टॉप न्यूज

एकनाथ खडसेंच्या मदतीसाठी मधमाशी आली धावून !

टीम लय भारी 

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे (eknath khadse) हे गुडघेदुखी मुळे प्रचंड त्रस्त होते. भारतातील विविध शहरात त्यांनी उपचार घेतले. परंतु या उपचारांचा फायदा झाला नाही. परंतु अॅपिथेरपी (मधमाशीचा डंख करवून घेण्याची उपचारपद्धती) मुळे आपली तब्येत सुधारल्याचे खडसे (eknath khadse taking treatment of honeybee) यांनी सांगितले आहे.अॅपिथेरपी म्हणजे काय ? असा प्रश्न काल पासून अनेकांना पडला आहे.

मधमाशीच्या उपयोग करुन केल्या जाणाऱ्या उपचारांना अॅपिथेरपी असं म्हटलं जातं. मिळालेल्या माहिती नुसार या उपचारांमध्ये मधमाशीपासून मिळणारे मध, पोळ्यातील डिंक, रॉयल जेली तसेच विषाचाही उपयोग केला जातो. (the-bee-came-running-to-help-eknath-khadse) हे विष आधीच काढलेले असते किंवा जिवंत माशीचे वापरले जाते. जिवंत माशीचा डंख ही एकप्रकारची अक्युपंक्चर म्हणता येईल.

डॅा कुलकर्णी यांच्या औरंगाबाद येथील फार्म हाऊस येथे देखील हे उपचार केले जातात. त्यांचे मार्गदर्शक असलेले डॅा नांदेडकर उरळी कांचन येथे उपचार करतात. त्यांनी आजवर २५ लाख रुग्णांवर त्यांनी उपचार केले आहेत, असे त्यांनी सांगितले.

आपण सारेच जण मधमाश्यांच्या डंखाला घाबरतो. मात्र मधमाश्यांचे विष बऱ्याचशा आजारांवर रामबाण औषध असते असं तज्ञ म्हणतात.

 

मधमाशीपालनाचे फायदे

1) पर्यावरणाचा समतोल राखून नैसर्गिक संपत्तीचे जतन करण्यासाठी मधमाशी पालन हा व्यवसाय अतिशय महत्त्वाचा आहे.
2) अनेक पिकामध्ये मधमाश्यांद्वारे परागीकरण झाल्यामुळे उत्पादन वाढते.

3) मधासोबतच मेणाचेही उत्पादन मिळते. सौंदर्यप्रसाधने, अनेक प्रकारची औषधे तयार करण्यासाठी मध आणि मेणाचा उपयोग केला जातो.

4) ग्रामीण भागात कमी खर्चात रोजगार मिळवून देणारा हा उद्योग आहे.

5) मधमाशीपालन शेती, फळबाग, भाजीपाला लागवड व कोणत्याही पूरक उद्योगाशी स्पर्धा करत नाही.

6) मधमाशी पालन करण्यासाठी मोठ्या जागेची, वीज, वाहन, इमारत अशा भांडवलाच्या गुंतवणुकीची गरज नसते.

 

Shweta Chande

Recent Posts

कमी मतदानाची झळ कोणाला बसणार…..

लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात शुक्रवारी १३ राज्ये व केंद्रशासीत प्रदेशांमधील ८८ मतदारसंघांमध्ये रात्री साडे दहा …

1 hour ago

नगरमध्ये लंके विरूद्ध लंके

नगर मतदार संघातून २ निलेश लंके निवडणुकीच्या रिंगणात आपल्याला पाहायला मिळणार आहेत(Lanka vs Lanka in…

2 hours ago

काश्मिर पटेलांना नको होते, पण पंडित नेहरूंनी भारतात आणले !

काश्‍मीर प्रश्‍नाचा जो काही गुंता झाला आहे त्याचं पितृत्व नेहरुंचच असं मानणारा मोठा वर्ग देशात…

4 hours ago

इंदिरा गांधी, पोलादी पंतप्रधान

‘इंडिया इज इंदिरा आणि इंदिरा इज इंडिया’ असे राष्ट्रीय कॉंग्रेसच्या एका बड्या नेत्याने इंदिरा गांधींच्या…

5 hours ago

अशोक कटारिया उपनगर पोलिसांसमोर ‘हजर’!

आयुक्तालयाने 'लूक आऊट' नोटीस बजावल्यानंतर ख्यातनाम बांधकाम व्यावसायिक अशोक कटारिया (Ashok Kataria) यांनी शुक्रवारी (…

6 hours ago

पत्रकार नेहा पुरव यांना धमकी देण्यार्‍यांना गजाआड करा; मुंबई मराठी पत्रकार संघाची मागणी

पत्रकार नेहा पुरव (journalist Neha Purv) प्रामाणिकपणे आपले कर्तव्य बजावत असताना त्यांना घरी जाऊन बातमी…

6 hours ago