाहाकार माजला आहे. ठाण्यातील वेहलोली गावातील एका पोल्ट्री फार्मवर अचानक तीनशे कोंबड्यांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. आता तेथील उर्वरित कोंबड्यांचे नमुने पुण्यातील प्रयोगशाळेत तपासण्यास पाठवण्यात आले आहेत. आणि ते नमुने पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी दिली आहे(Bird flu threat in Thane, 300 chickens die, says district collector).

कोंबड्यांचे नमुने पॉझिटिव्ह आल्याने जिल्हाधिकारी राजेश यांनी पोल्ट्री फार्मच्या 1 किमीच्या परिसरात असलेल्या सर्व कोंबड्या मारुन टाकण्याचा निर्णय सांगितला आहे.

इतर पक्ष्यांमध्ये बर्ड फ्लू पसरु नये यासाठी खबरदारी म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. बर्ड फ्लूनं कोंबड्याचा मृत्यू झाला असला तरी नागरिकांनी घाबरुन जाऊ नये असं आवाहन देखील प्रशासनाने केलं आहे.

हे सुद्धा वाचा

लवकरच राज्यातील विद्यार्थ्यांना ‘समान संधी केंद्राचा’ मिळणार लाभ

मराठमोळी गायिका वैशाली माडेच्या जीवाला धोका

एकनाथ शिंदेंचा टोला, आता होणार काम, आता खरा राजूशेठ यांना लावावा लागणार बॅनर!

Bird flu scare: 100 chickens found dead at poultry farm in Maharashtra’s Thane, District Collector issues statement

एका फार्ममध्ये काही कोंबड्या गेल्या काही दिवसांत बर्ड फ्लूमुळे मृत्युमुखी पडल्या आहेत. त्यामुळे जवळपासच्या परिसरातील 23 हजार कोंबड्या मारण्याची तयारी करण्यात आली आहे. या फार्ममधील काही कोंबड्यांना बर्ड फ्लू झाल्यानं त्यांचा मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालं असलं, तरी लोकांनी घाबरून जाऊ नये, असं आवाहन राज्य सरकारनं केलं आहे. म्हणून बर्ड फ्लूचा प्रसार होऊ नये म्हणून उपाययोजना केली जात असल्याचंही प्रशासनाने सांगितले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी