31 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeआरोग्यBreaking : ‘करोना’ग्रस्तांची संख्या 32, आरोग्य मंत्री राजेश टोपे आज कस्तुरबा रूग्णालयाला...

Breaking : ‘करोना’ग्रस्तांची संख्या 32, आरोग्य मंत्री राजेश टोपे आज कस्तुरबा रूग्णालयाला भेट देणार

टीम लय भारी

मुंबई : ‘कोरोना’ग्रस्त ( Coronavirus ) रुग्णांची संख्या 32 वर पोचली आहे. ‘कोरोना’चा मुकाबला करण्यासाठी आरोग्य व्यवस्था सक्षम करण्याची गरज आहे. त्या दृष्टीने आरोग्य मंत्री राजेश टोपे ( Rajesh Tope ) आज 2 वाजता कस्तुरबा रूग्णालयाला भेट देणार आहेत.

यावेळी कस्तुरबा रूग्णालयातील विलीगीकरण कक्ष, प्रयोगशाळेची टोपे पाहणी करतील. रूग्णांची माहिती घेतील, अशी माहिती सूत्रांनी ‘लय भारी’शी बोलताना दिली.

दरम्यान, भारतात ‘कोरोना’बाधित रूग्णांची संख्या 102 वर पोचली आहे. त्यात महाराष्ट्रातील 32 रुग्णांचा समावेश आहे. दुबईवरून आलेल्या रूग्णांच्या संपर्कात आल्याने ‘कोरोना’बाधित झालेले हे नवे पाच रूग्ण आहेत. ते पिंपरी – चिंचवडमधील असल्याचे सूत्रांनी सांगितले.

कोरानाबाधितांची संख्या 32 

कोरानाबाधितांची कालपर्यंत 31 होती. आज औरंगाबादमध्ये आणखी एक रूग्ण आढळून आला आहे. रशिया व कझाकिस्तान प्रवास करून आलेली 59 वर्षीय महिला करोनाबाधित असल्याचे आढळून आले आहे.

हे सुद्धा वाचा

VIDEO : यात्रा, जाहीर कार्यक्रम रद्द करा, लग्नामध्येही गर्दी नको : उद्धव ठाकरे, अजितदादा, राजेश टोपेंच्या सुचना

राज्यातील शहरी शाळा, महाविद्यालय ३१ मार्चपर्यंत बंद राहणार : राजेश टोपे

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी