33 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
Homeटॉप न्यूजस्वच्छ सर्वेक्षणात कराड नगरपालिका देशात प्रथम

स्वच्छ सर्वेक्षणात कराड नगरपालिका देशात प्रथम

टीम लय भारी

सातारा : केंद्र शासनाच्या स्वच्छ सर्वेक्षण 2020 चा निकाल केंद्रीय नगर विकास मंत्री  हरदीपसिंग पुरी यांनी आज दिल्ली येथे जाहीर केला. त्यात त्यांनी  एक लाख लोकसंख्येच्या आतील  शहरांमध्ये कराड नगर पालिकेने देशात प्रथम क्रमांक मिळवल्याचे जाहीर केले.  गेल्यावर्षीच्या स्पर्धेतही कराड नगरपालिकेने देशात प्रथम क्रमांक पटकावला होता.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षीचे पारितोषिक वितरण कार्यक्रम व्हर्च्युअल पद्धतीने झाला. मुंबई येथे कराडच्या नगराध्यक्षा सौ. रोहिणी शिंदे, तत्कालीन मुख्याधिकारी यशवंत डांगे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. यावेळी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, नगरविकासच्या तत्कालीन सचिव मनीषा म्हैसकर यांची उपस्थिती होती.

स्वच्छ सर्वेक्षण 2020 मध्ये एक लाख लोकसंख्येच्या आतील शहरांमध्ये महाराष्ट्राने बाजी मारली आहे. तीन क्रमांक महाराष्ट्रातील पालिकांनी बाजी मारली.  कराड देशात प्रथम क्रमांकावर, सासवड दुसऱ्या  तर लोणावळा नगरपालिकेने  तिसरा पटकावला.एक लाखावरील लोकसंख्येच्या शहरात मध्य प्रदेशतील इंदूर महापालिकेने सलग चौथ्या वर्षी देशात प्रथम क्रमांक पटकावला. सुरत (गुजरात) या शहराने दुसरा तर नवी मुंबई (महाराष्ट्र) महापालिकेने तिसरा क्रमांक पटकावला आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी