31 C
Mumbai
Tuesday, May 21, 2024
Homeटॉप न्यूजNetflix सर्वांसाठी Free ! 'असं' करा अ‍ॅक्सेस

Netflix सर्वांसाठी Free ! ‘असं’ करा अ‍ॅक्सेस

टीम लय भारी

मुंबई : आज (शुक्रवार, दि. 4 डिसेंबर) रात्री 12 वाजल्यापासून 2 दिवसांसाठी सर्व प्रेक्षकांना Netflix फ्री मिळणार आहे. StreamFest अंतर्गत Netflix चा फ्री अ‍ॅक्सेस दिला जाणार आहे.

परंतु यासाठी काही स्टेप्स देण्यात आल्या आहेत. ज्या फॉलो करणं गरजेचं आहे. चांगली बाब अशी की, यावेळी तुम्हाला डेबिट किंवा क्रेडिट कार्ड डिटेल्स द्यावे लागणार नाहीत.

नेटफ्लिक्सनुसार, या प्रमोशनल ऑफरमध्ये यूजर्स नेटफ्लिक्सचा सर्व कंटेट अ‍ॅक्सेस करू शकतात. म्हणजेच प्रीमियम नेटफ्लिक्सचे जे कोणते फीचर्स असतील ते सर्व यूजर्सला दोन दिवस अ‍ॅक्सेस करता येणार आहेत.

ही StreamFest फक्त त्या यूजर्ससाठी असणार आहे जे नेटफ्लिक्स्चे सब्सक्रायबर्स नाहीत. फ्री ऑफरसाठी सर्वांत आधी एक नेटफ्लिक्स अकाउंट बनवावं लागेल. यासाठी अ‍ॅपही डाउनलोड करू शकता. किंवा https://www.netflix.com/in/streamfest या वेबसाईटवरही जाऊ शकता.

इथं तुम्हाला फोन नंबर, ईमेल आयडीसह इतर तपशील भरून तु्म्हाला साईनअप करायचं आहे. यानंतर 5 आणि 6 डिसेंबर तुम्ही फ्री नेटफ्लिक्स अ‍ॅक्सेस करू शकता, परंतु तु्म्हाला एचडी किंवा फुल एचडी नाही तर SD कंटेट पाहायला मिळणार आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी