राजकीय

Saurabh Tripathi : केंद्रीय संस्थांच्या नावाने राज्यातील सनदी अधिकारी उकळतात हप्ते

लय भारी टीम

मुंबई : राज्याच्या पोलीस दलातील आयपीएस अधिकारी सौरभ त्रिपाठी (saurabh Tripathi)  यांचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर केंद्रीय यंत्रणाच्या नावाने वसूलीचे षडयंत्र राज्यातील प्रशासकीय यंत्रणेत रचले जात तर नाही ना ? अशी शंका उपस्थित केली जात आहे. त्यामुळे या सर्व प्रकरणाबाबत कसून चौकशी व्हावी अशी मागणी अ‍ॅड. आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी केली असता गृहमंत्र्यांनी ती मान्य करीत चौकशीची घोषणा केली आहे. (Saurabh Tripathi suspended by Maharashtra govt )

आशिष शेलारांनी विधनसभेत मांडली ‘ही’ लक्षवेधी बाब

सौरभ त्रिपाठी (Saurabh Tripathi)  हे आयपीएस अधिकारी आंगडीया या व्यापा-याकडून आयकर अधिकारी असल्याचे भासवून वसूली करीत असल्याचे उघड झाल्यानंतर राज्य शासनाने सौरभ त्रिपाठी (Saurabh Tripathi) यांना निलंबित केले. या कारवाईचे स्वागत करताना आमदार ॲड. आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी एका गंभीर बाबीकडे आज विधानसभेत सरकारचे लक्ष वेधले.

या प्रकरणानंतर राज्यातील प्रशासकीय यंत्रणा अशा प्रकारे केंद्रीय यंत्रणांच्या नावाचा वापर करुन वसूली तर करीत नाही ना? केंद्रीय यंत्रणांना बदनाम करण्याचे षडयंत्र तर राज्यातील प्रशसकीय यंत्रणेमध्ये शिजत तर नाही ना? त्रिपाठी सारखे अन्य कोणी अधिकारी वसूली तर करीत नाही ना? त्यांच्या पाठीशी कोण उभे आहे की काय? असे प्रश्न आता उपस्थित होत असून असे असेल तर महाराष्ट्राची आणि देशाची बदनामी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही गंभीर बाब असून याप्रकरणी तातडीने शासनाने दखल देऊन आवश्यकता असल्यास चौकशी करावी, अशी मागणी आमदार ॲड आशिष शेलार यांनी केली. त्यावर उत्तर देताना गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी याची शासन दखल घेत असून, चौकशी केली जाईल, अशी घोषणा केली. (dilip walase patil assure to after Saurabh Tripathi corruption)


हे सुद्धा वाचा –

आमदार देवेंद्र भुयार यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून नारळ मिळणार !

शालेय अभ्यासक्रमातून धार्मिक शिक्षण दिले जाणार नाही : वर्षा गायकवाड

Maharashtra govt suspends IPS officer Saurabh Tripathi in extortion case

देवेंद्र फडणविसांनी समाजवाद्यांवर साधला निशाणा

Pratiksha Pawar

Share
Published by
Pratiksha Pawar

Recent Posts

शहरातील जीर्ण वाड्याबाबत मनपा उदासीन; नागरिक धोक्यात

नियमाप्रमाणे महापालिका हद्दीतील एखाद्या इमारतीचे ३० वर्षांपेक्षा अधिक आयुर्मान झाल्यास स्ट्रक्चरल ऑडिट करणे गरजेचे आहे.…

16 hours ago

सिडको गोळीबार प्रकरणातील ८ जणांवर मोक्का

गुन्हेगारी टोळीतील आठ आरोपींना बंदुकीने फायर करणे महागात पडले. या आरोपींना  माेक्का (MCOCA) लावण्यात आला…

16 hours ago

कर्नाटकातील अत्याचार हा नारीशक्तीचा अपमान;काँग्रेस प्रवक्ता प्रगती अहिर यांची भाजपावर टीका

भारतीय जनता पक्षाचा कर्नाटकातील मित्रपक्ष जेडीएसचा उमेदवार प्रज्वल रेवन्ना याने हजारो महिलांवर लैंगिक अत्याचार केले…

17 hours ago

सिडको विभागात सायकल रॅलीसह विविध उपक्रमांच्या माध्यमातून मतदारांमध्ये जनजागृती करण्यात आली.

याअंतर्गत स्वीप उपक्रम प्रभावीपणे राबवला जात आहे. या उपक्रमा अंतर्गत नवीन नाशिक विभागात महिला बचत…

17 hours ago

पोटच्या मुलीलाच देहविक्रीस भाग पाडून तिच्या जन्मदात्यांनी विकलं

पालघर मधून एक धक्कादायक घटना काही दिवसांपूर्वी समोर आलीये. स्त्रियांवर आणि बालकांवरील अत्याचारात दिवसेंदिवस वाढ…

19 hours ago

अश्रू, तुझा खरा रंग कंचा ? रोहित पवारांचा की अजित पवारांचा ??

नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं सपाटून मार खाल्ला होता. अशातच अजितदादांच्या मागं…

20 hours ago