28 C
Mumbai
Thursday, March 28, 2024
Homeराष्ट्रीयपंतप्रधान मोदी यांचे नागरिकांना मास्क वापरण्याचे आवाहन

पंतप्रधान मोदी यांचे नागरिकांना मास्क वापरण्याचे आवाहन

चीन मधील वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राज्यांसोबत ऑनलाईन बैठक घेत देशातील कोरोनास्थितीचा (Corona) आढावा घेतला. यावेळी राज्यांमधील आरोग्य यंत्रणांनी सतर्क रहावे अशा सुचना करतानाच त्यांनी नागरिकांना मास्क वापरण्याच्या आणि कोरोनाचे नियम पाळण्याचे आवाहन देखील यावेळी केले. नववर्षाच्या आगमनाचे सेलिब्रेशनबाबत देखील पंतप्रधान मोदी  (Prime Minister Modi ) यांनी राज्यांना खबरदारी बाळगण्याच्या सूचना केल्या.

या बैठकीत बोलताना पंतप्रधान मोदी यांनी देशातील सर्व नागरिकांना कोरोनाच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन करतानाच आरोग्य यंत्रणांनी देखील सतर्क राहण्याच्या सुचना केल्या. कोरोनाबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्याच्या सुचना देखील मोदी यांनी यावेळी राज्यांना दिल्या. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर कालच केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांच्या अध्यक्षतेखाली कालच बैठक पार पडली होती. त्यानतंर आज पंतप्रधान मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. यावेळी मोदींनी राज्यांना आरोग्य व्यवस्थेचे ऑडीट करण्याच्या सुचना करतानाच जिनोम सिक्वेंसिंग आणि कोरोना चाचण्या अधिकाधिक करण्याच्या सुचना देखील त्यांनी यावेळी दिल्या. तसेच ज्येष्ठ नागरिक आणि सहव्याधीग्रस्त नागरिकांचे लसीकरण वाढविण्यावर भर देण्यासंबंधी देखील त्यांनी सुचना केल्या.

हे सुद्धा वाचा
ओमिक्रॉन बीएफ 7 : चीनमध्ये कहर माजवणाऱ्या कोरोना व्हेरीएंटचे भारतात चार रुग्ण; जुलैतच गुजरातमध्ये आढळले होते पहिले प्रकरण; सरकारला जाग आली निवडणुका आटोपल्यांनतरच!! 
चीन मध्ये कोरोना रुग्णांना कारमध्ये अॅडमीट करण्याची वेळ; राज्य सरकारने काय खबरदारी घेतली आहे?

VIDEO : चीनमध्ये कोरोनाचा उद्रेक; संपूर्ण जग पुन्हा एकदा हायअलर्टवर

ऑक्सिजन सिलिंडर, PSA प्लांट्स, व्हेंटिलेटर आणि मानव संसाधनांसह रुग्णालयाच्या पायाभूत सुविधांची खात्री करण्यासाठी पंतप्रधानांनी राज्यांना कोविड-विशिष्ट सुविधांचे ऑडिट करण्याचा सल्ला दिला, असे निवेदनात म्हटले आहे. नीती आयोगाचे आरोग्य सचिव आणि सदस्य (आरोग्य) यांनी देशांमधील वाढत्या प्रकरणांसह, जागतिक कोविड परिस्थितीबाबत बैठकीत सादरीकरण केले. 22 डिसेंबर रोजी पर्यंत भारतात सरासरी दैनंदिन प्रकरणांमध्ये सातत्याने घट होत असल्याचे पंतप्रधान मोदींना सांगण्यात आले. तथापि, गेल्या सहा आठवड्यांपासून जगभरात दररोज सरासरी 5.9 लाख प्रकरणे नोंदवली गेली आहेत. औषधे, लस आणि रुग्णालयातील खाटा याबाबत पुरेशी उपलब्धता असल्याची माहिती मोदींना देण्यात आली. अत्यावश्यक औषधांच्या किमती आणि उपलब्धतेवर नियमितपणे लक्ष ठेवण्याचा सल्लाही त्यांनी दिला. आरोग्यसेवा कर्मचार्‍यांच्या जागतिक स्तरावर कौतुकास्पद कार्याला अधोरेखित करून पंतप्रधान मोदींनी त्यांना त्याच निस्वार्थी आणि समर्पित रीतीने काम करत राहण्याचे आवाहन केले, असे निवेदनात म्हटले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी