31 C
Mumbai
Tuesday, May 21, 2024
Homeटॉप न्यूजप्रसिद्ध कोरिओग्राफर रेमो डिसुझाच्या मेव्हण्याची आत्महत्या

प्रसिद्ध कोरिओग्राफर रेमो डिसुझाच्या मेव्हण्याची आत्महत्या

टीम लय भारी

मुंबई : प्रसिद्ध कोरिओग्राफर रेमो डिसुझाच्या मेव्हण्याने पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज शुक्रवारी अंधेरी येथे घडली. जेसन सॅवियो वॅटकिन्स (48) असे आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी ओशिवरा पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. ओशिवरा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह शवविच्छेदनासाठी कूपर रुग्णालयात पाठवला(Famous choreographer Remo D’Souza’s brother-in-law commits suicide).

जेसन सॅवियो वॅटकिन्स हा अंधेरी पश्चिम येथील यमुना नगर येथील फ्लॅट क्रमांक 302 मध्ये राहत होता. सकाळी त्याने खोलीतील पंख्याला गळफास घेत जीवन संपवले. जेसनने आत्महत्या का केली हे अद्याप कळू शकले नाही. दुपारी 12 वाजता मुख्य नियंत्रण कक्षाला अंधेरी यमुना नगरमध्ये एका व्यक्तीने आत्महत्या केल्याची माहिती मिळाली.

पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत जेसनला खाली उतरवले आणि कूपर रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या प्रकरणी ओशिवरा पोलिसांनी जेसनचे 74 वर्षीय वडील डेसमंड सिरिल डन्स्टन आणि बहीण लिझी रेमो डिसूझा यांचे जबाब नोंदवले आहेत. पोलिसांनी एडीआर अंतर्गत गुन्हा दाखल केला असून, या प्रकरणाचा तपास पोलीस करत आहे.

हे सुद्धा वाचा

मंगल प्रभात लोढा यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

औरंगाबादेत धक्कादायक प्रकार: घर बुक करताना जात विचारली, वकिलानं ठोकला अ‍ॅट्रॉसिटीचा दावा!

वर्धा पोलिसांना हॉस्पिटलच्या आवारात सापडली 11 कवट्या आणि 54 गर्भाची हाडे

Remo D’Souza’s Wife Breaks Down After Learning About Her Brother’s Suicide; Opens Up About Father’s Illness

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी