राजकीय

Balasaheb Thorat : वडगावपान सोसायटी निवडणुकीत शेतकरी ग्राम विकास मंडळाचे वर्चस्व

टीम लय भारी

संगमनेर : तालुक्यातील प्रतिष्ठेच्या समजल्या जाणार्‍या वडगावपान विविध कार्यकारी सोसायटी निवडणुकीत महसूलमंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकरी ग्राम विकास मंडळांने सर्व 13 जागांवर मोठ्या फरकाने विजय मिळवला असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन प्रतापराव ओहोळ (Prataprao Ohol)  यांनी दिली आहे.

कारखान्याचे चेअरमन प्रतापराव ओहोळ यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या निवडणुकीमध्ये 1 जागा आधीच बिनविरोध व 12 जागा मोठ्या फरकाने शेतकरी विकास मंडळाने (Shetkari Vikas Mandal) जिंकून आणल्या. याप्रसंगी महेश मोरे, डॉ दादाभाऊ थोरात बाळासाहेब गायकवाड, अशोकराव थोरात, पंचायत समिती सदस्य बेबीताई थोरात, एन टी थोरात गायकवाड अरुण, कुळधरण आदि मान्यवर उपस्थित होते.

या निवडणूकीत सर्वसाधारण मतदार संघातून अशोक बाबुराव काशिद, नानासाहेब शांताराम कुळधरण, आबासाहेब मनोहर थोरात, दिलीप माधवराव थोरात,निलेश गोरक्षनाथ थोरात,रामनाथ विष्णु थोरात,शंकर धोंडीबा थोरात,शंकर मारुती थोरात हे विजयी झाले असून इतर मागास प्रवर्गातून गडगे राधाकिसन मुरलीधर, महिला राखीव मतदार संघातून कमल रामनाथ काशिद,केशरबाई पोपट थोरात,भटक्या विमुक्त मतदार संघातून भिकाजी बाळाजी शिरसाठ तर अनुसुचित  – जाती जमाती मतदार संघातून रविंद्र सिताराम गायकवाड हे मोठ्या मताधिक्यांनी निवडून आले आहे.

याप्रसंगी कारखान्याचे चेअरमन प्रतापराव ओहोळ  म्हणाले की , हा विजय ऐतिहासिक आहे. सर्व सभासदांनी धनशक्तीला नाकारून गुणशक्तीवर विश्वास ठेवून मतदान केले. विरोधकांनी कायम खोटा प्रचार करून सभासदांना भुलवण्याचा प्रयत्न केला परंतु सभासदांनी त्यावर विश्वास न ठेवता महसूलमंत्री ना. बाळासाहेब थोरात यांच्या विचारावर आचरण करणार्‍यावर व सर्व समाजासाठी गाव बांधिलकीचे काम करणारे उमेदवार निवडून दिले आहे. जरी काहींनी अभाषी प्रचाराला धरून विरोधात मत टाकले असतील तर त्यांनी महसूलमंत्री ना बाळासाहेब थोरात व शेतकरी ग्रामविकास मंडळाच्या विचारावर व गावच्या परंपरेसाठी सलोखा राखून पुन्हा ह्या विचारात सहभागी व्हावे.

व्यक्तीदोषातून चार लोकांच्या समाधानासाठी चांगल्या विचारापासून दूर न जाता गाव बांधिलकी मध्ये सहभागी व्हावे. धर्म, जातीवर आधारित प्रचार बहुसंख्य लोकांना मान्य नाही हे पुन्हा या निवडणुकीत सिद्ध झाले. हीच खरी शिकवण आहे सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात स्व. दत्ताजी मोरे , प्रतापराव मोरे यांच्या विचारावर कायमच लोकांनी विश्वास दाखवलेला आहे.

या निवडणुकीत युवक, जेष्ठ, नागरिक कार्यकर्ते यांनी मेहनत घेऊन हा विजय खेचून आणला. यावेळी निलेश थोरात,नितीन गायकवाड,बयजु तात्या थोरात, छोटू थोरात, संभाजी काशीद, संभाजी थोरात, मनोहर थोरात ,एकनाथ थोरात ,पुंजा थोरात ,बाबासाहेब थोरात ,पुंजाहरी थोरात ,कैलास थोरात आदी कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली. या सर्व विजयी उमेदवारांचे महसूलमंत्री नामदार बाळासाहेब थोरात , आ.डॉ सुधीर तांबे कारखान्याचे संचालक इंद्रजीतभाऊ थोरात, बाजीराव पा.खेमनर, रणजितसिंह देशमुख यांनी अभिनंदन करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहे


हे सुद्धा वाचा –

आमदार देवेंद्र भुयार यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून नारळ मिळणार !

नियमबाह्य पद्धतीने विक्री केलेल्या साखर कारखान्यांची चौकशी करा अन्यथा…. : प्रवीण दरेकरांचा इशारा

देवेंद्र फडणविसांनी समाजवाद्यांवर साधला निशाणा

Pratiksha Pawar

Recent Posts

नगरमधील या पट्ट्याने व्यवस्थापनाचे शिक्षण पूर्ण केले, आता गुऱ्हाळ व रसवंती धंदा जोरात चालवतोय

लोकसभा निवडणुकीचा(Loksabha Election 2024) तिसरा टप्पा लवकरच होवू घातला या पार्श्वभूमीवर तळागाळातील सामान्य जनतेच्या भावना…

41 mins ago

BMC देणार मुंबईतील या  चौकाला ‘श्रीदेवी कपूर’ चं नाव

  बॉलीवूडची हवाहवाई गर्ल, अभिनेत्री श्रीदेवी जिने ८०-९० चं दशक गाजवलं, चाहत्यांच्या मनावर राज्य केलं.(BMC…

43 mins ago

काय झालं मोदींनी दिलेल्या गॅरंटीचं

२०२४ ची लोकसभा निवडणूक चौथ्या टप्प्यात पोहचली असून मागील तीन टप्प्याचे मतदान पाहता मतदारांनी कमी…

2 hours ago

अदानी-अंबानीने काँग्रेसला पैसे दिल्याचे मोदींचे विधान बेजबाबदारपणाचे; अदानी अंबानीची चौकशी करा सत्य बाहेर येईल: डॉ. भालचंद्र मुणगेकर

अदानी-अंबानी कडून काँग्रेस पक्षाला टेम्पो भरून पैसे मिळाल्यानेच राहुल गांधी आता त्यांना शिव्या देत नाहीत…

19 hours ago

बडगुजर यांच्यावरील कारवाईविरोधात महाविकास आघाडीचे नेते आक्रमक

लोकसभा निवडणुकीच्या प्रचार सुरू असताना शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर (Badgujar )यांना बजाविण्यात आलेली…

19 hours ago

श्रीरामाचं मदीर, ३७० हे ठीक, पण शेतकरी मातीत जातोय त्याचं काय ?

लोकसभा निवडणुकीचा तिसरा टप्पा लवकरच होवू घातला ( Elections 2024:In Ahmednagar, Farmers Unhappy With BJP…

21 hours ago