34 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeसिनेमाकियारा आडवाणी झाली 29 वर्षाची; जाणून घ्या तिच्याबद्दल 'या' खास गोष्टी

कियारा आडवाणी झाली 29 वर्षाची; जाणून घ्या तिच्याबद्दल ‘या’ खास गोष्टी

टीम लय भारी

मुंबई:- बॉलीवूड अभिनेत्री कियारा आडवाणी शनिवार (ता.31) आपला 29 वा वाढदिवस साजरा करत आहे. 2014 मध्ये ‘फगली’ सिनेमातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. अनेक वर्षांच्या मेहनतीने तिने स्वतःचं स्थान पक्क केले होते. यानंतर कियाराने आपल्या अभिनयाच्या जोरावर कमी वेळात बॉलिवूडमध्ये आपले स्थान निर्माण केले आहे. बॉलिवूडच्या सुंदर, आणि ग्लॅमरस अभिनेत्रींमध्ये कियारा आडवाणीचे नाव घेतले जाते. तिच्या वाढदिवसानिमित्त आज आपण तिच्या आयुष्याशी संबंधित खास गोष्टी जाणून घेणार आहोत (Kiara is celebrating her birthday today).

कियारा आडवणीचा जन्म 31 जुलै 1992 साली मुंबईत झाला. कियारा एका बिझनेसमन फॅमिलीत जन्माला आली आहे. कियाराचे वडील जगदीश आडवाणी हे मुंबईत राहणारे सिंधी व्यापारी आहेत. तिची आई जिनेवीव जाफरी एक शिक्षिका आहे. कियाराला एक लहान भाऊ आहे (Kiara was born into a business family).

बेल बॉटोम चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला; अक्षय कुमारने दिली माहिती

…त्या बातम्या मानहानीकारक कशा असू शकतात; मुंबई उच्च न्यायालयाचा शिल्पा शेट्टीला उलट प्रश्न

चित्रपटात येण्यापूर्वी शिक्षिका होती कियारा

कियाराचे शालेय शिक्षण आणि कॉलेज मुंबईमध्येच पूर्ण झाले आहे. कियाराच्या आजीने तिला वर्क एक्सपिरियन्स वाढवण्यासाठी टिचिंग करण्याचा सल्ला दिला होता. कियाराला मुलांना शिकवायाला खूप आवडत होते आणि ती कुलाबाच्या अर्ली बर्ड स्कूलमध्ये शिकवायला जात होती. याठिकाणी कियाराची आई हेडमास्टर होती (Kiara loved teaching children).

Kiara is celebrating her birthday today
कियारा आडवाणी

सलमानच्या सांगण्यावरुन बदलले नाव

कियारा आडवाणी बॉलिवूडमध्ये येण्यापूर्वी दुसऱ्या नावाने ओळखली जात होती. तिचे खरे नाव आलिया आडवाणी होते. कियारने तिचा पहिला सिनेमा रिलीज होण्याआधीच आलिया हे नाव बदलून कियारा ठेवले होते. सलमान खान ने कियाराला हा सल्ला दिला होता कारण आलिया भट्ट सिनेमांमध्ये आधीच काम करत होती. कियाराचे हे नाव ‘अंजाना अंजानी’ सिनेमातील प्रियांका चोप्राच्या पात्रावरून घेतले गेले होते (Kiara was advised by Salman Khan).

Kiara is celebrating her birthday today
कियारा आडवाणी आणि सलमान खान

बॉक्सर लव्हलिनाचा उपांत्य फेरीत प्रवेश, ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी दुसरे पदक केले निश्चित

Birthday girl Kiara Advani in nude crop top and bodycon skirt is a style icon

सलमान खानसोबत यामुळे आहे नाते

कियाराची आई जिनेवीव सुपरस्टार सलमान खान ची बालपणीची मैत्रीण आहे. दोघंही वांद्रे येथे राहत होते आणि लहानपणापासून एकमेकांना ओळखत होते. जिनेवीवनेच कियाराची मावशी शाहीन आणि सलमानची भेट घालून दिली होती. कियाराने एका मुलाखतीत सांगितले होते की, फार पूर्वी सलमानने कियाराची मावशी शाहीनला डेटही केले होते. कियाराने सांगितले की, सलमान आणि शाहीनचे हे पहिले रिलेशनशिप होते.

सिनेसृष्टीशी असे आहे नाते

कियाराच्या कुटुंबातील कोणतीही व्यक्ती सिनेसृष्टीतील नसली तरी तिच्या कुटुंबाचे कनेक्शन बॉलिवूडमधल्या दोन मोठ्या कलाकारांशी नक्कीच आहे. कियाराचे आजोबा हमीद जाफरी हे प्रसिद्ध कलाकार सईद जाफरी यांचे लहान भाऊ होते. त्यांचे पहिले लग्न कियाराच्या आजीशी झाले होते, ज्या ब्रिटीश महिला होत्या. यानंतर हामिद यांनी दुसरं लग्न भारती गांगुलीशी केले. भारती या अशोक कुमार यांची मुलगी होती. भारती यांनी कियाराची आई जिनेवीव यांना वाढवले. अशाप्रकारे, कियाराचे तिच्या आईच्या बाजूने सईद जाफरी आणि अशोक कुमार यांच्याशी संबंध आहेत.

Kiara is celebrating her birthday today
कियारा आडवाणी

कियाराचा पहिला चित्रपट

बऱ्याचदा चाहत्यांना असे वाटते की कियाराने आपल्या करिअरची सुरुवात ‘एमएस धोनी’ या चित्रपटातून केली होती. परंतु, अभिनेत्रीने 2014 मध्ये ‘फुगली’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. मात्र, या चित्रपटाला फारसे यश मिळाले नाही आणि कियाराला देखील प्रसिद्धी मिळू शकली नाही.

Kiara is celebrating her birthday today
कियारा आडवाणी

या सुपरहिट चित्रपटांमध्ये केले आहे काम

2016 मध्ये कियारा आडवाणीने नीरज पांडे दिग्दर्शित ‘एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोर’ या चित्रपटात काम केले. या चित्रपटातील कियाराच्या अभिनयाचे प्रेक्षकांनी खूप कौतुक केले. या चित्रपटानंतर कियारा आडवाणी एकापाठोपाठ एका चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली. 2019 मध्ये कियाराचे दोन चित्रपट ‘कबीर सिंग’ आणि ‘गुड न्यूज’ प्रेक्षकांच्या भेटीला आले. चित्रपटांव्यतिरिक्त कियारा आडवाणीने म्युजिक अल्बम आणि वेब सीरिज ‘लस्ट स्टोरीज’ आणि ‘गिल्टी’मध्ये काम केले आहे. तिने शेवटचे ‘लक्ष्मी’ आणि ‘इंदू की जवानी’ या सिनेमांत काम केले.

कियाराचे आगामी चित्रपट

आता लवकरच कियाराचा ‘शेरशाह’ सिनेमा १२ ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे. याशिवाय, कियारा कार्तिक आर्यनसोबत ‘भूलभूल्लैया २’ आणि वरुण धवनचसोबत ‘जुग जुग जिओ’ मध्ये दिसणार आहे (Kiara movie ‘SherShah’ will be released on August 12).

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी